रोमन हॉलीडेज्
·
इसवी सना पूर्वीपासूनच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचे जीवापाड जतन करणाऱ्या इटली च्या अनेक पिढ्यांना आदरपूर्वक अर्पण...
·
इसवी सन ७९ मधील व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या महाभयंकर, प्रलयंकारी उद्रेकानंतर अगतिकपणे मृत्यूला सामोरे जाणाऱ्या हजारो पॉम्पे व हर्क्युलेनियम वासियांना समर्पित...
२४. ०६. २०१५
मनोगत
माझ्या मुलाच्या (हर्षवर्धन)च्या उच्चशिक्षणा दरम्यान मला आणि माझी पत्नी अलका ला इटली मधील रोम मध्ये राहण्याचा योग आला. रोम ला जाताना प्रवासवर्णन वगैरे लिहावे असे काहीच डोक्यात नव्हते. कारण मी काही लेखक वगैरे नाही. रोमधील वास्तव्यात आम्ही करत असलेली धमाल, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची माहिती मी माझ्या मित्रांना व्हाट्स ऍप आणि फेसबुक वर लिहून पाठवत असे. माझ्या काही मित्रांनी मला 'असे वर्णन रोज लिहून पाठवावे' असा प्रेमळ आग्रह केला. जमेल तसे लिहिलेल्या अशा छोट्या छोट्या उताऱ्यांचे स्वरूप पुढे छोट्या पुस्तकात कधी झाले हे कळलेच नाही. पुण्यात परत येऊन कित्येक महिने उलटून गेल्यावर देखील इटलीच्या हजारो वर्षांच्या इतिहासातून मी बाहेर पडू शकत नव्हतो. मग नकळत लिहीत गेलो. मनातले कागदावर आणले. माझे हे लिहिलेले काहीबाही म्हणजे इटली चे समग्र प्रवासवर्णन नाही. मी हा देश जो काही थोडा बहुत पाहिला, अनुभवला त्याचे हे माझ्या नजरेतून केलेले वर्णन आहे.
इटलीचे विस्तृत प्रवास वर्णन अनेक दिग्गज लेखकांनी लिहून ठेवले आहे. मी इटली मधील फार थोड्या शहरांमधून केवळ फेरफटका मारला आहे असेच म्हणावे लागेल. त्यामध्ये ‘फ्लोरेन्स’, ‘रोम’ हि शहरे पूर्वी ट्रॅव्हल कंपनी बरोबर काहीशी धावपळीत पहिली होती. या वेळी आम्ही ती थोडी निवांतपणे पाहिली. इटलीच्या दक्षिणेकडील ‘पॉम्पे’, ‘नेपल्स, ‘सोरँतो’, ‘काप्री’ हि शहरे मी पूर्वी पहिली नव्हती. ती पाहायची असे ठरवूनच मी इटलीमध्ये गेलो होतो. ‘पॉम्पे’ ह्या शापित शहराविषयी मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. दोन सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी निसर्गाने अक्षरशः थैमान घालून उध्वस्थ केलेल्या पॉम्पे शहराचे मला कायम आकर्षण वाटत आले आहे. निसर्गाचे हे थैमान प्रत्यक्ष पॉम्पे शहरात जाऊन अनुभवणे हे खूप थरारक आहे. इटलीतील पाहिलेल्या शहरांमध्ये तुलनेने 'रोम' हे शहरआम्ही बरेचसे निवांतपणे पहिले, अनुभवले. इटालियन लोकांची इतिहास जतन करून ठेवण्याची इच्छाशक्ती आणि चिकाटी आश्चर्यकारक आहे. इटली मधील वास्तव्यात मी त्यांच्या या वृत्तीची तुलना भारतीयांच्या इतिहासाबद्दल असलेल्या उदासीनतेबरोबर नेहेमी करत असे. असो...
देशात किंवा परदेशात पर्यटनाला जाण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ट्रॅव्हल कंपनी बरोबर पर्यटनाला जाणे आणि दुसरे म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणे पर्यटन करणे. या दोनही पर्यायात काही फायदे, काही तोटे असतात. मी हे दोन्हीही प्रकार अनुभवलेले आहेत. परदेश प्रवासाचा अनुभव नसेल तर ट्रॅव्हल कंपनी बरोबर परदेशगमन करणे नेहेमीच चांगले. ट्रॅव्हल कंपनीत पैसे भरले कि बाकी डोक्याला ताप नसतो. चांगल्या ट्रॅव्हल कंपन्या योग्य व आवश्यक पर्यटन स्थळे तर दाखवतातच , पण विमानाची तिकिटे काढणे, व्हिसा, पासपोर्ट वगैरे ची हि काळजी घेतात. परदेशात आपल्या सवयीच्या भारतीय पद्धतीचे जेवणाची उत्तम व्यवस्थाही केली जाते. ट्रॅव्हल कंपनीचा एक टूर मॅनेजर ही सतत आपल्याबरोबर असतो, त्यामुळे आपल्याला भाषेची किंवा कसलीच अडचण येत नाही. शिवाय पर्यटकांचा एक मोठा ग्रुप आपल्याबरोबर असतो त्यामुळे अनेक नवीन ओळखी होऊन नवे मित्र ही होतात. माझ्या इटलीच्या ह्या प्रवासाआधी मी ट्रॅव्हल कंपनी बरोबर संपूर्ण युरोप, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ असे काही देश पहिले होते. युरोप ट्रिप मध्ये मी फ्लोरेन्स, आणि रोम तसे पहिले होते. पण पण सतरा, अठरा दिवसात संपूर्ण युरोप बघताना स्वाभाविक पणे ही शहरे धावपळीत बघितली होती. त्या ट्रिप मध्ये फ्लोरेन्स, आणि रोम अक्षरशः एखाद दुसऱ्या दिवसात उरकला होता. यावेळी मात्र आम्ही मुलाकडे राहून निवांतपणे रोम मध्ये भटकलो. आवडलेल्या ठिकाणी आम्हाला जास्त वेळ घालवता आला, आणि न पाहिलेली अशी काप्री, पॉम्पे, नेपल्स, सोरांतो, सिएना या सारखी शहरेही पहिली.
इटली मधेच नव्हे तर संपूर्ण युरोपात राहण्यासाठी न परवडणाऱ्या हॉटेल्स ना एक उत्तम पर्याय म्हणजे पेइंग गेस्ट पद्धतीने उत्तम राहण्याची व्यवस्था ! अनेक कुटुंबं आपल्या घरातील एखाददुसरी खोली पर्यटकांसाठी राखून ठेवतात, आणि अतिशय स्वस्तात पर्यटकांना ती उपलब्ध करून देतात. अशा व्यावसायिकांसाठी आणि पर्यटकांसाठी 'एअर बी.एन. बी' नावाची एक वेब साईट कार्यरत आहे. (अर्थात अशा प्रकारच्या दुसऱ्याही काही वेबसाईट्स कार्यरत आहेत.) या वेबसाईट वर अनेक कुटुंबे आपल्या घरातल्या खोल्या पर्यटकांना भाड्याने देण्यासाठी आपआपली नोंदणी करून ठेवतात. शहरातील त्या जागेचे ठिकाण दाखवणारा नकाशा, खोल्यांचे फोटो, सोयीसुविधांची माहिती, जागेचे भाडे इत्यादींची सविस्तर माहिती वेबसाईटवर दिलेली असते. त्यामुळे पर्यटकाना आपल्या आवडीनुसार, बजेट नुसार राहण्याची जागा निवडता येते. काही ठिकाणी जागेच्या मालकांचे स्वयंपाकघरही वापरता येते. आता भारतात देखील या आणि अशाप्रकारच्या वेबसाईट चा वापर वाढलेला आहे. आमच्या इटलीमधील वास्तव्यात 'एअर बी.एन.बी' च्या मदतीने फ्लोरेंस, आणि नेपल्स येथे शहरांच्या मध्य वस्तीतील जागा निवडल्या होत्या. या दोन्हीही ठिकाणी आमचा अनुभव फारच उत्तम होता. नेपल्स मधील आमचे राहण्याचे ठिकाण मस्त होते. जागेची मालकीण अतिशय गप्पिष्ठ, मध्यमवयीन आणि अतिशय उत्साही होती. अतिशय आपुलकीने तिने ब्लॅक इटालियन कॉफी देऊन आमचे स्वागत केले होते. नेपल्स मधील आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणे व त्यांची माहिती सांगितली. तिच्या आदरातिथ्याने आम्ही भारावून गेलो होतो. फ्लोरेन्स मधील घर मात्र एका मितभाषी वृद्ध दाम्पत्याचे होते. पण घर छान होते. असो...
माझं 'रोमन हॉलिडेज' पूर्ण करताना कुतज्ञतेचे काही उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. प्रसिद्ध लेखिका सौ. सुवर्ण दिवेकर यांनी माझ्या या प्रवासवर्णनाचं काहीबाही लिहिलेलं वाचून त्याचं पुस्तक करावं असा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहाने माझ्यात हे पुस्तक छापण्याचं धैर्य आलं. माझे आदरणीय मित्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांनी माझ्या लिखाणाच्या केलेल्या कौतुकाने माझा आत्मविश्वास वाढला. माझी पत्नी 'अलका' ही तर या लिखाणाच्या प्रत्येक टप्प्यावरील साक्षीदार ! अलकाने लिखाणाच्या प्रत्येक टप्प्यावर केलेली टीका असो अथवा कौतुक सर्वच महत्वाचे आणि आवश्यक होते. माझा मुलगा हर्षवर्धन रोम मध्ये वर्षभर राहिलेला होता. त्यामुळे त्याला रोम ची इत्यंभूत माहिती होती. वास्तुकलाशास्त्राच्या (आर्किटेक्चर) उच्च शिक्षणासाठी तो रोम येथे राहत असल्याने त्याला इतिहासाची, पुरातन रोमन इमारतीच्या वैशिष्ठयांची समग्र माहिती होती. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. हर्षवर्धनला इटालियन आणि स्पॅनिश भाषा छान येतात, त्यामुळे आम्हाला भाषेची फारशी अडचण आली नाही. आमचे रोम मधील वास्तव्य त्याच्यामुळे खूप आनंददायी गेले.आमच्या रोम मधील वास्तव्यात लंडन मध्ये उच्चशिक्षण घेणारी सून ‘अनुजा’ ही काही दिवस आल्यामुळे आमच्या आनंदात भरच पडली. हे प्रवासवर्णन लिहिताना इतिहासातील अनेक रोमन सम्राटांची, इमारतींची, रस्त्यांची, चौकांची, ऐतिहासिक ठिकाणांची नावे माझ्या लक्षात राहत नसत. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या मदतीशिवाय मी कदाचित हे लिहूच शकलो नसतो.
दोन तीन हजार वर्षांपूर्वीची ऐतिहासिक स्थळे बघताना एखाद्याला वाटेल की हि पडझड झालेली भग्न स्थळे काय बघायची ? पण आम्ही मात्र रोमन इतिहास बघताना, अनुभवताना धन्य झालो...
राजीव.
प्रसिद्ध
व्यंगचित्रकार माननीय मंगेशजी तेंडुलकर
यांची प्रतिक्रिया
वाचनीय प्रवासवर्णन कोण लिहू शकतो ?
'ज्याच्यापाशी सांगण्याजोगे काही आहे तो लेखक होतो' असं पु. ल. देशपांडे म्हणत. म्हणजेच वर्णन करण्याजोगे काही पहिले आहे, अनुभवलेले आहे तोच प्रवासवर्णन करू शकतो. प्रवासात पाहण्याजोगे बरेच काही डोळ्यासमोर येत राहते; पण त्यातले देखलेपण एखाद्या कॅमेऱ्यासारखे टिपून घेऊन स्मरणात ठेवणे फारच मोजक्या माणसांना जमते. अशी मोजकी माणसे लिहायला प्रवृत्त होतात. त्यांच्या हातून लेखन होते; पण ते वाचनीय होण्यासाठी 'आणखी काहीतरी' लागते. ही बहुदा लेखन प्रतिभा असावी. ती ज्यांच्यापाशी आहे तेच वाचनीय प्रवासवर्णन लिहू शकतात. अशी माणसे क्वचितच कुठे सापडतात. मौज अशी की ती फक्त साहित्यिकांतच सापडतात असेही नाही. कुठेही सापडतात.
या पुस्तकाचे लेखक श्री. राजीव जतकर हे अशा दुर्मिळ माणसातले एक असतील अशी कल्पना मला दुरान्वये देखील कधी आली नाही. त्यांचा माझा परिचय जवळपास सात, आठ वर्षांचा तरी असेल. 'अस्वस्थ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर' असं त्यांचं वर्णन मला करता येईल. व्होल्टेज, करंट, वायर्स, केबल्स, महावितरण अशासारख्या रुक्ष विषयांच्या पलीकडे जाऊन हे गृहस्थ सुंदर प्रवासवर्णन पण कधी काळी लिहितील यावर माझा तरी विश्वास कसा बसणार? 'रोमन हॉलिडेज' प्रवासवर्णनात्मक पुस्तकांमुळे त्यांचा मला नव्याने परिचय झाला. 'रोमन हॉलिडेज' या नावाचा पूर्वी एक सुपर रोमँटिक चित्रपट आला होता. या पार्श्व भूमीवर शीर्षक रोमँटिक आणि मुखपृष्ठावरचं चित्र चिलखत घातलेल्या रोमन योध्याचं ! कव्हरच्या आतलं पुस्तक नेमकं कसं असेल असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला. कुतूहलापोटी वाचायला सुरवात केली आणि ते सुंदर प्रवासवर्णन निघाले, रोम आणि इतर काही शहरांचा फेरफटका घडवून आणणारे !
इटली या देशातल्या ‘रोम’ या पूर्वापार प्रसिद्ध असलेल्या शहराचं वर्णन त्यांनी त्यांच्या नजरेतून लिहिताना प्रवासातल्या किंवा तेथील वास्तव्यातील मजेशीर घटनांची मांडणीही त्यांनी केली आहे. रोम मधील माणसे, त्यांचे खाणे, वागणे, बोलणे, वावरणे, घरे, पुरातन अवशेष, चर्चेस, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आणि या सगळ्यातून व्यक्त होणारा रोम शहराचा ‘मूड’ असं सर्वकाही या पुस्तकातून व्यक्त झालं आहे. हे सर्व अनुभवताना त्यांचा भारतीय दृष्टिकोनही त्यांनी लपवला नाही. लेखकाने त्याची कबुलीही देऊन टाकली आहे. 'आपल्या दृष्टिकोनातून जे योग्य तेव्हडेच बरोबर, बाकीचे सर्व चुकीचे' ही भावना जगातल्या कुठल्याही देशातल्या प्रत्येक माणसात जशीच्या तशी सापडते. ही भावना आपल्यात पण असते. ती थोडी ढिली करून कुतूहलाने पहिले तर स्वीकारण्याजोगे खूप काही असते. जतकरांना हे व्यक्त करणं छान जमलं आहे.
एकदोन ठिकाणी टोकाच्या परिस्थितीत ते अस्वस्थ झाल्याचं लिहितात. पुरातन काळातल्या माणसाचं क्रौर्य जनावरांच्या आणि श्वापदांच्या जवळपासचं होतं, आजही ते नष्ट झालेलं नाही. पुरातन काळी इजिप्त मध्ये माणसांच्या मांस विक्रीची दुकाने होती. नॅशनल जिओग्राफीच्या अंकात त्याचं सविस्तर वर्णन आहे. रेखाचित्रे पण आहेत. अलिप्तपणे, अंतर्मुख होऊन पाहता आलं तर आपल्यात एक हिंस्त्र श्वापदपण लपून बसलं आहे, याचा साक्षात्कार प्रत्येक माणसाला होईल. त्या मनातल्या श्वापदाला निष्प्रभ करण्यात आपले माणूसपण आहे. असो...
या पुस्तकात सुंदर फोटोग्राफ्स पण आहेत. जतकरांनी त्यांच्या सौभाग्यवतींचा सुरवातीलाच टाकलेला 'कंटाळा' मूड मधला फोटो केवळ धमाल आहे. रोम मध्ये त्यांच्याशी अचानक हिंदीत बोलणारा दुकानदार वगरे तपशील मोठा मनोरंजक आहे. शब्दातून दृश्य उभे करण्याचं सामर्थ्य जतकरांच्या लेखनात आहे. पासपोर्ट, व्हिसा न काढता, प्रवासाची दगदग न करता आमच्या सारख्या सामान्य माणसांना रोमन हॉलिडेज हे मराठी पुस्तक रोम व इतर काही अदभूत शहरांचे तपशीलवार दर्शन घरबसल्या घडवते. पण खरं सांगू? या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे हे शहर रोमँटिक असलं तरी तिथे जाऊन राहण्यापेक्षा आम्हाला आमच्या पुण्यातच राहायला जास्त आवडेल. इथला रोमान्स तर रोम मधेही नाही !
मंगेश तेंडुलकर.
२४. ०६. २०१५
पुण्यात
शनिवारपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली होती. आम्ही थोड्या काळजीतच होतो. आमच्या
रोम प्रवासाला सुरुवात होईपर्यंत पाऊस कमी होईल असे वाटले होते. पण पावसाचे प्रमाण
वाढतच होते. आज थोडी लवकरच जाग आली. वर्तमानपत्रातील मुख्य बातमीकडे लक्ष जाताच मनात
धडकीच भरली. "पुढील २४ तासात महाराष्ट्रात अतिवृष्टी व वादळाचा इशारा" हवामान
खात्याने दिला होता. तेवढ्यात पुणे-मुंबई हायवे वर दरड कोसळल्याची बातमी धडकली. एक्सप्रेस
हायवे बंद पडल्यामुळे मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक जुन्या पुणे मुंबई हायवे वरून वळवण्यात
आली होती. म्हणजे ट्राफिक जाम होणार. मुंबईच्या विमानतळावर आम्हाला २५ तारखेच्या पाहटे
३ वाजता पोहोचणे आवश्यक होते. मग आम्ही पुण्याहून खूप लवकर निघायचे ठरवले.
मुंबई विमानतळावर जाण्यासाठी आम्ही माझ्या मित्राची तवेरा गाडी (Taxi) सांगून ठेवली होती. आम्ही कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतो. घरातून खूप लवकर म्हणजे रात्री ८ वाजताच निघालो. वास्तविक आमचे इस्ताम्बुल ला जाणारे विमान सकाळी ६ वाजता सुटणार होते. पण इलाज नव्हता. सुदैवाने हवामान खात्याचे सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने आपले कोसळणे थांबवले होते. एक्सप्रेस हायवे च्या सुरवातीला चौकशी करता हायवे रहदारीसाठी मोकळा झाला होता, असे हि समजले. त्यामुळे आम्ही रात्री १२ वाजताच मुंबई च्या विमानतळावर पोहचलो. म्हणजे तब्बल ६ तास काढायचे होते. जाम कंटाळवाणा प्रकार ! पण मुंबई विमानतळाचे नुकतेच नुतनीकरण झाल्यामुळे त्याचे नवीन व भव्य स्वरूप बघण्यात वेळ कसा गेला तेच कळले नाही. मुंबई विमानतळाचे नवीन स्वरूप आता जागतिक स्तरावरील इतर अनेक सुंदर विमानतळांच्या तोडीचे झाले आहे.

दि. २५: २५ तारखेला वेळेवर सकाळी ६ वाजता आम्ही इस्तांबुल
कडे उड्डाण केले. इस्तांबुल येथे तेथील स्थानिक वेळेप्रमाणे १० वाजता पोहचलो. (पण तुर्कस्तानची
वेळ भारतीय वेळेपेक्षा २ ते २.५ तास मागे असल्याने भारतीय वेळेप्रमाणे १२ वाजता आम्ही
इस्तांबुल येथे पोहचलो.) इस्तांबुलच्या विमानतळावर दोन अडीच तासानंतर आमचे पुढचे विमान
रोम ला जाणार होते. त्यामुळे थोडा आरामच होता. इस्तांबुलचे विमानतळही छान आहे. इस्तांबुल येथून तेथील स्थानिक वेळेप्रमाणे म्हणजे
१२" वाजता आमचे विमान रोमला निघणार होते. स्वतंत्र पणे हा आमचा पहिलाच विमान प्रवास
असल्याने थोड्या गोंधळलेल्या अवस्थेतच पुढील विमानाचा गेट क्रमांक हुडकून काढला. सर्वच
आंतरराष्ट्रीय विमानतळे अवाढव्य असतात. पण सर्वसाधारणपणे मार्गदर्शक पाट्या
(Displays) जागोजागी असल्याने तशी फारशी अडचण येत नाही. शिवाय नेहमी विमान प्रवास करणारे
प्रवासी किंवा विमानतळावरील अधिकारी नवख्या (आमच्यासारख्या) प्रवाशांना मदत करीत असतात.
वेळेच्या बरेच आधी आम्ही आमच्या विमानाचा गेट क्रमांक हुडकून तिथे जाऊन बसलो …. हो
उगीच उशीर आणि मग गोंधळ नको…! बरेच धाडस करून मधेच कॉफीही घेऊन आलो.
सर्व आवश्यक सोपस्कार करून आम्ही रोमला जाणाऱ्या विमानात बसलो. मुंबई इस्तांबुल या विमाना पेक्षा आमचे रोमला जाणारे विमान छोटे होते. मुंबई - इस्तांबुल हा प्रवास जवळ जवळ ६ तासांचा होता. इस्तांबुल- रोम हा प्रवास तुलनेने बराच कमी म्हणजे २ तासांचा होत. तसा विमान प्रवास कंटाळवाणा होत नाही. कारण प्रत्येक विमानात प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र टी.व्ही.स्क्रीन असतो. या टी.व्ही. वर अखंडपणे काहीतरी (चित्रपट, गेम्स. बातम्या) चालू असते. विमान प्रवास सुरु होताच हवाई सुंदऱ्या हसत मुखाने विविध खाद्य पदार्थ, शीतपेये (आंतरराष्ट्रीय विमानात बियर, व्हिस्की, व्होडका, वाईन, असे विविध मद्यप्रकार ही दिले जातात.) आणून देतात. थोड्या वेळाने शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण येते. या सगळ्यात वेळ कसा जातो ते समजत देखील नाही. दोन्ही विमानप्रवासात आम्हाला खिडकीजवळची जागा मिळाल्यामुळे बाहेरची दृश्ये बघण्यात ही छान वेळ गेला.

आमचे विमान वेळेवर म्हणजे
रोम मधील स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीच वाजता पोहोचले. (म्हणजे तेव्हा भारतात संध्याकाळचे
५" वाजले होते. म्हणजे आम्ही मुंबईहून निघाल्यापासून ११ तासांनी आम्ही रोमला पोहोचलो.)
'फ्युमिसीनो' अशा काहीशा चमत्कारिक नावाच्या विमानतळावर आम्ही उतरलो. पुन्हा पासपोर्ट,
व्हिसा तपासणीचे कंटाळवाणे सोपस्कार झाले. इथे ही कागदपत्रे तपासण्यासाठी दोन वेगळ्या
रांगा होत्या. युरोपियन पासपोर्ट तपासण्यासाठी वेगळी रांग व युरोप व्यतिरिक्त देशांच्या
प्रवाशांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे तपासण्यासाठी वेगळी रांग ! मला ही गोष्ट फारशी
पटली नाही. असो …

घरी आल्यावर थोडा आराम केला. हर्षवर्धनचा फ्लॅट छोटासाच होता पण छान होता. एकूण ३ खोल्या. त्यातील एक छोटे स्वयंपाक घर सर्व सोयींनी युक्त असे होते. उरलेल्या दोन खोल्यांच्या पैकी एक खोली घरमालकांनी स्वतःकडे ठेवली होती. व एक खोली हर्षवर्धनकडे होती. स्वयंपाकघर व बाथरूम एकत्रित वापरासाठी होते. घरमालक या घरात फारशे येत नसल्याने संपूर्ण घर हर्षवर्धनने व्यापले होते. हा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता.
स्वयंपाकघराला लागून एक बाल्कनी होती, त्यामुळे समोरचा रस्ता व शेजारील चौकामधील दृश्ये दिसत. या घरातील वास्तव्या दरम्यान बाल्कनीत उभे राहून रस्त्यावरील लोकांची वर्दळ न्याहाळणे हा आमचा विरंगुळा होता. समोरच्या चौकातील वर्दळीकडे बघताना आम्हाला प्रकर्षाने जाणवली'. ती रहदारीची शिस्त ! गर्दी नसली तरी वाहने सिग्नलचे काटेकोर पालन करीत. आम्हाला फार आश्चर्य वाटले. न कळत आम्ही भारतातल्या वाहतुकीची तुलना करत होतो.
हर्षवर्धनच्या घरी आल्यावर थोडा आराम व गप्पा झाल्या. थोडी भुकेची
जाणीव झाली. हर्षवर्धन कुठल्यातरी कामात होता. घरातील अंडी व ब्रेड संपले होते. हर्षवर्धन
म्हणाला "पलीकडच्या चोकातील सुपरमार्केट मधुन ब्रेड व अंडी आणा बाबा !” मी दचकलो.
आपल्याला इटलीयन भाषा येत नाही, शिवाय युरो या चलनाची सवय नाही, हिशेब करायची देखील
अडचण आपल्याला कसे जमणार? अलकाला बरोबर घेऊन जावे तर ती अंघोळीला गेलेली, आणि तिलाही
याच अडचणी असणार. हर्षवर्धन म्हणाला "जमेल तुम्हाला ! आणि आता रोममधे राहायला
आला आहात तुम्हाला ही सवय करून घ्यायलाच हवी." मग मनाचा निग्रह करून थोडे पैसे
घेऊन मी घरा बाहेर पडलो. पलीकडच्या चोकातल्या सुपरमार्केट मधे शिरलो. सुपरमार्केट मधील
काउंटर वरील व्यक्तीला इंग्रजीमधुन ‘मला अंडी व ब्रेड हवा आहे’ असे सांगीतले. त्यांने
मला स्मित हास्य करून पलीकडील फ्रिज मधील अंडी घेण्यास सांगीतली व ब्रेड ठेवल्याची
जागाही दाखवली. मला थोडे दडपणच आले होते. तेवढ्यात
सुपरमार्केटच्या या माणसाने मला विचारले "आपको हिंदी नही आती?" मला आश्चर्याचा
धक्काच बसला रोम मध्ये मला हे अगदीच अनपेक्षित होते. हिंदी बोलण्याचा पर्याय मिळताच
मी सुटलोच ! हा सुपर मार्केट मधील माणूस बांगलादेशीय होता. त्याच्याशी भरपूर गप्पा
मारून मी सुपर मार्केटमधून एखादे युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात एखाद्या रोमन योध्या
सारखा बाहेर पडलो.
घरी आल्यावर ब्रेड आम्लेट चा नाश्ता केला. हर्षवर्धनच्या फ्लॅट मधे खुप सोई होत्या. पाईप लाईन मधून गॅसचा २४ तास पुरवठा होता. गॅस गिझर असल्याने २४ तास गरम पाण्याची सोय होती. फ्रीज वॉशिंगमशीन, राइस कुकर वगैरे गोष्टींनी परिपूर्ण असे घर होते. त्यामुळे अधून मधून आम्ही घरीच जेवण बनवू शकत होतो. हर्षवर्धनच्या फ्लॅट मधे एका मात्र गोष्टीची गैरसोय होती. ती म्हणजे घरात पंखे नव्हते. आम्ही जून महिन्यात रोमला गेल्यामुळे ऐन उन्हाळा चालू होता. पंखे नसल्याने जाम उकडायचे. तेवढीच गैर सोय सोडली तर आमचे हर्षवर्धनच्या घरातील वास्तव्य खूप मजेत गेले.

आ ज आम्ही संध्याकाळी 'पियात्झा डेल पोपोलो ' या ठिकाणी जायचे ठरवले रोम मधील 'सबअगुस्तास ' (Subaugustas) नावाच्या एका उपनगरात आम्ही राहत होतो. घराच्या अगदी पुढच्याच चौकात भुयारी रेल्वे (मेट्रो) चे स्टेशन होते.
हर्षवर्धन ने आम्हा दोघांचा एका आठवड्याचा मेट्रो पास काढला. रोम मध्ये हि एक छान सोय आहे. आता आम्ही मेट्रोने किंवा बस ने कितीही वेळा प्रवास करू शकतो. मेट्रोला बऱ्यापैकी गर्दी होती. हर्षवर्धन आणि अनुजा आम्हाला 'गर्दीत खूप काळजी घ्यावी लागते ' असे सांगत होते. रोम मध्ये भुरटे चोर खूप आहेत म्हणे ! अनुजा आणि हर्षवर्धन च्या सूचना ऐकून मला गम्मत वाटत होती. मला माझ्या तरुणपणाच्या आठवणी येत होत्या. दादा, इन्नाला मी अशाच
सारख्या सूचना करायचो. वयोमानानुसार आता आपल्याला स्वतःत बदल करायला हवेत असे जाणवले. पण असे
बदल हवे हवेचे वाटतात. आम्हा दोघांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हर्षवर्धन आणि अनुजा ची लगबग
चालू होती. मेट्रोला गर्दी होतीच, पण कोणतीही धावपळ नाही,पळापळ नाही, कि चेंगराचेंगरी नाही. अर्ध्या तासाने आम्ही कुठल्याशा स्टेशनवर आम्ही उतरलो. तेथून जवळच चालण्याच्या अंतरावर 'पिअत्सा डेल पोप्पोलो' या भव्य अशा चौकात आलो.
रोम हे शहर विस्तीर्ण चौकांनी नटलेले आहे.
आम्ही नंतर आमच्या रोममधील वास्तव्यात अनेक चौक पाहिले पण या पोपेल्लो चौकाची सर कोणत्याही चौकाला नाही. या चौकात मध्यावर ई.स. पूर्व १२ व्या शतकातील एक मोठा स्तंभ नजरेत भरतो. हा भव्य स्तंभ इजिप्त मधून आणण्यात आला आहे. पहिला रोमन सम्राट ऑगस्टस यानं रोम शहराला ला नटवण्यासाठी साठी इजिप्तहून अनेक अनमोल चीजा आणल्या होत्या. हा स्तंभ त्यापैकीच एक ! त्यावर तत्कालीन चित्रलिपी स्पष्ट दिसते. अति प्राचीन अशा या स्तंभामुळे या चौकाला पर्यटकांच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे.
या चौकाची शानच काही वेगळे होती. संध्याकाळच्या संधीप्रकाशात चौक उजळून निघाला होता. हवेत सुखद गारवा होता. आम्ही पोहोचलो तिथे तीन रस्ते एकत्र येउन मिळत होते. चौकाच्या दोन्ही बाजूला दोन जुळी वाटणारी चर्च होती. पुढे विस्तीर्ण चौकाचे मैदान ! मैदानाच्या मधल्या स्तंभाच्या उजव्या हाताला एक उंच
टेकडी आणि टेकडीवर हिरवीगार बाग होती. चौकाच्या भोवती पाच सात माजली जुन्या इमारती होत्या. उजव्या बाजूला वेशी सारखी दिसणारी उंच कमान होती.
या चौकात तशी बेताचीच गर्दी होती. चौकाच्या विस्तीर्ण मैदानात एका बाजूला एक वयस्क गृहस्थ साबणाच्या पाण्याचे फुगे हवेत सोडत होता. लहान मोठ्यांची करमणूक करून पैसे मिळवणे हा त्याचा उद्देश होता. त्याच्या भोवती फुगे पकडण्यासाठी लहान मुले धावत होती. खिदळत होती. हर्षवर्धन, अनुजाहि त्यात सामील झाली. मग आम्हालाही राहवेना. आम्हीही सामील झालो त्यांच्यात आगदी लहान होऊन! खूप धमाल आली. चौकाच्या मध्यभागी असलेल्या स्तंभापाशी एक माणूस स्वतःला रंगवून, रोमन योद्ध्याचा वेश धारण करून, आगदी स्थब्ध असा, आगदी डोळ्याची पापणीही न हलवता पुतळ्यासारखा उभा होता. तो श्वास तरी घेत होता का नव्हता देवच जाणे ! या जिवंत पुतळ्याच्या आजूबाजूला काहीशी गर्दी होती. पर्यटक या जिवंत पुतळ्याकडे कुतूहलाने पाहत होते. या पुतळ्याच्या समोरच्या टोपी मध्ये काही लोक खुष होऊन पैसे टाकत होते. मग हा जिवंत पुतळा चटकन हलून पैसे टाकणाऱ्या लोकांना अभिवादन करायचा, हि त्याची हालचालच काय ती त्याच्या जिवंतपणाचे लक्षण ! संपूर्ण युरोपात भिक मागण्याची हि अजब पद्धत सर्रास दिसते. संध्याकाळचे ८ (?) वाजले होते. सूर्यास्त होत होता. अतिशय सुंदर व थंड वारे वाहत होते. खूपच छान वातावरण होते. सोबत आम्हा चौघांच्या गप्पा चालूच होत्या.

" इथल्या बाजूच्या टेकडीवरून सूर्यास्त फारच मस्त दिसतो, आपण तिकडेच जाऊ ! " हर्षवर्धन सांगत होता. चौकाच्या उजव्या बाजूला असलेल्या उंच पायर्यांवरून आम्ही टेकडीवर गेलो. तिथे एक छानशी
बाग होती. बागेच्या एका उंच जागेवरून खाली आता आगदी छोटासा वाटणारा पिआझ्झा डेल पोपेल्लो हा चौक
दिसत होता. समोर रोम शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. रोम शहराच्या पार्श्वभूमीवर सुर्य हळू हळू अस्ताला जात होता. आम्ही चौघेही न बोलता
ते दृष्य डोळ्यात साठवून ठेवत होतो. पाठीमागे जवळच एक मध्यम
वयीन महिला सुरेख व्हायोलीन वाजवत होती. व्हायोलीन चे आर्त
सूर वातावरण गहिरे करत होते…
'स्पॅनिश स्टेप्स'
सूर्यास्ताची दृश्ये मनात साठवून आम्ही रोम मधील 'स्पॅनिश स्टेप्स' या जगभरातल्या पर्यटकांचे विशेष
आवडीचे असलेल्या ठिकाणी चालतच निघालो. दहा ते पंधरा
मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असलेले हे ठिकाण
मात्र पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले होते. आता दिवे लागण झाली होती. 'स्पॅनिश स्टेप्स कडे जाताना मी हर्षवर्धन ला विचारले " इटालियन लोकांच्या या रोम
शहरात स्पॅनिश लोकांच्या नावाने हे ठिकाण
कसे ओळखले जाते ?” हर्षवर्धन माहिती सांगू लागला…
प्राचीन रोम
मध्ये म्हणजे आगदी मध्य युगापासूनच या भागात
परदेशी लोकांनी वास्तव्य केले होते. परकियानीच हा भाग
वसवला, सजवला, नावारूपाला आणला. तसा चौक म्हणावा असा हा भाग
वाटत नाही. तिन्ही बाजूला तीन छोटे रस्ते, आणि एका बाजूला एक टेकडी
असा हा भाग. टेकडीवर फ्रेंचांनी बांधलेले एक चर्च.
टेकडीवरिल चर्च मध्ये जाण्यासाठी फ्रेंचांनी लोकांनी या लोंब
रुंद पायऱ्या बांधल्या. पुढे सतराव्या शतकात इथे स्पॅनिश वकीलात आली. त्यामुळे या चौकाला 'पिआझ्झा दि स्पान्या' आणि या पायऱ्याना 'स्पॅनिश स्टेप्स' असे संबोधले जाऊ लागले. या आजुबाजू च्या
इमारती पंधराव्या सोळाव्या शतकातील आहेत.
हर्षवर्धन चे ऐकत ऐकत आम्ही पायर्यांकडे मोर्चा वळवला. गर्दीतला प्रत्येकजण या पायऱ्यांवर थोडावेळ तरी
विसावत होता. आम्ही हि एक जागा पाहून बसलो. लांबीला जवळ जवळ शंभर फुट असलेल्या या पायऱ्यांवर कुणी बसून गप्पा
मारीत होतं तर कुणी
उभ्या उभ्याच बोलत होतं. कुणी मित्र मित्र आडवे होऊन हास्य मस्करी करीत होतं, तर कुणी
आइसक्रीम वर ताव मारीत होतं. काही तरुण धुम्रापानात रंगलेले होते. लहान मुले पायरयांवरून धावत वर खाली
करत होती.
या गर्दीत प्रेमी युगुलांचा भरणा फार ! यातील बरीच युगुले मिठ्या मारण्यात आणि चुंबने घेण्यात मशगुल होती. आजूबाजूला असलेल्या गर्दीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता.

रात्र जशी जशी चढत होती, तसतसे पर्यटकांची गर्दी वाढत होती. चौकातली सर्व उपहार गृहे तुडुंब वहात होती. आम्हीही पलीकडच्या एका उपहार गृहाकडे आमचा मोर्चा वळवला. मुलांनी कसलासा इटालियन पास्ता व कोणते तरी इटालियन नावाचे सालाड मागवले. इतके चालून थकल्यावर, समोर इतके सुंदर जेवण आल्यावर मला इटालियन बियर मागवण्याशिवाय पर्यायच नव्हता. 'पेरोनी' नावाच्या इटालियन बियरचा स्वाद घेत मी जेवणावर ताव मारला. रोम मध्ये विविध प्रकारची, विविध स्वादांची आईस्क्रीम्स खाणे म्हणजे एक स्वर्गसुख असते. आईस्क्रीम्स चे भरगच्च भरलेले कोन हातात घेऊन रमत गमत आम्ही घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी अनुजाला लंडनला परत जायचे
होते. त्यामुळे २६ जूनच्या पहाटे हर्षवर्धन अनुजाला सोडायला विमानतळावर गेला होता.
अनुजा आमच्याबरोबर राहिली असती तर मजा आली असती. पण इलाज नव्हता. २४ तारखेचा विमान
प्रवास आणि लगेच रोम मध्ये फिरायला जाणे यामुळे आम्हाला थकवा आला होता. त्यामुळे २६
तारखेला आम्ही थोडा आरामाच केला. पण दोन दिवस सकाळी फिरायला न गेल्यामुळे पहाटे फिरायला
जायचे ठरवले.
सुप्रभात. .. गुड मॉर्निंग फ्रॉम रोम...
दि. २६: माझ्या आधीच्या माहितीत
सांगितल्या प्रमाणे आम्ही सुबागुस्तास नावाच्या भागात रहात होतो. पहाटे ५ वाजताच सुर्य
उगवतो. मी आणि अलका सकाळच्या फिरण्यासाठी 'पार्को देल्ली अक्वादुत्ती' असे गंमतशीर नाव असलेल्या विस्तीर्ण अश्या
पार्क मध्ये जातो.
पहिल्या दिवशी निघालो तेव्हा हर्षवर्धन ने कसे जायचे ते समजावून सांगितले. १५ मिनिटाच्या अंतरावरच हे पार्क आहे. इथे आपल्याप्रमाणेच लोक जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, योगा असे व्यायाम प्रकार करत असतात. हे पार्क खूप काही बांधलेले वगै. नाही, नैसर्गिक वातावरण मेंटेन केलेली भरपूर विस्तीर्ण अशी हि जागा आहे. सुबागुस्तास च्या बाहेर असल्यामुळे या पार्क ला कुंपण नाही. त्यामुळेतासभर सरळ चालत गेले तरी संपत नाही. येथील झाडे व फुले साधारणपणे आपल्या इकडच्या सारखीच आहेत. एके ठिकाणी तर मुळ्याच्या शेंगांचे झाड दिसले. आम्ही शेंगा खाऊनही पहिल्या. इथे धूळ आजीबात नसल्यामुळे झाडे, पाने, फुले अतिशय स्वच्छ, ताजी दिसतात. इकडे कचराही नसतो. पान व तंबाखू खाणारे लोक नसल्यामुळे कोठेही थुंकण्याच्या पिचकाऱ्या नसतात. स्वच्छ हवा...
या पार्क मधून एक भव्य अशी पडक्या बांधकामाची लांबच
लांब रांग दिसते. प्राचीन काळात रोम शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हि बांधकामे
(Aqua ducts) केली गेली. साध्या गुरुत्वाकर्षण
चा उपयोग करून खूप दुरून हे पाणी आणले जाई. इथल्या लोकांनी इतिहासाचा हा वारसा
देखील जीवापाड जपला आहे.पहिल्या दिवशी निघालो तेव्हा हर्षवर्धन ने कसे जायचे ते समजावून सांगितले. १५ मिनिटाच्या अंतरावरच हे पार्क आहे. इथे आपल्याप्रमाणेच लोक जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, योगा असे व्यायाम प्रकार करत असतात. हे पार्क खूप काही बांधलेले वगै. नाही, नैसर्गिक वातावरण मेंटेन केलेली भरपूर विस्तीर्ण अशी हि जागा आहे. सुबागुस्तास च्या बाहेर असल्यामुळे या पार्क ला कुंपण नाही. त्यामुळेतासभर सरळ चालत गेले तरी संपत नाही. येथील झाडे व फुले साधारणपणे आपल्या इकडच्या सारखीच आहेत. एके ठिकाणी तर मुळ्याच्या शेंगांचे झाड दिसले. आम्ही शेंगा खाऊनही पहिल्या. इथे धूळ आजीबात नसल्यामुळे झाडे, पाने, फुले अतिशय स्वच्छ, ताजी दिसतात. इकडे कचराही नसतो. पान व तंबाखू खाणारे लोक नसल्यामुळे कोठेही थुंकण्याच्या पिचकाऱ्या नसतात. स्वच्छ हवा...
आजचे बागेत फिरतानाचे अनुभव, माहिती मी रात्री फेसबुकवर, व्हाट्स अप वर फोटो सहित सर्व मित्रांना शेअर केले. माझे इकॅम मधले एक मित्र रिप्लाय देताना म्हणाले तुम्ही रोज ची माहिती अशीच शेअर करा म्हणजे आम्हाला इटली दर्शन घडेल. हि कल्पना मला आवडली. मग मी रोज रात्री झोपताना काहीबाही लिहून मित्रांना दिवसभरात बघितलेल्या ठिकाणाचे वर्णन पाठवू लागलो. मलाही लिहिताना मजा यायची.
आमच्या इटलीमधील वास्तव्यात हर्षवर्धन त्याच्या कॉलेज मधील मित्रमैत्रिणी
बद्दल भरभरून आणि मनापासून बोलायचा. हर्षवर्धन च्या वर्गातले त्याचे मित्र उच्चशिक्षणासाठी
जगाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आली होती. त्यापैकी आम्ही रोमला आल्यावर मारिया (ग्वातेमाला),
स्तब्रीना (ग्रीस), रिबेक्का उर्फ बेक्का (ऑस्ट्रेलिया), सायदू (सिएरा लेओन, पश्चिम
आफ्रिका), मार्ता सांबा (नायजेरिया), वॉलीड (घाना), पावलो आणि लोरेन्सो (दोघेही इटली),
'हा' (विएतनाम), हे हर्षवार्धांचे मित्र (त्यातील बऱ्याचश्या मैत्रिणीच) आमच्या संपर्कात
आले. स्कॉलरशिप मिळवून इथे शिकायला आलेले असल्यामुळे सगळेच प्रचंड हुशार ! सर्वांची
एकमेकांशी घट्ट मैत्री. मायभूमी सोडून दूरवर आलेल्या या मुलांना एकमेकांचाच काय तो
आधार. त्यामुळे भावनिक जवळीकही तितकीच…
२६ तारखेला सकाळच्या फिरण्याने आम्ही काहीसे थकलो होतो. हर्षवर्धन हि कुठल्याश्या कामात गुंतला होता. मग आम्ही घरीच आराम केला. संध्याकाळी हर्षवर्धन
म्हणाला "चला मी तुम्हाला माझ्या मित्रांना भेटवतो. "सुरवातीला आम्ही फारसे उत्सुक नव्हतो. वाटले 'कोण कुठले हे मित्र, त्यांच्याशी काय बोलणार?'
पण हर्षवर्धन ला बरे वाटावे म्हणून आम्ही निघालो.
'कोलोसियम' च्या चौकात भेटायचे ठरले.
सर्व मित्रांना SMS गेले. मेट्रो चा
पास होताच. कोलोसिओ नावाच्या मेट्रो स्टेशन वर उतरून कोलोसियम च्या भव्य चौकात आलो.
हर्षवर्धन च्या मित्रांना भेटायची उत्सुकता वाढली होती.
'कोलोसियम' हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने या भव्य चौकात
कायमच गर्दी असते. या गर्दीत आम्ही व हर्षवार्धन च्या मैत्रिणी (त्या दिवशी सुरवातीला
मारिया, रिबेक्का, आणि स्तब्रीना या मैत्रिणी येणार होत्या) एकमेकांना हुडकत होतो.
तेव्हड्यात मारिया आणि रिबेक्का आम्हाला दिसल्या. दोघीही आनंदाने आमच्या दिशेने आल्या.
मारिया पुढे होऊन मला मिठी मारू लागली. मी गोंधळलो. संकोचलो. मिठी मारावी तर आपल्याला सवय नाही, मिठी न मारावी
तर गावंढळपणा वाटायचा… मारियाला माझी अडचण लक्षात येउन ती हसली व पुढे येउन मला मिठी
मारली. रिबेक्का ने मला फारसे अडचणीत न टाकता हस्तांदोलन केले. मग अलकाला हि दोघींचे
मिठया, गालाला गाल लाऊन चुंबने वगैरे असे भेटणे झाले. अलका हि काहीशी अवघडली. थोड्या
वेळाने स्तब्रीना नावाची मैत्रीण येउन आमच्या गप्पात सामील झाली. स्तब्रीनाचे वडीलही
तिच्याबरोबर आले होते. आमच्या प्रमाणे तेही स्तब्रीनाला भेटायला ग्रीस हून आले होते.
पण त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांच्याशी फारसे संभाषण होऊ शकले नाही. तिघी हि अतिशय गोड आणि बडबड्या होत्या.
'सायदु' नावाचा हर्षवार्धांचा एक मित्र मला फार आवडायचा. पश्चिम
आफ्रिकेमधील 'सिएरा लेओन' नावाच्या एका छोट्या देशातून तो शिक्षणासाठी रोम ला आला होता.
तो हि आमच्या गप्पात सामील झाला. मला म्हणाला "तुम्ही दोघे फार नशीबवान आहात.
तुमचा हर्षवर्धन आम्हा सर्व मित्रांमध्ये सर्वोत्तम आहे.' कदाचित मला बरे वाटावे म्हणून
किंवा शिष्ठाचार म्हणून तो असे म्हणत असला तरी आम्हाला खूप छान वाटले. (वास्तविक हर्षवार्धांच्या
वर्गातले सर्वच मित्र शिष्यवृत्या मिळवून उच्च शिक्षण घेण्यासाठी रोम ला आले होते,
त्यामुळे सगळेच हुशार होते.) थोड्या वेळाने मार्ता आणि 'हा' ( हे नाव आहे) याही मैत्रिणी आल्या. गप्पा रंगू लागल्या.
पावलो आणि लोरेन्सो हे हर्षवर्धन चे मित्र थोड्या उशिरानेच आले. हे इटालियन होते त्यामुळे
युरोपिअन अलिप्तपणा त्यांच्यात ठासून भरला होता. त्यामुळे ‘हाय, हलो’ यापलीकडे त्यांच्याबरोबर
गप्पा झाल्या नाहीत.
'मारिया' हि ग्वातेमाला या उत्तर अमेरिकेतील मेक्सिको च्या जवळ
असलेल्या देशातून इथे शिकायला आली होती. ती इथे आली तेव्हा चक्क गरोदर होती, आणि मागील
वर्षी शिक्षणा दरम्यान जर्मनीत एका गोड मुलीला (तिचे नाव: फिओरेल्ला) जन्म दिला होता. हर्षवर्धन आणि त्याच्या मित्र मैत्रिणीनी मागील
वर्षी जर्मनीत असताना तिला एक डोहाळजेवण हि केले होते. (हा म्हणजे कहरच झाला म्हणायचा…) त्यांच्याकडे
या सोहोळ्याला 'बेबी शॉवर' म्हणतात म्हणे! हि मारिया बोलताना आविर्भावासकट बोलणारी,
हातवारे करीत बोलणारी, पण नम्र, विनयशील मुलगी होती. तिच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून
तिच्या नवरयाने तिच्या छोट्या मुलीला म्हणजे 'फिओरेल्ला' हिला तिच्या देशात परत नेले
होते. त्यामुळे 'फिओरेल्ला' चा विषय निघताच मारिया भावुक व्हायची, मुलीच्या आठवणीने
रडायला लागायची. हे समजल्यावर मी थक्क झालो. हे सर्व माझ्या आकलनापलीकडले होते. ‘रिबेक्का’ हि मैत्रीण मात्र तुलनेने कमी बोलणारी होती. ती मोजकेच
पण छान बोलायची. भारताबद्दल तिला बरीच उत्सुकता होती. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल
प्रश्न विचारून भंडावून सोडायची.
'स्तब्रीना' ही हर्षवर्धन ची मैत्रीण माझ्या नक्कीच कायम लक्षात राहील. ग्रीस वरून तिला भेटायला आलेल्या तिच्या वडिलांची ती खूप काळजी घ्यायची. तिला बघताना, तिच्याशी बोलताना 'आपल्याला अशीच एखादी गोड, आईवडिलांची काळजी घेणारी, लाघवी मुलगी असायला हवी होती' असे सारखे वाटे. (मुले आईवडिलांशी वागताना थोडी अलिप्तच असतात. मुली मात्र प्रेमळ असतात.) गंमत म्हणजे ती तिच्या वडिलांना 'बाबा' असेच हाक मारायची. ग्रीस मध्ये वडिलांना 'बाबा' असेच हाक मारतात म्हणे! स्तब्रीना वडिलांना हाक मारताना फक्त बाबा हा शब्द विशिष्ठ हेल काढून बोलवायची. आम्हाला खूप मजा वाटली. हर्षवर्धन सुद्धा मला बाबा म्हणताना बघून तिला फार आश्चर्य वाटले.

गप्पांच्या नादात दोन तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. संध्याकाळचा थंड वारा सुटला होता. कोलोसियम च्या ऐतिहासिक इमारतीवरील रोषणाई साठी लावलेले दिवे व त्याचा पिवळसर प्रकाश वातावरण उल्हसित करत होता. चढत्या रात्रीबरोबर पर्यटकांचा उत्साह वाढतच होता. आम्ही सर्वांनी एका हॉटेल मध्ये मस्त जेवण केले. निरोप घेताना या तिघी पोरींनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यांच्या प्रेमळ आग्रहाने खुश होऊन आम्ही होकार दिला. ठिकाण ठरले स्तब्रीना चे घर…
रोम मधील अनोखा नाश्ता
दि. २७: दुसऱ्या दिवशी २७ तारखेला सकाळीच आम्ही तिघेही स्तब्रीनाच्या घरी ठरल्याप्रमाणे ९ वाजता पोहोचलो. मारिया आणि रिबेक्का हि आल्या होत्या. स्तब्रीना एका कुटुंबां मध्ये 'पेईंग गेस्ट' म्हणून राहत होती. तिघी मैत्रिणीनी नाश्त्याची जय्यत तयारी केलेली होती. एका मोठ्या टेबलावर उकडलेली अंडी, ब्रेड, दुध, टोस्ट, यासोबतच चीज, बटर ठेवण्यात आले होते. याबरोबर टरबूज, कलिंगड, सफरचंद, पपई, चेरी, पीच वगैरे ताज्या फळांच्या फोडी ठेवल्या होत्या. सोबतीला संत्र्याचा रस होताच. स्तब्रीना च्या बाबांची आम्हाला काय हवे नको ते बघताना लगबग चालू होती. मग आम्ही देखील पुण्याहून आणलेली खाद्यपदार्थांची पोतडी उघडली. हर्षवर्धन च्या रोम मधली मित्रांसाठी आम्ही पुण्याहून खास चितळ्यांची बाकरवडी, चकली, गोड चिरोटे, नेले होते. हे सर्व पदार्थ त्यांनी उत्सुकतेने व आवडीने खाल्ले. मधेच स्तब्रीनाचे बाबा तिच्या कानात काहीतरी कुजबुजले. स्तब्रीना हसून आम्हाला म्हणाली "माझ्या बाबांना बाकरवडी खूप आवडली आहे." (आम्ही पुणेकर धन्य जाहलो.) स्तब्रीना तिच्या बाबांना इंग्रजी येत नसल्यामुळे 'दुभाषाचे' काम करत होती. खरच संभाषणासाठी भाषेची फारशी गरज नसतेच. ह्या तिघी पोरीचा प्रेमळ आग्रह चालूच होता.
मारिया आम्हा सर्वांचे सारखे फोटो काढत होती. आम्ही मारियाच्या छोट्या मुलीसाठी 'फिओरेल्ला' साठी पुण्याहून खणा च्या कापडाचे एक खास पऱकल पोलके नेले होते. ते आम्ही जेंव्हा तिला दिले तेव्हा तिच्या चेहेर्यावरचा आनंद आम्ही विसरूच शकणार नाही. छोट्या 'फिओरेल्ला' च्या आठवणीने ती पुन्हा गहिवरली. (परवाच तिने पऱकल पोलके घातलेल्या 'फिओरेल्ला' चे फोटो देखील पाठवले.) दोन तीन तासानंतर भरपेट नाश्ता व गप्पा मारून आम्ही त्यांचा निरोप घेतला. हा अनोखा नाश्ता आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
रोम एक अदभूत शहर
रोम मध्ये
रहायला जायचे ठरले तेव्हाच मी काही गोष्टी मनाशी नक्की केल्या होत्या. जसे जसे पॉम्पे
व काप्री हि ठिकाणे मला बघायचीच होती. पॉम्पे बद्दल मी शाळेत असल्यापासूनच बरेच काही
ऐकून होतो. काप्री बेटाच्या निळ्या समुद्र गुहा सुद्धा प्रेक्षणीय आहेत. असे ऐकले होते.
त्यामुळे हि ठिकाणे नक्की बघायची असे मनोमन ठरवूनच आम्ही इथे आलो होतो. मी रोमला आल्यावर
हर्षवर्धनला तसे सांगितले देखील ! तो हसून म्हणाला "अहो ते नंतर, आधी रोम तरी
बघा".
कुणीतरी असे म्हणाले आहे कि, नुसते रोम मध्ये
असणे, "टू बी इन रोम' हीच एक अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. खरोखरच रोम मध्ये निवांत
राहून वास्तुशिल्पी मुलाबरोबर रोम मधील ऐतिहासिक वास्तूंची माहिती घेत भटकणे या पेक्षा
'रोमां'चकारक दुसरी घटना काय असू शकेल? रोम केवळ गातायुश्याच्या
चिंतनात, गतवैभवाच्या अभिमानात हरवून गेलेले नाही. चैतन्याचा ओघ, कलेचे निरनिराळे आविष्कार
हि येथे अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच रोम शहराला ‘इटर्नल सिटी’ किंवा मराठीत
'अमरनगरी असे म्हणतात. रोम हि इटलीची राजधानी, इटली या देशाचे राजकीय व देशाच्या
अर्थकारणाचे प्रमुख केंद्रस्थान ! दोन, तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि वर्तमान
काळ इथे सतत हातात हात धरून गुण्यागोविंदाने नांदत असते. ठीकठिकाणी ऐतिहासिक पुरातन
अवशेष, जुन्या इमारती, पुतळे या बरोबरच आधुनिक राहणीमान आधुनिक इमारती, नाईट लाइफ हि
रोमची ओळख म्हणता येईल.
रोम ला २००० पेक्षा जास्त वर्षापूर्वीचा इतिहास
आहे. नेपोलियन, सीझर, गरीबल्डी, बर्निनी, मायकेल अन्जेलो, राफेल, पोप या आणि यांच्या
सारख्या असंख्य मोठ्या लोकांनी येथे आपला ठसा उमटवला आहे. अद्वितीय कलाकार, चित्रकार,
शिल्पकार, विचारवंत, साहित्यकार, राजकारणी या भूमीत होऊन गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे या ऐतिहासिक घटनाचा वारसा इटलीने
अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. तांत्रिक प्रगतीच्या घोडदौडी बरोबरच इटालियन लोकांनी
आपला ऐतिहासिक वारसा जीवापाड जपला आहे. मी न कळत इटलीची भारताबरोबर तुलना करू लागलो...
इटालियन खाद्यसंस्कृती
रोम मध्ये स्थानिक लोकांच्या बरोबरीने किंवा कदाचित थोडे जास्तच
पर्यटक वास्तव्य करून असतात. रोम च्या रस्त्यावरून २००० वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या
साक्षीने मनमुराद भटकणे हा पर्यटकांचा आवडता छंद! मग भरपूर चालल्यावर पर्यटक रस्त्यावरील
छोट्या छोट्या उपहारगृहात गर्दी करतात. या उपहारगृहातील बाहेरच्या बाजूला रस्त्यावरच
मांडलेल्या आणि सजवलेल्या टेबल खुर्च्यांवर बसून पर्यटक गप्पा मारत इटालीयन पदार्थांवर
ताव मारीत असतात. इटली मध्ये खाद्यपदार्थात सर्वात वरचा नंबर लागतो तो म्हणजे लोकप्रिय
'पिझ्झा'. पिझ्झा या पदार्थाचे उगमस्थान म्हणजे दक्षिण इटली मधील 'नेपल्स' हे शहर! निरनिराळ्या स्वादाचा पिझ्झा रोम मधील (खरे तर इटलीमधील
कुठल्याही शहरात) रेस्टोरंट मध्ये बसून खाणे हा पर्यटकांसाठी मोठ्या आनंदाचा भाग असतो.
आणि इटालीयन खाद्य पदार्थांसोबत विकतच्या पाण्यापेक्षा स्वस्त असलेल्या बियर चे घोट
घेणे म्हणजे म्हणजे आनंदाची परिसीमाच…!
इटली मधील आमच्या वास्तव्यात मी 'इटालियन पदार्थच खायचे' असे
जाताना ठरवूनच गेलो होतो. त्यामुळे आम्ही शकतो अस्सल इटालियन रेस्टॉरंट मध्ये जायचो
आणि प्रत्येक वेळी नवीन पदार्थ चाखायचो. इटालियन पदार्थांची नावे खूप अनोळखी असायची,
पण हर्षवर्धन रोम मध्ये वर्षभर राहिलेला असल्यामुळे त्याला बरीचशी माहिती होती. या
इटालियन पदार्थामध्ये काही पदार्थ मला आवडले होते. उदा. 'पास्ता आला अराबियाता'
(Pasta alla Arrabiata) हा पास्त्याचा प्रकार टोमॅटोचा सॉस व ओरेगानो म्हणजे विशिष्ठ
स्वादाचा मसाला घालून केलेला असतो. पास्त्याचा आणखीन के प्रकार म्हणजे 'पास्ता कार्बोनारा'
(Pasta Carbonara). या मध्ये भरपूर चीज बरोबर भाजलेल्या ‘पोर्क’ चे तुकडे घातलेले असतात.
खमंग भाजलेल्या पोर्क च्या तुकड्यांनी सजलेला हा पास्ता कार्बोनारा खाताना अस्सल खवय्या
तृप्त झालाच पाहिजे.
पिझ्झा हा तर मूळ इटालियन पदार्थ, जो जगभर लोकप्रिय आहे. आपल्या इंडियन पिझ्झ्या पेक्षा हा वेगळाच लागतो. इथला पिझ्झा वेगळ्याच स्वादाचा, खुपसा कमी तिखट, कमी मीठ असलेला, आणि पातळ जाडीचा असतो. नेपल्स उर्फ नापोली हे शहर पिझ्झ्याचे उगमस्थान. 'पिझ्झा नापोलीताना' (Pizza Napolitana) हा वैशिष्ठ्यपूर्ण पिझ्झा इटलीतील वास्त्यव्यात खुपदा खाल्ला. यात चीज तर भरपूर असायचेच पण त्यावर फिश च्या तुकड्यांचे टॉपिंग असायचे. इटली मधील ‘बोलोनिया’ नावाच्या शहरावरून नाव पडलेला एक पदार्थ 'लाझान्या बोलोन्येसा'(Lesagna Bolognesa) सुरवातीला खाताना मला आवडला, पण खाता खाता हर्षवर्धनने सांगितले कि बीफ च्या बारीक बारीक तुकड्यांनी (बीफ चा खिमा) हा बनलेला आहे. मग माझा मूड गेला आणि मी ती डिश न खाता तशीच ठेवली. (संस्कार… दुसरे काय)

पिझ्झा या स्थानिक पदार्थाव्यतरिक्त येथील उपहारगृहात पोर्क, बीफ, चिकन असे अनेक मांसाहारी पदार्थही मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मी इटली मधील वास्तव्यात सर्व पदार्थ चाखून पाहिले. अनेक निरनिराळ्या प्रकारची सलाड्स खाण्याची सुद्धा मजा काही औरच असते. इटली मध्ये भारतीय, नेपाळी, पाकिस्तानी, इस्तंबूल (टर्किश) उपहारगृहे देखील भरपूर प्रमाणात दिसली. इस्तंबूल उपहारगृहातील 'कबाब' मला फार आवडायचे. एकदा आम्ही एका नेपाळी उपहारगृहात भारतीय पद्धतीचे जेवण घेतले.
जेवण झाल्यावर आइसक्रीम खाणे हि खास युरोपियन संस्कृती. इटली हि त्याला अपवाद नाही. आईस्क्रीम चे विविध प्रकार इटलीत मिळतात. इथे आईस्क्रीम ला ‘जिलाटो’ (Gelato) म्हणतात. इथे एक ते दीड युरो ला आईस्क्रीम ने भरगच्च भरलेला मोठा कोन खाताना काय मजा यायची म्हणून सांगू. 'तीरामीसु' (Tiramisu) नावाचा एक अफलातून चव असलेला केक आम्ही खुपदा खायचो. त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे…
रोम शहराच्या मधोमध वाहणाऱ्या 'टायबर' (Tiber) नदीच्या किनाऱ्यावर
दुतर्फा असलेल्या रेस्टोरंट (खरे तर टपऱ्या) मध्ये बसून खादाडी करणे म्हणजे काहीसे
आपल्याकडील चौपाटीवर धमाल करण्यासारखे असते. आम्ही कधी कधी रोम मधल्या या टायबर किनारी
असलेल्या चौपाटीवर जाऊन हादडायचो. इटालीयन पदार्थ मात्र काहीसे मिळमिळीत व सपक लागतात.
(मी बरोबर मीठ घेऊन गेलो होतो म्हणून बरे, नाहीतर अवघडच झाले असते. हा हा…)
जुन्या रोम शहरातील रस्ते थोडे अरुंद असून छोट्या छोट्या चौकोनी
घडीव दगडांचे आहेत. रस्त्यावर दुतर्फा टेबल खुर्च्या मांडून सजवलेली छोटी छोटी उपहार
गृहे असतात. रस्त्यावरील या कॅफे मध्ये निवांत पणे बसून गप्पा मारणे हा येथील लोकांचा
तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांचा आवडता छंद असतो. या रस्त्यावरील उपहार गृहात असंख्य पर्यटक
कॉफी किंवा बियरचा स्वाद घेत आपला वेळ आनंदात व्यतिथ करत असतात. इटालियन कॉफी अतिशय
लोकप्रिय आहे. रोममधील रस्त्यावर भटकताना संपूर्ण वातावरणात इटालियन कॉफीचा सुगंध दरवळत
असतो. इटालियन कॉफी बनवण्याची पद्धत आपण बनवतो त्यापेक्षा अतिशय वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण
अशी असते. इटालियन कॉफी अतिशय स्ट्रॉंग असते, त्यामुळे ती अतिशय कडवट असते. दुधाशिवाय
साखर न घालता काहीशी दाट अशी स्ट्रॉंग कॉफीचा एक शॉट (३ इंच उंचीच्या छोट्या काचेच्या
ग्लास मध्ये मावेल एव्हडीच कॉफी) घेण्याची इथे पद्धत आहे. मला मात्र हि इटालियन कॉफी
फारशी झेपली नाही. मी कॉफी दुध, साखर घालूनच घ्यायचो.
'पियात्झा नोव्होना' ‘पँथिऑन’ व 'कसेल सांत एन्जेलो''
दि. २८ : 'रोम'च्या
रस्त्यावर मन मुराद भटकणे हा एक अतिशय आनंददायी आणि काहीसा वेगळाच अनुभव असतो, तो अनुभव
प्रत्यक्ष घेतल्याशिवाय त्यातली मजा कळणार नाही. रोम शहराची रचना फार आकर्षक आहे. पुरातन
काळापासूनच हि रचना आकर्षक होती आणि आता एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील बांधकामातही
हि आकर्षकता पुरातन रचनेशी मिळती जुळती ठेवण्याचा इटालियन लोकांनी प्रयत्न केला आहे.
रोम मधील भुयारी मेट्रो चा प्रवास हि खूप रोमांचकारी असायचा. आम्ही रोजच मेट्रोने प्रवास करायचो. मेट्रो चा आठवड्याचा पास काढलेला असल्यामुळे आम्ही कधीही, कुठेही आणि कितीही वेळा प्रवास करू शकत होतो. इटली मध्ये अतिशय वेळेवर धावणाऱ्या मेट्रो चा प्रवास करणे हा एक सुखद अनुभव असतो. रोम मध्ये गर्दी असूनही कुठेही धावपळ, गोंधळ नसायचा. दहा पंधरा दिवस रोजचा मेट्रो चा प्रवास करताना सतत प्रत्येक स्टेशन च्या थांब्याची आठवण करून देणाऱ्या इटालियन भाषेतील अनाऊन्समेंट्स माझ्या कानावर पडायच्या, त्यामुळे माझ्या त्या जवळ जवळ पाठच झाल्या होत्या. सुरवातीला त्या मला समजत नसत. हर्षवर्धन ने एकदा त्यांचा अर्थ समजावून सांगितला आणि मग काहीसे सोपे झाले. आता हेच बघा ना... प्रोस्सीमा फेर्माता 'कोलोसियो' उशीता लातो देस्त्रो ( Prossima Fermata 'Colocio' Uscita Lato Destro) याचा मराठीत अर्थ 'यापुढचा थांबा (स्टॉप) 'कोलोसिओ' असून प्रवाशांनी उजवीकडून बाहेर पडावे'. उजव्या बाजूला 'देस्त्रो' असे म्हणतात, तर डाव्या बाजूला सिनिस्त्रो (Sinistro) म्हणतात. काही दिवसानंतर मला डाव्या उजव्या चा अंदाज येऊ लागला. आम्ही ‘सबअगुस्ता’ या रोमच्या उपनगरीय भागात राहत होतो. रोम मधील स्टेशन्स ची नवे देखील गंमतशीर होती. जसे पोतेलांगो, स्पान्या (Spagna), चिनेचित्ता (Cinecitta), पिरॅमीदे (Piramide), तर्मिनी
(Tarmini), कोलोसिओ (Colocio) वगैरे. ही नावे लक्षात ठेवता ठेवता माझी दमछाक व्हायची. इटालियन भाषा विशिष्ठ हेल काढून बोलतात. स्पॅनिश भाषेशी जवळीक साधणारी इटालियन भाषा ऐकायला खूप गोड वाटते. इटालियन भाषेत बोलताना 'ट' चा उच्चार 'त' असा किंवा 'ड' चा उच्चार 'द' असा करतात.जसे डेस्ट्रो हा शब्द 'देस्त्रो' असा उच्चारला जातो. हा उच्चारातील फरक कधी कधी खूप विनोद निर्माण करतो. (माझ्याकडे युथ एक्सेंज या रोटरीच्या कार्यक्रमांतर्गत राहायला आलेली ब्राझील ची क्रिस्तीना 'रोटरी' ह्या शब्दाचा उच्चार 'होतरी' असा करायची. तिची मातृभाषा पोर्तुगीज होती. त्यामुळे आम्हाला हसू यायचे.) मला स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज ह्या भाषा ऐकताना उगीचच सारख्या वाटतात. आपल्याकडे जशा कन्नड, तेलगु, तामिळ भाषा आपल्याला सारख्याच वाटतात, तसंच काहीसं...
आज २८ तारखेला आम्ही 'पियात्झा नोव्होना' ‘पँथिऑन’ व 'कसेल सांत एन्जेलो' हि रोम मधील सुप्रसिद्ध ठिकाणे बघायची ठरवली.
आज घरातून आम्ही थोडे लवकरच बाहेर पडलो.घराजवळच्या साबागुस्तास मेट्रो स्टेशन वरून
निघून तर्मिनी या रोमच्या मध्यवर्ती भागातल्या स्टेशनवर उतरलो. तर्मिनी स्टेशन मध्यवर्ती
असल्याने व बऱ्याचश्या प्राचीन प्रेक्षणीय स्थळाच्या जवळ असल्या कारणाने इथे कायम गर्दी
असते. स्टेशन मधून बाहेर येउन पुन्हा एका छोट्या बस प्रवासानंतर आम्ही 'पियात्सा नोव्होना'
या जगप्रसिध्द चौका जवळ आलो. या चौकाचे २००० वर्षापूर्वीचा ऐतिहासिक महत्व असल्याने
इथे पर्यटकांची तोबा गर्दी असते. तसे आम्ही २००५ साली या चौकाला भेट दिली होती, पण
आज थोडा निवांतपणा होता. माहिती द्यायला हर्षवर्धन हि होता. एका निमुळत्या रस्त्यावरून
आम्ही या नोव्होना चौकाच्या भव्य प्रांगणात प्रवेश केला.
एका भव्य अशा जहाजाच्या लंब वर्तुळाकार असा आकार या चौकाला आहे. रोम मधील हा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध चौक ! इसवी सनाच्या पहिल्या शतकात इथे या चौकात भल्या मोठ्या स्टेडीयम सारखी रचना होती. नोव्होना या इटालियन शब्दाचा अर्थ मोठं जहाज. या चौकाच्या सर्व बाजूनी प्राचीन काळातल्या इमारती आहेत. या लांबट गोल चौकोनासारख्या आकाराच्या चौकाच्या मध्यभागी अतिशय भव्य, सुंदर कोरीव शिल्पांनी सजवलेली तीन कारंजी आहेत. बर्निनी नावाच्या महान कलाकाराने हि कारंजी बांधलेली आहेत. दोन हजार वर्षापासून इथे बरीच शतके बाजार भरायचा. कधी कधी इथे सार्वजनिक खेळ हि खेळले जायचे. रथांच्या शैर्यती खेळल्या जायच्या. विसाव्या शतकात मात्र चौकाचे स्वरूप शोभिवंत कारंज्यानी नटलेला चौक असे झाले असून पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय होऊन राहिला आहे.
नोव्होना
चौकाच्या मध्यभागी असलेल्या तीन करंज्या पैकी मधल्या करण्यासमोर आम्ही उभे राहिलो.
इथे पृथ्वी वरील चार खंडातील महत्वाच्या मोठ्या नद्यांचे पाणी येथे या कारंज्यातून
खेळवले गेले आहे आशी आख्यायीका आहे. उत्तमोत्तम पुतळ्यांनी सजवलेल्या या भव्य कारंज्यात
सगळ्या पृथ्वीची सांगड घालून बर्निनी या महान कलाकाराने नाव्होना कारंज्यात आपला अक्षरशः
आपला जीव ओतला आहे. युरोप खंडातली डैन्यूब, अमेरिकेची प्लाट, आफ्रिका खंडातली नाईल,
आणि अशिया खंडातली म्हणजे चक्क आपल्या भारतातील गंगा या चार नद्यांची प्रतीके या नाव्होना
कारंज्यात आकारलेली आहेत. त्या त्या नदीच्या पाण्याशी त्या त्या खंडातली वैशिष्ट्ये
असलेली शिल्पे आहेत. या प्राचीन कारंज्यात भारतीय गंगा नदीचे प्रतिक पाहून माझा जीव
सुखावला. या कारंज्यापाशी उभे राहून आम्ही भरपूर फोटो व सेल्फी काढल्या. या चौकातल्या
जादुई वातावरणातून आमचा पाय निघतच नव्हता, पण आज संत एन्जेलो चा किल्ला बघायचा असे
आम्ही निघतानाच ठरवलेले होते. कमी दिवसांच्या वास्तव्यात रोम मधील असंख्य ठिकाणे बघायची
होती त्यामुळे नाईलाजानेच आम्ही निघालो…
पँथिऑन
या चौकाच्या पलीकडेच पियात्झा डेला रोटंडा
नावाचा चौक आहे. तिथे पँथिऑन हि जुन्या काळातील प्रचंड वास्तू आहे. पँथिऑन म्हणजे सर्व
देवतांचे मंदिर. इ.सन. १३० मध्ये बांधलेली हि वास्तू म्हणजे वास्तुकलेतला एक चमत्कार
म्हणता येईल. आम्ही उत्सुकतेने चालतच निघालो. मध्य रोम मधील रस्त्यावरून चालणे म्हणजे
एक धमाल असते. अतिशय छोटे, वळत जाणाऱ्या अरुंद दगडी रस्त्यावरून जाताना आजूबाजूला अनेक
दुकानं होती. आजूबाजूला पाच सहा मजली जुन्या, सलग एकाला एक लागून असलेल्या इमारती रोम
चे सौंदर्य नक्कीच वाढवतात. रस्त्यावरच दुतर्फा छोट्या फुटपाथ वर मांडलेल्या टेबल खुर्च्यांवर
शेकडो पर्यटक आरामात विसावलेले होते. आसमंतात इटालियन कॉफी चा वास दरवळत होता. रस्ते
इतके छोटे होते कि खालीपर्यंत उनही येत नव्हते, त्यामुळे फिरताना उन्हाचा त्रासही जाणवत
नव्हता. तीन चार वळणानंतर लगेचच एक मोठा चौक लागला.
चौकाच्या एका बाजूला पँथिऑन देऊळ आणि चौकाच्या मधोमध एक जंगी स्तंभ (ओबेलिस्क) उभा होता. पर्यटकांची गर्दी होतीच. पँथिऑन ची हि इमारत पाहण्याचा योग आमच्या पूर्वीच्या रोम भेटीत आला नव्हता. त्यामुळे आम्ही उत्सुकतेने पँथिऑन मध्ये शिरलो.

ही केशरी रंगांच्या विटांनी बांधलेली भव्य वास्तू असून तशी या वास्तूची रचना आगदी साधी
आहे. सुरवातीलाच ग्रानाइट च्या सोळा डौलदार खांबांनी बनलेलं भव्य पोर्च लागतं. आत त्याहूनही
अति भव्य गोलाकार देऊळ, आणि त्यावर तसाच सुंदर भव्य घुमट. रोम मध्ये भटकताना पँथिऑन
चा घुमट आम्हाला सतत दिसत होता. ही इमारत पाहताना काहीतरी अद्वितीय, अद्भुत पहिल्याचा
साक्षात्कार होतो आहे असे जाणवते.
आतमध्ये प्रवेश केल्यावर असे लक्षात आले की
या देवळात हवा किंवा प्रकाश येण्यासाठी एकही खिडकी नाही. फक्त छतावरच्या घुमटावर एक
गोलाकार मोठे भोक आहे घुमटाला असलेल्या या भोकातून दुपारची तिरपी सूर्यकिरणे आतमध्ये
येत होती. घुमटावरच्या या भोकाला 'ऑक्युलस' म्हणजे डोळाच असे म्हणतात. हा डोळा नऊ मीटर व्यासाचा आहे.
एकेकाळी हे मंदिर फार वैभवशाली होते. आतील भिंती संगमरवराच्या होत्या. आतल्या प्रशस्त
गोलाकार भिंतीमध्ये कोनाडे आहेत, आणि प्रत्येक कोनाड्यात एक देवाची प्रतिमा आहे. वरचा
घुमट आतील बाजूने ब्रांझ च्या जाड पत्र्याने मढवलेला होता. हा घुमट म्हणजे २००० वर्षापूर्वीच्या
वास्तू कलेचा आश्चर्यकारक नमुनाच आहे. हा घुमट जगातला सर्वात सुंदर घुमट समजला जातो.
या घुमटाचा व्यासच मुळी अंदाजे ४५ मीटर एव्हडा आहे. हा एव्हडा मोठा घुमट कोणत्याही
खांबांच्या आधाराशिवाय उभा करणे तेही दोन हजार वर्षापूर्वी… मी विचार करता करता थकत होतो.
तेव्हड्यात अलकाने एक शंका विचारली 'घुमटावरच्या गोल मोठ्या भोकातून पावसाचे पाणी आत
येत असणार, त्याचे काय'? हर्षवर्धन ने सांगितले कि त्यावेळी हा ही विचार करण्यात आला
होता. इथे आत येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आतील जमिनीवरच्या फरशीवर
न लक्षात येण्यासारखी छोटी भोकं ठेवली आहेत. त्यामुळे कितीही पाउस आला तरी पँथिऑन चं
तळ कधीच होत नाही. सांगितल्यानंतर खूप निरखून बघितल्यावर आमच्या लक्षात हि गोष्ट आली.
पँथिऑन च्या आत माझी नजर फिरत होती. दरवाज्याच्या
बरोब्बर समोर मेरी ची मूर्ती आहे. पूर्वी म्हणे ज्युपिटर देवाची मूर्ती होती. आत मध्ये
पर्यटकांची भरपूर वर्दळ असून देखील कमालीची शांतता व पावित्र्यपूर्ण वातावरण होते.
दोन हजार वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली हि अजब वास्तू एव्हड्या
मोठ्या कालप्रवाहात अखंड राहिली आहे. हर्षवर्धन ने त्याच्या वास्तुशास्त्राच्या अभ्यासक्रमात
इटलीतल्या या आणि अशा स्थळांची माहिती अभ्यासलेली असल्यामुळे तो आम्हाला पँथिऑन मधले
बांधकामातील शास्त्रीय बारकावे सांगत होता. आम्हाला ते सगळेच समजत होते असे नाही, पण
काहीतरी अद्भुत पाहिल्याचे समाधान मात्र मिळत होते…
‘सांत एन्जेलो' चा किल्ला
या चौकातून बाहेर पडून आम्ही रोम च्या दक्षिणेकडे
जाणाऱ्या बस मध्ये शिरलो. हर्षवर्धन ला रोमची सर्व माहिती असल्याने ट्रामने, बसने किंवा
चालत रोम मध्ये भटकणे आम्हाला सोपे जात होते. दोन थांब्या नंतर गोल भव्य बुरुजांचा
एक भुईकोट किल्ला दिसला. आम्ही बसमधून उतरलो. किल्ल्या समोर किल्ल्याकडे जाताना सान
अन्जेलो पूल होता. हा किल्ला टायबर नदीच्या काठी बांधलेला आहे. त्या पलीकडे सुरवातीलाच
एक वीस पंचवीस फुट खोल असा भला मोठा खंदक लागला. पूर्वीच्या काळी यात पाणी भरलेले असायचे.
आता त्यात हिरवळ लावली होती. खंदकाच्या पलीकडे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी किल्ल्याचा
संपूर्ण इतिहास लिहिलेल्या पाट्या होत्या.
रोम चा सम्राट हेड्रीयन याने सुरवातीला आपल्या
कुटुंबियांचे मृत्यू-स्मारक म्हणून इथे एक वास्तू उभी केली. नंतर पाचव्या शतकात या
स्थळाला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले. कारण रोमवर गॉथ या रानटी लोकांचे हल्ले होत.
चौदाव्या शतकातल्या पोप ने या किल्ल्याचे महत्व ओळखून इथून जवळच असलेल्या रोम शहरातल्या
सेंट पीटर्स कॅथेड्रल पासून इथे या किल्ल्यावर जाण्यायेण्यासाठी एक भुयारी मार्गही
बांधला. स्पेन च्या चार्ल्स राजाने जेंव्हा रोम करून जिंकल तेंव्हा याच भुयारी मार्गाचा
वापर करून पोप या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. नंतरचे पोप सुरक्षितते साठी इथे या
किल्ल्यावरच राहिले. त्यांनी नंतरच्या काळात सुखसोयींनी परिपूर्ण अशी अनेक दालने किल्ल्याच्या
वरील भागात बांधली. यातील बरीचशी दालने बंद असून काही दालनातून पुरातन वस्तू, शस्त्र,
चित्र, मांडून ठेवलेली होती.
मुख्य किल्ल्याच्या आणि या वरच्या भागात असलेल्या दालनांच्या मध्ये एक वैशिष्ठ्यपूर्ण असा हलता लाकडी पूल आहे. हा पूल पूर्णपणे काढून टाकायची सोय आहे. त्यामुळे शत्रूचा हल्ला होताच हा पूल काढून टाकण्यात येई त्यामुळे किल्ल्या पासून राहणायची दालने वेगळी होत व आतील माणसे सुरक्षित राहत. शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी, बचावासाठी हि आणि अशा अनेक कल्पक योजना या किल्ल्यात आहेत.

जवळ जवळ एकोणीसशे वर्षापूर्वीचा हा किल्ला
अजूनही भक्कम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाताना गोलाकार मार्गाच्या जिन्यावरून आम्ही
जात होतो. पर्यटकांची गर्दी होतीच. किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी अंगणा सारखी दिसणारी
एक मोकळी जागा होती. या गच्ची सारख्या जागेतील बराचसा भाग उघडा आणि काही भागात दालने
होती. आम्ही या किल्ल्याच्या सर्वोच्च भागातल्या एका कडेच्या टोकावर उभे राहिलो. समोर,
सभोवताली संपूर्ण रोम शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. किल्याच्या खाली, पायाशी चिमुकली
टायबर नदी एखाद्या पाण्याच्या ओहोळा समान भासत होती. दूरवर रोमच्या क्षितीज रेषेवर
ओळख देणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे दिसत होती. जवळच सेंट पीटर्स चा भव्य घुमट छोटासा
भासत होता. बराच वेळ रोम शहराचे दृष्य डोळ्यात साठवत आम्ही तिथे रेंगाळलो. आणि मग वरची
गोल चक्कर मारून आम्ही पुन्हा खाली उतरलो.
रोम मध्ये भटकताना बस, मेट्रो (भुयारि रेल्वे)
आणि भरपूर चालत फिरायला पाहिजे. टेक अवे उपहारगृहातून तेथील अस्सल स्वाद असलेले पास्ता,
पिझ्झ्या सारखे पदार्थ खात आम्ही आज यथेच्छ भटकलो. संध्याकाळी हर्शवर्धनचे मित्र आम्हाला
भेटायला आले होते. त्यांच्या बरोबर पास्ता व तिरामिसु नावाचा आईस्क्रीम केक चे जेवण
असा धमाल कार्यक्रम होता.
'पिअत्सा व्हेनिझिया’, ‘व्हिक्टर
इमनुएल मॉन्युमेंट’, 'त्रेजन कॉलम' वगैरे वगैरे …
दि. २९: काल आम्ही जाम भटकलो. पायाचे अक्षरशः तुकडे पडले.
भरपूर उन होते. (पण इतिहासाचा मागोवा घेताना ते आजीबात जाणवत नाही.) इथे सकाळी
५ वाजता उजाडते आणि रात्री ९ वाजता सूर्यास्त होतो. त्यानंतरही जवळजवळ ११ वाजेपर्यंत
संधिप्रकाश असतो. त्यामुळे तब्बल १६ तासाचा दिवस 'रोमो' माळ (रानोमाळ च्या धर्तीवर)
आम्हाला सध्या भटकायला मिळतेय. काल सकाळी ८ वाजता बाहेर पडलेलो आम्ही रात्री १०
वाजता घरी परतलो. दिवस मोठा असण्याचा असाही एक फायदा!
शंभर हून अधिक प्राचीन स्थळे, तब्बल अडीचशे प्राचीन चर्च, जवळजवळ
शंभरावर संग्रहालये, अगणित कला दालने असलेले रोम शहर बघणे कोणत्याही पर्यटकाला केवळ
अशक्य आहे. खुद्द इटालियन लोकच म्हणतात कि 'रोमा नॉन बास्ता उना व्हिता' म्हणजे 'रोम
बघायला एक आयुष्य अपुरं' ! त्यामुळे सगळंच बघण्याचा हव्यास न धरत ठरवून वेचक स्थळेच
बघावीत आणि समाधान मानावे हे रोम मध्ये भटकंती करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने लक्षात
ठेवले पाहिजे. आज आम्ही पियात्सा व्हेनेत्झिया या रोम मधील सुप्रसिध्द चौकात जायचे
ठरवले. रोजच्या प्रमाणे सुरवातीला भुयारी मेट्रो, व बस चा घरापासून सुमारे अर्ध्या
तासाचा प्रवास करून आम्ही व्हेनेत्झिया चौकात पोहोचलो.
आपल्या पुण्यात शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाला जसे दिल्ली दरवाजाचे नाव दिले आहे, तसं या चौकाला व्हेनिस चं नाव दिलं आहे, कारण या चौकाचे असलेले महत्व. हा चौक म्हणजे रोम शहराचा केंद्रबिंदू. या चौकाची मूळ जागा व्हेनिस च्या राजाच्या राजाच्या मालकीची होती त्यामुळेही असेल या चौकाला व्हेनित्झिया असे नाव पडले असावे. संपूर्ण रोम शहर सात टेकड्या च्या वर वसलेले असल्याने रोम शहरभर असलेल्या चढ उतारा प्रमाणे चढ उतार याही चौकात आहेत. चौकाच्या एका कडेच्या चढावर उंच जागी 'व्हिक्टर इमॅन्यूएल' या नावाची एक बांधलेली एक भव्य, म्हणजे अक्षरशः डोळ्यात न मावणारी एक इमारत आहे. चौकाच्या मध्यभागी सुन्दर हिरवालीचा भाग आहे. या मधल्या हिरावली भोवती सहा पदरी रस्ते व त्यावरून सतत वाहणारी रहदारी असते. या चौकातील सुसाट वाहणाऱ्या वाहनांच्या मधून कसेबसे, जीव मुठीत धरून आम्ही रस्ता ओलांडून 'व्हिक्टर इमॅन्यूएल मॉन्यूमेंट' (स्मारक) च्या बाजूला आलो.

हा चौक अतिशय भव्य आहे. रोम मधील सर्व सार्वजनिक
सोहळे याच चौकात पार पडतात.
चौकातील एका बाजूच्या लाल विटांच्या सुंदर इमारतीवर एक पांढरा सज्जा (बाल्कनी) दिसला. दुसऱ्या महायुद्धात इटलीचा कुप्रसिद्ध हुकुमशहा ‘मुसोलिनी’ ज्या बाल्कनीत उभे राहून आपल्या प्रभावी भाषणाने खाली जमलेल्या जनतेला असंख्य जनतेला मंत्रमुग्ध करीत असे. आपल्या अमोघ वक्तृत्वाची मोहिनी टाकून १९२५ पासून पुढे वीस वर्षे त्याने पूर्ण इटलीवर राज्य केलं. जर्मनांशी (हिटलर बरोबर) हातमिळवणी करून त्याने इटलीला दुसऱ्या महायुद्धात खेचलं. हर्षवर्धन सांगत होता कि, दुसरया महायुद्धात इटलीने सामील व्हायची घोषणा मुसोलिनीने याच बाल्कनीत उभे राहून केलेल्या भाषणात केली होती. ते भाषण इतके प्रभावी होते कि तेथे जमलेल्या लोकांनी उत्साहित होऊन 'युद्ध' युद्ध' अशा आरोळ्या ठोकल्या. पण या चुकीच्या निर्णयाचे जे व्हायचे होते तेच झाले आणि अतोनात नुकसानीसह इटलीचा दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी पराभव केला. याच मोसोलीनीला नंतर मिलान शहरात भर चौकात फाशी देण्यात आले. हिटलर बरोबर हातमिळवणी करण्याचा चुकीचा निर्णय मुसोलिनीला भोगावा लागला. हिटलर ला जर्मनी ने किंवा इराण ने शहा ला जसे पूर्णपणे पुसले आहे तसे इटली हि मुसोलिनीच्या कडवट आठवणी पुसू पाहते आहे. मुसोलिनी चांगला वाईट कसाही असला तरी त्यानं इटलीचा जवळ जवळ साठ सत्तर वर्षांचा इतिहास रचला आहे हे विसरून चालणार नाही. मी न कळत दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहास काळात गेलो….

पिआत्झा व्हेनिझिया या चौकातच एका बाजूला रस्ता
क्रॉस करून गेले कि नवीन आधुनिक इमारतींच्या मध्ये फुटपाथला लागुनच एक कोरीव स्तंभ
आपल्याला दिसतो. त्याला 'त्रेजन कॉलम'
असे म्हणतात. तो ई.स.११४ मध्ये बांधण्यात आला आहे. ‘त्रेजन’ या रोमन सम्राटाच्या पराक्रमाचे
प्रतिक म्हणून बांधला आहे. या सम्राटाच्या यशस्वी युद्ध कथा या भव्य स्तंभावर कोरल्या
आहेत. व्हिक्टर इमन्युएल मॉन्युमेंट ई.स.११९९ मध्ये
बांधले गेले आणि त्याच चौकातील त्रेजन चा विजयस्तंभ चा काळ ई.स. ११४ चा. म्हणजे फक्त
रस्ता क्रॉस केला कि दोन हजार वर्षाच्या भूतकाळात प्रवेश करता. वर्तमान ते प्राचीन
इतिहास असा प्रवास रोम मध्ये खुपदा घडतो. त्या
नंतर आम्ही रमतगमत, गप्पा मारत, हर्षवर्धन ची बडबड ऐकत रोमन फोरम, कलोसियम, आर्च ऑफ
कॉनस्टनटाइन हि प्रेक्षणीय स्थळे पाहिली. मधून मधून इटालीयन पदार्थ खात होतो.
पिआत्झा व्हेनिझिया, त्रेजन कॉलम बघून आम्ही
'रोमन फोरम' बघायचे ठरवले. रोम मध्ये रोमन फोरम, कलोसियम, आर्च ऑफ कॉनस्टनटाइन, पिआत्झा
व्हेनिझिया, त्रेजन कॉलम हि सर्व ठिकाणे चालत जाता जाता बघत येण्या इतकी जवळ जवळ आहेत.
पिआत्झा व्हेनिझिया च्या पाठीमागे जाणारा एक प्रशस्त असा मोठा रस्ता थेट कलोसियम कडे
जातो. या साधारणपणे एक हजार मीटर लांबीच्या म्हणजे अंदाजे तीन हजार फुट लांबीच्या रस्त्यावरून
जाताना आपण जवळ जवळ अडीच हजार वर्षांचा इतिहास पार करीत असतो. म्हणूनच कि काय या रस्त्याला
'इम्पिरिअल रोड' किंवा राजरस्ता असे नाव आहे. याच रस्त्याच्या दुतर्फा रोमन फोरम आहे.
रोमन फोरम म्हणजे रोमन काळातले व्यापारी उलाढालीचे प्रमुख केंद्र ! पूर्वीच्या काळी
ह्या भागाला फार महत्व होते. ह्या भागाला रोमन फोरम असे नवा असले तरी रोमनांच्या आधी
देखील हि जागा वापरात होती.रोमन लोकांच्या आधी वसाहतीस असलेले एत्रुस्कन लोकांचं हे
स्मशान होतं. रोमन लोकांचे प्राबल्य वाढल्यावर रोमनांनी येथील जागा स्वच्छ केली, इथली
दलदल हटवली. आणि आपला फोरम उभारला. तिथं मंदिरं, न्यायालये म्हणजेच नंतरच्या काळात
झालेली चर्चेस, शत्रू विजयाचं स्मारक म्हणून उभ्या केलेल्या भव्य कमानी उभारल्या. जवळ
जवळ नऊ दहा शतके हे ठिकाण रोमन साम्राज्याची व्यापारी उलाढाल करणारे एक महत्वाचे केंद्र
होते. इथे फक्त बाजारच नव्हे सगळ्या नागरी आणि धार्मिक जीवनाची सूत्र इथं एकवटलेली
असत. देवळं, सेनेट हाउस, न्यायदान, विजयोत्सव, दुखाचे प्रसंग, जत्रा, एव्हडेच काय पण
वेश्याव्यवसाय देखील इथे चाले… सगळं या फोरम मध्ये चाले. मात्र निवासी घरे मात्र इथे नसत.\
इम्पिरिअल रोड वरून चालत चालत आम्ही निघालो. त्रेजन कॉलम च्या
बाजूलाच पुढे त्रेजन फोरम (त्रेजन सम्राटाच्या काळातील बाजारपेठ) सुरु होतो. भर दुपारची
वेळ असल्या मुळे उन्हाचा कडक जाणवत होता. पण दोन अडीच वर्षाच्या इतिहासात आम्ही इतके
गुंतून गेलो होतो कि उन्हाचे काहीच वाटत नव्हते. मधून मधून आईस्क्रीम खात आम्ही रोमन
फोरम मध्ये शिरलो. जगातल्या अनेक देशातील पर्यटकांचे घोळके च्या घोळके आतमध्ये फिरत
होते. त्यामुळे निरनिराळ्या भाषा कानावर पडत होत्या. कुणी एकट्याने हातात प्रवासी पुस्तक
हातात घेऊन फिरत होतं तर कुणी घोळक्याने ऐतिहासिक अवशेस बघत होते. काही प्रवासी यात्रा
कंपनीचा मार्गदर्शक बरोबर घेऊन त्यांच्याकडून माहिती घेत फिरत होते.
पैलेटाइन आणि कॅपिटल या डॉन छोट्या टेकड्यांमधे रोमन फोरम पसरलेला
आहे. कोलोसियम जवळच्या कॉन्टेस्टाइन च्या विजय कमानी पासून सुरु होणाऱ्या आणि कॅपिटल
टेकड़ी पर्यंत या बाजारपेठेतुन मध्यतून जाणरया 'व्हिया साक्रा' या रस्त्यावरून आम्ही
चालत निघालो. इथे इ. स. २०३ मध्ये बांधलेली आर्च ऑफ सेप्टीमीयस नावाची कमान अतिशय प्रेक्षणीय
आहे. जुन्या काळातली रोमन सिनेट ची इमारत या कमानीच्या जवळच आहे. इथेच पूर्वी टेम्पल
ऑफ वेस्ता म्हणजे अग्निमन्दिर होते. टायटस नावाच्या रोमन सम्राटाने जेरुसलेम वर जेंव्हा
विजय मिळवला त्य प्रीत्यर्थ इथे जवळच एक कमान उभी केली गेली. या कमानीला आर्च ऑफ टायटस
असे म्हणतात. इ.स. च्या सुरवातीला हि बांधली गेली.
रोमन फोरम हा एके काळी सर्व जगाच्या प्रेरणास्थानी होता. या रोमन फोरम मध्ये त्या काळी एक गोल्डन माइल स्टोन होता. तो सर्व रोमन साम्राज्याचा केंद्र बिंदू समजला जाई. या माईल स्टोन पासूनच जगात सर्वदूर जाणारे रस्ते सुरु होत व याची अंतरे याच दगडापासून मोजले जाई. जगातील प्रचलित असलेल्या सर्व परंपरांचे, नियमांचे उगमस्थान म्हणजे हा रोमन फोरम. त्यामुळे 'जगातील सर्व रस्ते रोम कडेच जातात' अशी इंग्रजीत एक म्हण देखील आहे. रोमन फोरम मध्ये इतिहासाचा पट उलघडणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत कि आपण एका दिवसात त्या समजाउन घेऊच शकत नाही. चालून चालून आम्ही दमलो होतो. रोमन फोरम च्या आगदी जवळ पलीकडे कोलोझीयम चे प्राचीन आणि जगप्रसिद्ध भव्य स्टेडीयम दिसत होते. मला तिकडे लगेच जायची इच्छा, उत्सुकता होती, पण सकाळपासून भटकत होतो. आता कोलोझियम आणि इतर गोष्टी नंतर बघू असे अलका म्हणाली. मग आम्ही संध्याकाळी मेट्रो ने पुन्हा आमच्या घरी परतलो.

दि. ३० : आज कोलोसियम आणि इतर काही ठिकाणे
निवांतपणे बघायची असे ठरवून आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो. नेहेमी प्रमाणे भुयारी मेट्रोतून
कोलोसिओ नावाच्या स्टेशन वर उतरून स्टेशन च्या समोरच असणाऱ्या दोन हजार वर्षापूर्वी
बांधलेल्या भव्य ऐतिहासिक स्टेडीयम कडे निघालो. तसे आम्ही परवाच २६ ता. ला संध्याकाळी
हर्षवार्धांच्या मित्रांना भेटण्यासाठी आलेलो होतोच. त्यावेळी संध्याकाळी पिवळ्या दिव्यांची
रोषणाईने उजळून निघालेले कोलोसियम वेगळेच भासले होते. आता सकाळच्या उन्हात थोडी पडझड
झालेले हे स्टेडीयम वेगळेच भासत होते. कोलोसियम आतून बघण्याची खूप उत्सुकता होती. स्टेशन
च्या बाहेर पडून एक मुख्य रस्ता ओलांडून आम्ही कोलोसियम च्या समोरच्या हिरवळीवरून आम्ही
या ऐतिहासिक वस्तूला न्याहाळू लागलो.
अनेक वर्षापासूनची हि वस्तू बघण्याची, जाणून
घेण्याची इच्छा मनात होती. आज मी प्रत्यक्ष कोलोसियम समोर उभा होतो. हेच कोलोसियम रोमन
साम्राज्याचं प्रतिक म्हणून जवळ जवळ पंधराशे वर्षापेक्षा जास्त काळ इथे उभं आहे. शिल्लक
राहिलेल्या अनेक रोमन स्माराकांपैकी एक आणि सर्वात मोठं ! किंचित लंबवर्तुळाकार, अतिभव्य
असं हे स्टेडीयम चार माजले उंच आहे. एक एक मजला अंदाजे चाळीस पन्नास फुट उंचीचा आहे.
या स्टेडीयम च्या मधल्या मैदानाबाहेरून दोन वर्तुळाकार भिंतींची तटबंदी आहे. बाहेरील
भिंतीचा काही भाग पडलेला आहे. कोलोसियम भोवती जवळून फिरताना त्याच्या भव्यतेची कल्पना
येते. 'ट्राव्हटाईन' नावाच्या फिकट लाल रंगाची छटा असलेल्या भल्या मोठ्या अजस्त्र दगडांनी
हि इमारत बांधली आहे. हा दगड साधारण संगमरवरा सारखाच पण छोटी छोटी छिद्रं असलेला असल्यामुळे
स्वस्त मिळायचा. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात संगमरवरी दगड मिळालेही अवघड आणि महागही.
त्यामुळे त्यावेळी हा दगड वापरणे स्वाभाविक असावे. लंब वर्तुळाकार आकाराच्या बाहेरच्या
भिंतीच्या आत आणखीन एक तटबंदी सारखी भिंत आहे आणि मग आत प्रेक्षकांना बसण्याची वरून
खाली अशी वर्तुळाकार व्यवस्था आणि मधोमध खाली लंब वर्तुळाकार मैदान !
या स्टेडीयम च्या बाहेरच्या भिंतीवर, कमानीवर,
खांबांवर मोठी मोठी गोल भोकं पडलेली दिसत होती. त्यामुळे कोलोसियम ची इमारत काहीशी
विद्रूप दिसत होती. न राहावून मी असे का असा प्रश्न हर्षवर्धन ला विचारला. हर्षवर्धनने
सांगितले कि, इथल्या भिंतींचे दगड एकमेकांवर रचताना, कमानी आणि भिंतीतले कोन साधताना
पूर्वी तांब्याचे रॉड, बिजागीऱ्या वापरल्या होत्या. अलीकडच्या लोकांनी त्या उचकटून,
चोरून नेल्या, त्यामुळे हि वास्तू खिळखिळी तर झालीच पण विद्रुपही झाली. मनात आले जगाच्या
पाठीवर कुठेही जा समाजकंटक मंडळी असतातच. बाहेरची भिंत जरी पडझड झालेली असली तरी आतली
भिंत अखंड आहे. बाहेरच्या भिंतीचे चारपैकी खालचे तीन मजले भव्य कामानीनी सजवलेले आहेत.
या कमानींमुळे एव्हडी भव्य इमारत बोजड न वाटता जाळीदार व सुबक वाटत होती. दोन हजार
वर्षापूर्वीच नक्षीकाम अजूनही सुस्थितीत ठेवण्यात इटालियन लोकाना यश आले आहे. या प्रत्येक
कमानी मध्ये त्याकाळी संगमरवरी, सुबक असे पुतळे होते. काळाच्या ओघात आता हे पुतळे जाऊन
पुतळ्या खालचे फक्त चबुतरे शिल्लक राहिलेले दिसत होते. आता इतकी सुंदर दिसणारी हि वस्तू
दोन हजार वर्षापूर्वी कशी दिसत असेल अशी कल्पना करण्यात मी गढून गेलो.
इम्पिरिअल रोड च्या एका टोकावर असलेले कोलोसियम
हि रोम ची खास खूण आहे. 'वेस्पासियन ' नावाच्या सम्राटाने इ.सन. ७० मध्ये हे स्टेडीयम
बांधायला काढले. पुढे हे पूर्ण व्हायला एका शतकाचा काळ गेला. त्याकाळी एका वेळी सत्तर
ते ऐशी हजार प्रेक्षक इथे बसू शकत. आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सत्तर हजार प्रेक्षकांचं
हे स्टेडीयम त्याच्या सर्व बाजूनी असलेल्या ऐंशी दरवाजातून पाच ते दहा मिनिटात भरता
किंवा रिकामं करता येत होतं. प्रेक्षकांच्या आसनांच्या खालूनही प्रशस्त रस्ते किंवा
ओवऱ्या केलेल्या असल्यामुळे हे सहज शक्य होई.
कोलोसियम ची हि बाजू आश्चर्यकारक आणि चांगली असली तरी या कोलोसियम चा दि दुसरी बाजू काळ्याकुट्ट अशा इतिहासाने लडबडलेली आहे. इतक्या सुंदर पद्धतीने बांधलेल्या या स्टेडीयमचा वापर मात्र करमणुकीच्या अतिशय क्रूर खेळासाठी होत असे. स्टेडीयम च्या मध्यभागातील लंब वर्तुळाकार मैदानावर गुलामांच्या विरुद्ध जंगली प्राणी, हिंस्त्र श्वापदे यांच्यात लढती लावल्या जात, किंवा दोन रोमन योध्यांमध्ये (या योद्ध्यांना ग्लैडिएटर म्हणत.) युद्ध लावले जाई. कधी कधी आठ ते दहा गुन्हेगारांना एकाच वेळी या मैदानात सोडले जाई आणि त्यापैकी एकजण जिवंत राहीपर्यंत त्यांच्यात युद्ध खेळवले जाई. रोमन सम्राट, राजे, त्यांचे सहकारी मंत्री, प्रेक्षक स्त्री,पुरुष, मुले आजूबाजूने आरोळ्या ठोकीत या गुलामांना, योद्याना प्रोत्साहन देत आणि या क्रूर लढतींचा आनंद घेत.
या मैदानात होणाऱ्या ग्लैडिएटर योद्ध्यांच्या निकाली लढती त्या काळात विशेष लोकप्रिय होत्या. उत्तम सैनिकी शिक्षण घेतलेले हे ग्लैडिएटर वीर योध्ये जनतेच्या आणि सम्राटांच्या करमणुकीखातर जीव तोडून मरे पर्यन्त झुंजत. वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र प्राण्यांच्या बरोबर मारू किंवा मरू असाच पर्याय असलेल्या या लढाया म्हणजे मनोरंजनाचाच एक भाग होता. एका बाजूला उंच चबुतऱ्यावर बसलेल्या सम्राटाला वंदन करून या लढती सुरु व्हायच्या. हरलेल्या योद्ध्याला जिवंत सोडायचं कि ठार मारायचं याचा निर्णय सम्राट द्यायचा. त्याने मुठ वळून अंगठा उभा वर केला कि पराभूत योद्ध्याला जीवनदान मिळायचे, अंगठा खाली केला कि पराभूताला ठार करण्यात यायचे.
इ.सन. ५२५ पर्यंत हे सर्व चालू होते, मग पुढे
ख्रिस्चन राजवटी आल्या आणि ह्या क्रूर खेळाच्या प्रथा बंद पडल्या. मग काळाच्या ओघात कोलोसियम चे महत्व कमी झाले, त्याची
वाताहात झाली. आता इथं सगळा ओस पडलं आहे. रोज हजारो पर्यटक कौतुकाने, उत्सुकतेने हे
स्टेडीयम बघायला येतात, पण याच कोलोसियम च्या मैदानात शेकडो वर्षं हजारो योध्ये, गुलाम,
लाखो प्राणी जीवाला मुकले होते. मारणं किंवा मरणं एव्हडाच पर्याय असलेली केविलवाणी
माणसे, जखमांनी भरलेले, मृत्युच्या चाहुलीने बावरलेले, वेदनांनी ओरडणारे गुलाम… नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहरे
उमटत होते. कोलोसियम पाहिल्यावर आणि त्याचा इतिहास जाणून घेतल्यावर मला तिथे थांबवेना.
अस्वस्थ मनाने आम्ही तिथून बाहेर पडलो…
बाहेरच्या मोकळ्या वातावरणात आल्यावर मला थोडे
बरे वाटले. बाहेरच्या हिरवळीवर आम्ही थोडा वेळ विसावलो. आजूबाजूला पर्यटक बसलेले. छोटी
मुले बागडत होती. आमचे फोटो सेशन सुरु झाले. हर्षवर्धन चा उडी मारून हवेत तरंगताना
फोटो काढण्याच्या प्रयत्नात काही वेळ मस्त गेला. मजा आली. पलीकडे दोन, तीन माणसे ग्लैडिएटरचा
म्हणजे रोमन योध्याचा पोशाख घालून पर्यटकांच्या गर्दीत फिरत होती. पर्यटकाच्या बरोबर
हास्य मस्करी करीत हे नकली रोमन योध्ये पर्यटकांची करमणूकही करीत होते आणि थोडी कमाई
देखील ! त्यांच्या बरोबर फोटो काढून पर्यटक आपली हौस भागवून घेत होते. माझ्या मनावरचा
मघाचा ताण कमी झाला…
आर्च ऑफ कॉनस्टनटाइन, सर्कस मॅक्सीमस
कोलोसियम च्या आगदी जवळ समोरच पलीकडे आर्च ऑफ कॉनस्टनटाइन हि सुप्रसिद्ध कमान आहे.
आम्ही तिकडे वळलो. रोमन सम्राटांनी युद्ध जिंकल्याच्या विजयाप्रीत्यर्थ, किंवा थोरामोठ्यांच्या
स्मरणार्थ अनेक मोठ्या मोठ्या कमानी बांधून ठेवल्या आहेत. 'कमान बांधणी जगात प्रथम
आम्ही शोधून काढली' असा रोमानांचा दावा आहे. हा दावा खरा असो किंवा खोटा, पण एक मात्र
नक्की कि रोमनांनी अनेक भव्य कमानी बांधून त्या लोकप्रिय मात्र केल्या.
चौथ्या शतकात इ.सन. ३१३ मध्ये पूर्वेकडील रोमन सम्राट ' कॉनस्टनटाइन' यानं पश्चिमेकडील ‘मॅकसेंटियस’ या रोमन सम्राटा विरुध्द मिळवलेल्या विजयाची खुण म्हणून ही कमान बांधण्यात आली. ही एक कमान नसून तीन कमानीचा एक समूह आहे. ही कमान रोम शहरातल्या सर्व कामानीतील सर्वात मोठी, सर्वत प्रमाणबद्ध, देखणी अशी कमान आहे. ही कमान उंचीला अंदाजे सत्तर ऐंशी फुट, आणि रुंदीलाही तितकीच असावी. तिच्या दोन बाजूला जोडून आणखी दोन कमानी आहेत. कमानीवर सम्राट कॉनस्टनटाइन चे स्तुतीपर देखावे कोरलेले आहेत. कोणीही रोमन सम्राटाने युद्धात विजय मिळवल्यानंतर त्याची विजय मिरवणूक या कमानी खालून नेण्याची प्रथा होती.

या
कमानी पलीकडेच रोमन फोरम कडे जाणारा मुख्य रस्ता आहे. कालच आम्ही रोमन फोरम पाहिल्यामुळे
आम्ही डाव्या बाजूला असलेल्या 'सर्कस मॅक्सीमस'
नावाच्या लांबट गोल स्टेडीयम सारख्या दिसणाऱ्या मैदानाकडे वळलो. या भव्य मैदानात त्या
काळी रथांच्या शैर्यति होत असत. स्पर्धा बघण्यासाठी दोन लाख लोकांना बसण्याची इथे सोय
होती. त्या काळी लंब वर्तुळाकार मैदानाच्या दोन बाजूना इजिप्त हून आणलेले दोन स्तंभ
(ओबेलिक्स) बसवलेले होते. त्यांना वळसा घालून रथ धावत. आता तिथे फक्त या स्तंभांचे
खालचे चौथरे शिल्लक आहेत. मला कॉलेज मध्ये असताना पाहिलेल्या 'बेनहर' या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. चार्ल्टन हेस्टन, स्टीफन बॉईड,
जे. हॉकिन्स यासारख्या हॉलीवूडच्या जुन्या मातब्बर अभिनेत्यांच्या अभिनयाने गाजलेला
आणि याच सर्कस मॅक्सीमस च्या इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या बेनहर या चित्रपटाने माझ्या
तरुणपणी भुरळ घातली होती. या चित्रपटातील संदर्भ असलेले ‘सर्कस मॅक्सीमस’ मी प्रत्यक्ष
डोळे भरून पाहत होतो आणि धन्य होत होतो.
चालून चालुन थकायला झाले होते. ‘सर्कस मॅक्सीमस’ च्या मैदानाजवळ एक पिण्याच्या पाण्याचे नळ कोंडाळे होते. तिथले थंडगार पाणी पिउन तहान भागवली. समोरच एके ठिकाणी आइसक्रीम चे कोन घेऊन आईसक्रीम खात खात आम्ही घरी जाण्या साठी निघालो.

'बोका देला व्हेरीता’ अर्थात 'सत्याचे मुख'
वाटेत येताना पियात्झा बोका देला व्हेरिता
या चौकापाशी एक गमतीदार गोष्ट बघायला मिळाली. इथे सांता मारिया कोस्मेदिन नावाचे एक
चर्च आहे. चर्च मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओपन पोर्तीको आहे. तिथे 'आ' वासलेले
सिंहाचे संगमरवरी मुख आहे. हेच ते 'बोका देला व्हेरीता म्हणजे 'सत्याचे मुख'. इथे अशी अख्याइका (अंधश्रद्धा) आहे की, खोटे बोलणाऱ्या माणसाने
या उघड्या सिंह मुखात हात घातला कि सिंहाचे तोंड खाडकन बंद होते. आणि खोट्या माणसाच्या
हाताचा सणसणीत चावा घेतला जातो. या ठिकाणी ‘रोमन हॉलिडे’ या सुप्रसिद्ध चित्रपटाची आठवण
येते. या चित्रपटातील काही प्रसंगाचे चित्रण येथे झाले आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये
सिहाच्या तोंडात हात घालून फोटो काढण्याची तोबा गर्दी होते. अक्षरशः रांगा लागतात.
मी मात्र गर्दीचे कारण सांगून तिथे जाण्याचे टाळले.
न जाणो आपल्याला सिंह चावायाचा आणि पितळ उघडे पडायचे.... हा..हा...
सेंट पीटर अद्भुत इमारत
दि.१ : आज सेंट पीटर्स या रोमच्या अतिशय महत्वाच्या अद्भुत
अशा ऐतिहासिक वस्तूला भरपूर वेळ काढून भेट द्यायची असे घरून निघतानाच ठरवले होते. केसरी
टूर्स मधून चार पाच वर्षापूर्वी आम्ही जेंव्हा युरोप सहल केली होती तेंव्हा एका तासात
हि इमारत पहिली होती. तेंव्हा हि वास्तू त्यावेळी बघून समाधान झाले नव्हते. अर्थात त्यात यात्रा कंपनी चा दोष नाही. कारण कमी
पैशात जास्तीतजास्त ठिकाणे त्यांना दाखवायची असतात. स्वाभाविकपणे वेळेचे भान त्यांना
ठेवावेच लागते. आता तशी परिस्थिती नव्हती. आता आमच्याकडे वेळ भरपूर होता त्यामुळे मनसोक्तपणे
सेंट पीटर्स बघायचे ठरवले होते. आज घरून सकाळी लवरकरच उठून निघालो.
आम्ही जेव्हा सेंट पीटर च्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा डोळ्यात न मावणारी चर्च ची भव्य वास्तू दिसली. चर्च च्या दोन्ही बाजूंनी पुढे येणाऱ्या खांबांच्या ओंजळीत आम्ही प्रवेश केला. या वास्तू कडे मूक होऊन कितीतरी वेळ आम्ही बघत राहिलो. सर्व नजारा डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. या प्रांगणाच्या मध्यभागी एक स्तंभ (ओबेलिस्क) उभा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर, नेत्रसुखद अशी कारंजी आहेत. या वास्तूचा आकार एखाद्या फुटबॉल च्या मैदानं एव्हडा भव्य आहे. जवळ जवळ अठरा पोप्सस (ख्रिश्चन धर्मगुरू) च्या अथक प्रयत्नातून वास्तुकलेतल हे आश्चर्य उभं राहायला जवळ जवळ शंभराहून अधिक वर्षे लागली. अकरा वास्तू शास्त्रज्ञांच्या प्रतिभेतून याची निर्मिती झाली आहे. रोम शहरातून भटकताना सेंट पीटर्स चा भव्य घुमट सतत दिसत होता. लांबून वाटतो त्त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने याचा घुमट आणि हि वास्तू भव्य आहे. सेंट पीटर्स हे चर्च अंदाजे पाच एकरावर पसरलेलं असून त्याचे क्षेत्रफळ पंचेचाळीस हजार चौरस मीटर एव्हडे आहे. या वास्तूची लांबी अंदाजे सहाशे फुट, रुंदी पाचशे फुट आणि उंची दीड दोनशे फुट सहज असेल. या चर्चच्या वरचा घुमटाचा व्यासच मुळी सव्वाशे फुट आहे.पंधराव्या शतकातल्या त्यावेळच्या धर्म वेड्यांनी जगातलं सर्वात मोठं देवस्थान निर्माण करायचा जणू विडाच उचलला होता. त्यात त्यांना आश्चर्यकारक यशही मिळालं. 'ब्रामान्ते' नावाच्या महारथीनं पाया भरलेल्या या वास्तूवर ‘मायकेल एंजेलो’ या महान कलाकाराने भव्य घुमट बांधून जणू कळसच चढवला. या चर्च चे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. वरच्या बाजूस असणारे पुतळे वीस पंचवीस फुट उंचीचे आहेत हे सांगूनही खरे वाटणार नाही. सभोवताली फिरणारी माणसे मुंग्यांसारखी दिसतात. धातूशोधक चाचणी नंतर आम्ही विशाल प्रवेशद्वारातून आत गेलो.

आत आल्यावर एका वेगळ्याच वातावरणात किंवा एका
वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटते. आतील वातावरण अतिशय धीरगंभीर व पवित्र होते. शेकडो
पर्यटकांच्या गर्दीतही इथे कमालीची शांतता होती. आतमध्ये रुंद खांबांच्या, व लांबवर
आत जाणाऱ्या भव्य खांबांच्या रांगा होत्या. या खांबांनी आणि त्यावरच्या अतिभव्य कमानींनी या चर्च चे तीन भाग केलेले आहेत. पायाखाली
तळाशी सुंदर संगमरवरी फरश्या अंतर्भागाचे सौंदर्य
खुलवित होती. आजूबाजूच्या भिंती वरील असलेल्या उंचच उंच खिडक्यांच्या रंगीत काचांमधून
झिरपणारे प्रकाशकिरण खालच्या फरशीवर पडून परावर्तीत होत होते. प्रत्येक खांब, कमान
भिंती, छत रंगीत पेंटिंग, चित्रांनी, पानाफुलांच्या नक्षीने ओतप्रोत सजवलेली आहे. हे
सगळ नुसतं पाहताना देखील मनावर दडपण आल्यागत झालं होतं. आतमध्ये मोठाल्ली पेंटिंग,
भव्य रेखीव पुतळ्यांची नुसती रेलचेल आहे.
‘पिएता’ - कारुण्याचा अप्रतिम अविष्कार.
आतील वातावरण न्याहाळता न्याहाळता आम्हाला
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला थोडी गर्दी दिसली, त्यामुळे आम्ही तिकडे वळलो. जाता
जाता हर्षवर्धन आम्हाला म्हणाला "मायकेल एन्जेलो' ची आणखी एक जगप्रसिद्ध कलाकृती
मी तुम्हाला दाखवतो." मायकेल एन्जेलो ने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी या महान
शिल्प घडवले. हे शिल्प पूर्णपणे संगमरवरी दगडात बनवलेले आहे. पूर्वी आम्ही हे शिल्प
युरोप सहली दरम्यान पहिले होते. तेंव्हा या कलाकृती बद्दलची पार्श्वभूमी फारशी माहिती
नव्हती. आता हर्षवर्धन बरोबर असल्याने माहितीही मिळत होती आणि वेळही भरपूर होता. आम्ही
या शिल्प समोर उभे राहून वेगळ्या नजरेतून शिल्प न्याहाळू लागलो.
येशूच्या मृतुनंतर मेरी मातेनं येशूचा मृतदेह आडवा मांडीवर घेतलेलं ‘पिएता’ हे शिल्प म्हणजे मायकेल एन्जेलो च्या कलाविष्काराचा एक अप्रतिम नमुना आहे. उजव्या काखेत हात घालून मेरी मातेनं मृत येशूला सावरलेलं आहे. हे शिल्प अतिशय बारकाईने साकारलेले आहे. येशूच्या उघड्या देहावर फक्त कटीवस्त्र आहे. मृतावस्थेतील त्याच्या चेहेऱ्यावरील निर्जीव भाव, निष्प्राण पडलेली मान एका बाजूला पडलेली. त्याच्या उघड्या, व कृश देहावरच्या छातीवरील हाडाचा सापळा, त्याच्या हातावरील शिरा, दाढीचे केस, डोक्यावरील केशसंभार, क्रुसावर शिक्षा करताना हातावर मारलेल्या खिळ्यांची भोकं… सगळं कसं कोरीव, रेखीव आणि स्पष्टपणे कोरलेल आहे. मृत येशु आणि शोकाकुल मेरी दोघेही एकाच दगडात कोरलेले आहेत. दोघांचे डोळे मिटलेले आहेत, असे असूनही येशु मृत आणि मेरी जिवंत वाटते हे या शिल्पाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल. मृत येशूला मांडीवर आडवं घेऊन शोक करणाऱ्या मेरी मातेच्या चेहेऱ्यावरील करुण भाव या शिल्पामधील अत्युच्च कलाविष्कार म्हणता येईल. मेरी मातेची मान किंचित खाली झुकलेली, चेहेरा अतिशय सुंदर, काहीसा निर्विकार वाटतो. तिच्या अंगावरील वस्त्राच्या चुण्या आगदी स्पष्टपणे कोरल्या आहेत. संगमरवरी दगडा मध्ये हे कोरीव काम एक अशक्यप्राय गोष्ट आहे. वस्त्राच्या घड्यांमधून दिसणाऱ्या उजव्या हाताने तिने आपल्या लाडक्या पुत्राला सावरलेलं आहे आणि डावा मोकळा हात जणू 'असं का'? असा मूक प्रश्न विचारतोय… लाडक्या पुत्राचा मृतदेह मांडीवर घ्यावा लागणे म्हणजे केव्हडी कठोर नियती म्हणावी ही ? संगमरवरी दगडात मानवी मनाच्या सर्व हळुवार, हळव्या भावनांचा कारुण्यमय अविष्कार दाखवणारे हे शिल्प घडवून मायकेल एन्जेलो ने कमाल केली आहे. आम्ही कितीतरी वेळ या अजोड, बेफाम कलाकृतीकडे पाहत राहिलो आगदी भान हरपून…

मधेच हर्षवर्धन म्हणाला "वयाच्या एकविसाव्या
वर्षी घडवलेल्या इतक्या अप्रतिम अशा आपल्या कलाकृतीवर मायकेल एंजेलो फारसा खूष नव्हता.
त्याला स्वतःलाच हे शिल्प न आवडल्यामुळे पुढे वयाच्या साठाव्या वर्षी आगदी तसेच शिल्प
करायला घेतले. हे शिल्प मिलान शहरातील मधल्या एका संग्रहालयात आहे. आश्चर्य म्हणजे
या मनस्वी कलाकाराला त्याची स्वतःची ही दुसरी कलाकृतीही आवडली नाही. मग आगदी वृद्धावस्थेत
म्हणजे वयाच्या जवळ जवळ पंच्याहत्तरी नंतर त्याने अशीच तिसरी कलाकृती निर्माण केली.
ती तरी त्याला आवडली का नाही कुणास ठाऊक?” माझ्या हे सर्व आकलना बाहेरचे होते. पण एक
मात्र नक्की कि सेंट पीटर्स मधील हे शिल्प जगातल्या सर्व पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
या सेंट पीटर्स चर्च मध्ये पर्यटकांची मात्र खूपच गर्दी होती. मुख्य क्रुसा समोर अनेक पाद्र्यांची लगबग चालू होती. बहुदा प्रार्थनेची वेळ झालेली असावी. आम्ही आत आल्या पासूनच ऑर्गन वर वाजणारे धीरगंभीर संगीत कानावर पडत होतं. चर्चच्या मध्यभागी सेंट पीटर्स च्या स्मरणार्थ बांधलेली एक मेघडंबरी सारखी दिसणारी कलाकृती लक्ष वेधून घेत होती. 'बर्निनी' नावाच्या एका अफाट कलाकाराच्या हि इथे अनेक कलाकृती सेंट पीटर्स मध्ये आहेत. पण त्याची अजूनही जगाला स्तिमित करणारी कलाकृती म्हणजे चर्च च्या मधोमध बांधलेली ब्रांझ ची मेघडंबरी... किंवा छत्र. याला ‘बाल्दाकीनो’ असे नाव आहे. जवळ जवळ १०० फुट उंची असलेले हे छत्र म्हणजे ब्रांझ धातूच्या ओतीव कामाचा अजूनही एक चमत्कारच समजला जातो. याचे ब्रान्झ चे पीळ दिल्याप्रमाणे दिसणारे खांब धातूचे ओतीव काम करणाऱ्या आधुनिक कारागिरांना हि थक्क करून सोडतात. चर्चच्या तळघरात पुरलेल्या सेंट पीटर्स च्या थडग्याच्या बरोब्बर वर हि मेघडंबरी आहे. सातव्या पोपने बर्निनी नावाच्या एका कलाकाराला चर्च मध्ये काहीतरी भव्यदिव्य कलाकृती करावी म्हणून पाचारण केले. हि मेघडंबरी साधारणपणे सातव्या शतकात बांधली गेली.

या चर्च मध्ये जगातल्या सगळ्याच थोर मोठ्या
लोकांना मृत्युपश्चात चिरविश्रांती घेण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेकांनी आपल्या
संपत्तीचा वाटा इथे दान करून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु हि सगळ्या पोप ची
हक्काची जागा असल्याने आत्तापर्यंतच्या सगळ्या पोप नी इथे चिरनिद्रा घेतली आहे. सेंट
पीटर च्या तळघरात आत्तापर्यंत होऊन गेलेल्या पोप ची थडगी आहेत. ती ही आम्ही पहिली.
सेंट पीटर च्या घुमटावर आम्ही आज गेलो होतो. ज्या छतापासून घुमट सुरु होतो तेच जवळजवळ १०० फुट उंच आहे. त्याच्यावर हा घुमट ३०० फुट उंच आहे. सुरवातीला थोडे लिफ्ट ने जाण्याची सोय आहे. नंतर सुमारे ३२० पायऱ्या, त्याही अतिशय अरुंद जागेतून चढून गेलो. जिन्यातून वर जाताना घुमटाच्या बाहेरील भिंत वक्राकार व आतील भिंत सरळ असे काहीसा वक्राकार तिरपा जिना चढताना गम्मत वाटत होती, मात्र जाम दमायला झाले. खूप वेगळा अनुभव होता. घुमटाच्या आतून वरून दिसणारे चर्च हि डोळ्यात अक्षरशः मावत नाही. खालची माणसे बारीक मुंग्यांसारखी दिसत होती. घुमटाच्या आतून एका घुमटाबरोबरच वळणारा सज्जा आहे. त्यावरून आपल्याला अर्धवर्तुळाकार फिरता येते. घुमटाच्या आतून असंख्य रंगीत फरशांच्या बारीक बारीक तुकड्यांनी चितारलेली भव्य चित्रे नजरेचे अक्षरशः पारणे फेडतात. घुमटाच्या बाहेर गच्ची सारखा भाग वर्तुळाकार फिरलेला आहे. वर आल्यावर रोम शहराचे विहंगम दृश्य बघून डोळ्याचे पारणे फिटले. या चर्च चा घुमट बांधण्याचे काम मायकेल एन्जेलो ने वयाच्या बहात्तराव्या वर्षी स्वीकारले आणि वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत तो हे काम करीत होता म्हणे…

या चर्च च्या बाजूलाच Vatican city आहे. पोपचे
निवास स्थान येथेच आहे. या ट्रीपमध्ये काहीतरी नवीन बघायला मिळाले. केसरी टुर्स मधून
पूर्वी आम्ही तसे हे चर्च पहिले होते, पण निवांतपणे आणि हर्षवर्धन बरोबर हे सर्व पाहत
भटकणे हा नक्कीच वेगळा अनुभव आहे. मग
घरी येउन थोडा आराम केला.
आज संध्याकाळी हर्षवर्धन ची मैत्रीण मरिया तिच्या देशात ग्वाटेमाला ला परत जाणार होती.
'मारिया' तिच्या देशात परत गेली तेव्हा अनुभवलेले क्षण खरोखर
अविस्मरणीय असेच होते. मी, हर्षवर्धन आणि अलका मारियाला निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशन
वर गेलो. सायदु, रिबेका आणि एमा (हि हर्षवर्धन ची आणखीन एक मैत्रीण जी दक्षिण इटली
मधून आलेली होती). पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व मित्र मैत्रिणींची भावनिक जवळीक
खूप झाली होती. आपल्या कुटुंबापासून, घरापासून शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या
या मुलांना 'आता आपला सहवास संपणार' या कल्पनेने काहीसे रडू येत होते. अनोळखी देशात
सर्वांचा तब्बल दोन वर्षाचा सहवास आणि एकमेकांना आधार होता. मारिया तर खूपच हळवी होती.
सारखी रडत होती. मारिया गाडीत चढली. हर्षवर्धन ने मारियाचे सर्व सामान गाडीत ठेवले.
साश्रु नयनांनी सर्वांनी निरोप घेतला. मी थक्क होऊन या सर्व प्रसंगाकडे पाहत होतो.
मानवी भावनांचा अचंबित करणारा हा अनुभव घेताना मी हि काहीसा भावनाविवश झालो. दुरवर
जाणारी ट्रेन मला अचानक धुसर दिसू लागली. घरी परतल्यावर हर्षवर्धन बराच वेळ गप्पगप्पसा
होता…
ट्रेवी फौंटन
दि. २ : रोम मध्ये सुंदर सुंदर कारंज्याचं
महत्व फार आहे. चौका चौकात, जिथे जागा मिळेल तिथे अतिशय कालाकुलर केलेली कारंजी इथे
उभी आहेत. प्रत्येक कारंज बघत रहाव असं. या करंज्यांच पाणी नुसत्या तोट्यातून उडत नाही,
अतिशय देखण्या, कलात्मक, पुरातन देवदेवतांच्या, अप्सरांच्या हातातून किंवा तुतार्यांमधून,
किंवा शंखातून पाणी अहोरात्र उडत असते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडतेच पण
प्रेक्षणीय स्थळे बघताना पर्यटकांच्या दमलेल्या डोळ्यांनाहि थंडावा मिळतो. एका चौकात
तर आम्हाला चौकाच्या चारही कोपऱ्यात चार कारंजी दिसली. प्रत्येक कारंजे वेगळे, त्याची
कलात्मकता वेगळी. अशा अनेक कारंजांपैकी काही कारंजी फार वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. पैकी
'ट्रायटन फौंटन व ट्रेव्ही फौंटन फारच सुंदर आहेत.
पिआत्झा बार्बेरिनी नावाच्या चौकात 'ट्रायटन फौंटन' आहे. हे कारंजे म्हणजे रेखीव आणि वैशिष्ठ्यपूर्ण शिल्पकलेतील एक उत्कृष्ठ नमुना आहे. बार्बेरिनी नावाचे पोप चे एक घराणे प्रसिद्ध आहे. या घराण्याचा बार्बेरिनी पैलेस या चौकात आहे. या पैलेस च्या समोरच चौकात हे ट्रायटन फौंटन आहे. चार डाल्फिन माशांनी तोलून धरलेला एक भला मोठा शिंपला असून त्यात बसून ट्रायटन नावाची जलदेवता शंख फुंकीत आहे. या शंखातून पाण्याचे कारंजे उडत असते. ह्या जलदेवतेचे शरीर मानवाचे आणि शेपूट माशाचे आहे.

रोम मध्ये पर्यटक आल्यावर ‘ट्रेव्ही फौंटन’ नावाचे कारंजे न बघता परत
गेला आसे सहसा होत नाही. याला कारंजे म्हणणे म्हणण्यापेक्षा कारंज्याचा एक भलामोठा
समूह असेच म्हणावयास हवे. नेपच्यून-वरून देवाचे हे कारंजे आहे. आम्ही तिकडे जाण्यासाठी
वळलो. जुन्या रोम मधील अनेक गल्लीबोळ पार करीत आम्ही निघालो. जा भागात आल्यावर हे कारंजे
सापडणे आगदी सोपे आहे. पर्यटकांचा ओघ ज्या दिशेने जातो आहे त्या दिशेने आम्ही जात राहिलो.
मुख्य रस्त्यावरून मग छोट्या पण गर्दीच्या रास्यावरून एका प्रशस्त चौकात आम्ही आलो.
चौकात येणाऱ्या तीन छोट्या रस्त्यावर स्मरणवस्तूंची, आईस्क्रीम ची अनेक दुकाने आहेत.
या कारंजाच्या चौकात पोहोचणाऱ्या तीन बोळकांडी वजा छोट्या रस्त्यानंतर चौकाप्रमाणे
दिसणाऱ्या मोठ्या प्रांगणात एका बाजूला हे कारंजे उभे आहे. इथे ट्रेव्ही फौंटन कडे
लक्ष जाताच आम्ही अक्षरशः अवाक झालो.
हे कारंज अकस्मात आपल्या अक्षरशः अंगावर येतं. अंदाजे शंभर फुट लांब आणि सत्तर फुट रुंद असे हे जलशिल्प म्हणजे बरॉक शैलीतील घडवलेली सर्वात मोठी शिल्पाकृती आहे. बरॉक शैलीतले देवदेवतांचे पुतळे, मध्ये डौलदार अश्वांनी ओढलेल्या रथातील भीमकाय नेपच्यून चा पुतळा. भोवताली झाडे, वेली यांची सुंदर नक्षी, आणि वरून सुंदर, नितळ पाण्याचे लोट खाली पडताना अधून मधून कुठे कुठे आपटत, पाण्याचे असंख्य तुषार उडवत खालच्या जलाशयात मिसळत होते.
हर्षवर्धन म्हणाला “क्लिओपात्रा आणि अन्टोनी यांना युद्धात हरवून सम्राट ऑगस्टस चा एक सेनानी ‘अग्रीप्पा’ जेंव्हा रोमला परत येत होता, तेंव्हा हा निर्मल पाण्याचा झरा ट्रीव्हीया नावाच्या एका मुलीने दाखवला अशी एक अख्यायिका आहे. ‘ट्रीव्हीया’ या मुलीच्या नावावरून या जलशिल्पाला ट्रेव्ही फौंटन हे नाव पडले आहे असे काही लोक मानतात. ही ट्रीव्हीया ची गोष्ट सुमारे दोन हजार वर्षपूर्वीची. त्यानंतर सुमारे पाचशे वर्ष हे पाणी रोमवासीयांना पुरलं. काळाच्या ओघात इथले पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले. मग पुन्हा पंधराव्या शतकात पोपने येथील पाण्याचे झरे पुनर्जीवित केले. त्यानंतर पुढे आणखी तीनशे वर्षानी म्हणजे अठराव्या शतकातील पोपने आजच्या मनोहारी रूपातील कारंजे उभे केले. हे कारंजं उभं करायला तीस वर्षे लागली. या कारंज्याच पाणी हलकं आणि चवीला अतिशय गोड आहे. ह्या कारंज्याच पाणी प्यायलं कि रोम ची पुन्हा एकदा वारी घडते असाही समाज पर्यटकात आहे.

काहीजण असे म्हणतात ‘कि या इथे तीन वाटा येउन मिळतात त्यामुळे तीन वाटा या अर्थाचा लैटिन शब्द
म्हणजे ‘त्रेव्ही’ आणि ‘फॉन्ताना’ म्हणजे कारंजं, म्हणून हे त्रेव्ही फॉन्ताना म्हणजेच
ट्रेव्ही फौंटन.”
आम्ही मागच्या वेळी हे कारंजं खूप कमी वेळ
पाहिलं होतं. आज मात्र भरपूर वेळ होता. कारंजाच्या एका बाजूला या करंजाचा इतिहास लिहिलेला
फलक होता. पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे तिन्हीही दिशांनी येउन आदळत होते. या कारंजाकडे
पाठ करून, आपल्या डोक्यावरून मागे कारंज्याच्या पाण्यात नाणे टाकले कि तुम्हाला रोम
ला पुन्हा भेट देण्याचा योग येतो अशी सध्या समजूत किंवा अंधश्रद्धा इथे प्रचलित आहे.
त्यामुळे अशी नाणी टाकणारे पर्यटक इथे भरपूर दिसतात. मागील ट्रीप मध्ये मी असे नाणेबीणे
काही टाकले नव्हते. असल्या गोष्टींवर माझा बिलकुल विश्वास नाही. तरी देखील रोम ला येण्याचा
योग आला. पण यावेळी मी रोम च्या प्रेमातच पडलो आहे आणि त्यामुळेच कि काय मी पुन्हा
इथे येण्याच्या तीव्र इच्छेने कारंज्याजवळ जाऊन डोक्यावरून मागच्या पाण्यात एक युरोचे
नाणे टाकले. मनात आले पुन्हा रोमला येण्यासाठी मी अंधश्रद्ध व्हायला तयार आहे… मला पुन्हा रोम ला यायचं आहे…
आज बाहेर जेवायचा कंटाळा आला होता. मूड ही नव्हता. घरी जाताना घराजवळच्या सुपर मार्केट मधून मी अंडी, फळे व ब्रेड घेऊन गेलो. इथे आता मला थोडे थोडे हे जमायला लागले आहे. (कारण सुपर मार्केट एका बंगाली मुस्लिम माणसाचे आहे, तो हिंदी बोलतो. आता माझी त्याच्याबरोबर थोडी मैत्री हि झाली आहे.... हा..हा...) हर्षवर्धन ने आधीच जाऊन झकास पास्ता केला होता. फ्रीज मध्ये कालच आणून ठेवलेली बियर काढली. मस्त जेवण करून ताणून दिली. उद्या लवकर उठून सिएना, फ्लोरेंस, या इटलीच्या उत्तरेला असलेल्या शहरांना भेट द्यायची आहे......

स्वप्नवत 'सिएना'
दि. ३ : उत्तर इटली
मधील फ्लोरेंस व सिएना हि शहरे पाहण्याचे आम्ही आधीच ठरवले होते. जेंव्हा आम्ही इटलीच्या उत्तर भागात असलेल्या सिएना, फ्लोरेंस
या ठिकाणी जायचे ठरवले, तेंव्हा राहण्यासाठी फ्लोरेंस ची निवड करून
स्टेशन जवळील एका घरातील खोली बुक केली. इटलीतच नव्हे तर एकूणच युरोप मध्ये स्वस्तात
राहण्याचे अनेक उत्तम पर्याय असतात. अनेक गरजू कुटुंबे आपल्या घरातील एखाद दुसरी खोली
वाजवी दरात पर्यटकांना उपलब्ध करून देतात. इंटरनेट वरून अश्या जागांची माहिती
काढून स्वतातली जागा बुक करणे यात आता हर्षवर्धन तरबेज झाला आहे. (गरीब बापाच्या मुलाला
परिस्थिती तयार करते हेच खरे… ) नेपल्स आणि फ्लोरेंस मधील आमच्या राहण्याच्या जागा
उत्तम होत्या. रोम वरून सकाळी ८ ची ट्रेन पकडून आम्ही 'सिएना' या
शहरात पोहोचलो. इटली मधील 'तस्कनि' या स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या वैशिष्ठ्यपूर्ण अशा
भागातील सिएना हे एक अतिशय सुंदर शहर मानले जाते. तीन टेकड्यांच्या उतारावर वसलेले
हे छोटेसे गाव अतिशय नयनरम्य आहे.
जिथे या तीनही टेकड्या एकत्र येतात तिथल्या भागाला (चौकाला) 'पियात्सो डेल काम्पो असे म्हणतात. हा चौक अतिशय भव्य (आता प्रत्येक वेळी 'भव्य' हा शब्दप्रयोग करत नाही, कारण इकडे सगळेच भव्य आहे.) हा चौक एखाद्या प्रचंड मोठ्या आम्फी थिएतर सारखा भासतो. चौकाचा आकार एखाद्या उघडलेल्या हातपंख्याप्रमाणे असून भव्य अम्फी थिएटर सारखा आहे. चौकाच्या तीनही बाजूनी बिन पायऱ्यांचा उतार आहे. उताराच्या वर तीनही बाजूना वरच्या अर्धगोलात तेराव्या, चौदाव्या शतकातील इमारती आहेत. उतारावर लाल विटांची नक्षी काढल्याप्रमाणे रचना आहे. उताराच्या शेवटी खाली तळाशी एक छोटा रस्ता आणि पलीकडे इथल्या टाऊन हाल ची टोलेजंग इमारत असून कडेने उंच मनोरा आकाशात घुसलेला. हा 'तोरेर डेल मान्गीया ' नावाचा उंच टॉवर एकदम नजरेत भरतो. त्यावरच्या मोठ्या घडाळ्यातून दर तासाला घंटानाद व्हायचा.

टाऊन हॉल च्या समोर एक अतिसुंदर कारंज आहे.
वरच्या शुभ्र कारंजातून स्वच्छ पाणी खाली पडत होतं. दोन बाजूला असलेल्या दोन लांडगीच्या
तोंडातूनही पाणी पडत होतं. रोम शहरात भटकताना आम्हाला जागोजागी लांडगी च्या पोटाखाली
असलेल्या स्तनांना तोंड लाऊन पिणाऱ्या दोन बालकाचं शिल्पं दिसायचं. मी या बद्दल हर्षवर्धन
ला विचारलं असता त्याने त्यामागची दंतकथा सांगितली. रोम्युलस आणि रिमस या दोन भावंडानी
रोम ची स्थापना केली. या जुळ्या भावंडाना जन्मतःच रानात टाकलं गेलं. जंगलात एका लांडगीनं
या बालकांना आपलं दुध पाजून त्यांना वाढवलं. पुढं राज्यस्थापनेनंतर दोघात वितुष्ट येउन
रोम्युलसनं रिमस ला ठार मारलं. रीमसचं कुटुंब रोम मधून पळून गेलं. रिमस चा मुलगा सेनियस
यानं 'सिएना' हे गाव वसवलं. याचाच अर्थ सिएना हे कमीतकमी दोन सव्वादोन हजार वर्षापूर्वीचं
आहे. त्यावेळचे बाजार, जत्रा, धार्मिक किंवा सार्वजनिक सभा, मेळावे या चौकातच भरत.
या चौकातच 'पालिओ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोड्यांच्या शैर्यति होतात. (फियाट
ही कारची प्रसिद्ध कंपनी इटलीचीच आणि याच कंपनीची ‘पालिओ’ कार माझ्याकडे होती) 'पलेत्सो
पब्लिको' हि इथे असलेली इमारत १२९७ मध्ये बांधलेली आहे.
सिएना हे शहर टेकड्यांवर वसलेले असल्याने इथले रस्ते
अतिशय चढ उताराचे आहेत. १२व्या शतकातील इतिहासाचा व संस्कृतीचा वारसा या शहराने जपून
ठेवल्याने येथील घरे वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. सर्व घरे एकमेकांना चिकटून आहेत, गल्ल्या
अरुंद असून, बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूच्या घरांना जोडणाऱ्या कमानी दिसतात. येथील सिएना
कॅथेड्रल देखील अतिशय प्रेक्षणीय आहे.
बसिलिका ऑफ सान फ्रान्सिस्को, सान मार्तीनो, सांता
मारिया देई सर्व्ही (हे रोमन कॅथलिक चर्च आहे) ह्या अतिभव्य वास्तू बघत फिरताना आपण
किती चाललो हे समजतच नाही. सगळेच अफाट आहे. दुपारी थोड्या उशिरानेच आम्ही मस्तपैकी
जेवलो. एक भलामोठा पिझ्झा, वेगळ्याच चवीचा पास्ता, आणि वांगी, बटाटे, ढोबळी मिरची,
मश्रूम अश्या उकडलेल्या भाज्यांची थोडी मिळमिळीत, सपक पण मस्त चवीची डिश असा मस्त बेत
होता. सिएना मध्ये न राहता फ्लोरेंस मध्ये राहायचे
आम्ही ठरवलेले असल्यामुळे आम्ही स्टेशनवर येउन फ्लेरेंस कडे जाण्याच्या ट्रेन मध्ये
चढलो...
स्वर्गीय जादुई
संध्याकाळ... फ्लोरेंस ची.
सिएना स्टेशन वरून आमची ट्रेन फ्लोरेंस कडे निघाली.
मी हर्षवर्धन ला विचारले कि फ्लोरेंस मध्ये बघण्यासारखे काय आहे? तो हसून म्हणाला आता
प्रत्यक्षच बघा. नुसते सांगून तुम्हाला ते फार रुक्ष वाटेल. फ्लोरेंस तुम्हाला प्रत्यक्ष
अनुभवल्या शिवाय त्याची मजा तुम्हाला कळणार नाही. आजची संध्याकाळ अनुभवा! आम्ही रोम
आणि सिएना मध्ये दुपारच्या उन्हात चालून चालून दमलो होतो. आता पुन्हा पुतळे, चर्चेस
बघायचे... पण आता इथपर्यंत आलोच आहोत तर बघुयात, अशा काहीश्या भावनेतून आम्ही
निघालो. रेल्वे वातानुकुलीत असल्याने आणि दमल्यामुळे छान झोप लागली. हर्षवर्धन ने कालच बुक केलेली आमची फ्लोरेंस मधील जागा
आगदी गावातच होती. त्यामुळे संध्याकाळी ५ च्या सुमारास अंघोळी करून फ्लोरेंस ची
संध्याकाळ अनुभवण्यासाठी बाहेर पडलो.
क्षितिजाकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या प्रत्येक
अवस्थेमध्ये क्षणाक्षणाला फ्लोरेंस शहराचे व क्षितिजाचे सौदर्य वाढतच जात होते.
आकाशातल्या रंग छटा बदलत होत्या. वातावरणात एकप्रकारचा हवाहवासा थंडावा येत होता. पर्यटकही
वाढू लागले होते. या गर्दीत एक मनस्वी कलाकार गिटार वाजवत सुरेल गाणे म्हणत होता. त्याच्या
धुंद सुरावटी वातावरणाला अधिकच गहिरे बनवत होत्या. (युरोप मध्ये सगळीकडे असे कलाकार
आपली कला सादर करून आपला चरितार्थ चालवतात) रात्रीच्या बरोबर ९ वाजता सूर्यास्त झाला.
(सूर्यास्त झाल्यावर तिथे जमलेल्या पर्यटकांनी टाळ्या वाजवल्या. हे म्हणजे आपल्या
महाबळेश्वर सारखे झाले. मनुष्यस्वभाव सगळीकडे सारखाच! सूर्यास्ताच्या उत्तम सादरीकरणा
बद्दल साक्षात सूर्याला क्षुद्र मानवाने टाळ्या देऊन दाद देणे म्हणजे जरा अतीच झाले
) इथे दिवस मोठा असल्याने सूर्यास्ता नंतरचा संधिप्रकाश हि बराच काळ रेंगाळतो. जसा
जसा संधिप्रकाश कमी होत होता, तसे तसे फ्लोरेंस मधले दिवे लागत होते. शहरातील ऐतिहासिक
चर्च, घुमट यावरही सुंदर दिव्याचे प्रकाशझोत सोडले होते. त्यामुळे शहराच्या सौदर्यात
भर पडत होती. आम्ही हा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.
फ्लोरेंस शहरातून वाहणारी 'अर्नो' हि नदी शहराचे सौंदर्य
खुलवते. मध्य इटलीतील हि एक महत्वाची नदी आहे. हि नदी प्रामुख्याने इटलीच्या टस्कनी
भागातून वाहते. फ्लोरेंस शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीमध्ये रात्री उजळलेल्या दिव्यांचे
नयनमनोहारी प्रतिबिंब पडल्यामुळे हि नदी फारच सुंदर दिसते. या चौकात मायकल एन्जेलो
याने बनवलेल्या डेव्हिड च्या पुतळ्याची काहीशी हिरवी पडलेली धातूची प्रतिकृती
आहे. हा पुतळा या जागेच्या सौंदर्यात भरच घालतो.
पूर्ण अंधार पडल्यावर आम्ही पुन्हा चालत चालत अर्नो
नदीच्या काठावरून फ्लोरेंस शहरात आलो. फ्लोरेंस मधील प्रत्येक रस्ता पर्यटकांनी ओसंडून
वाहत होता. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक इमारत,
पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. चौकाचौकात भव्य पुतळे प्रकाशमान करण्यात
आले होते. येथील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली दुकाने पेंटीग, संगमरवरी पुतळे,
कपडे, दागिने, उंची सेन्ट्स, विविध खाद्यपदार्थ, आईस्क्रीम यांनी भरगच्च भरलेली होती.
आईस्क्रीम खात फ्लोरेंस शहरातून भटकत राहणे हा इथल्या पर्यटकांचा आनंदाचा भाग असतो,
किंवा रस्त्यावरच थाटलेल्या उपहारगृहात बियर, वाइन चा आस्वाद घेत ते निवांत गप्पाटप्पा
करीत असतात.
आम्हीही असेच आईस्क्रीम खात उशिरापर्यंत भटकत राहिलो.
मनाचे समाधान होत नव्हते. मग भरपेट जेवण करून आम्ही घरी परतलो. फ्लोरेंस मधील ती अफलातून
घालवलेली जादुई संध्याकाळ आठवत आठवत आम्ही झोपेच्या अधीन झालो...
ऐतिहासिक फ्लोरेंस....
दि. ४ : रोम च्या उत्तरेला असलेले फ्लोरेंस
शहर तसे फार मोठे नाही. ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे अगदी पायी चालण्याच्या अंतरावर
आहेत, त्यामुळे आज आम्ही कालची फ्लोरेंस ची रम्य संध्याकाळ आठवत उशिरानेच उठलो. सकाळचा नाश्ता
घेण्यासाठी तिथल्या एका मार्केट मध्ये गेलो. तिथे एक भली मोठी भाजी मंडई होती. त्याच्या
पहिल्या मजल्यावर एकाच ठिकाणी बरीच Restaurants होती. त्याच्या मध्यभागी भरपूर मोठ्या
जागेत खात बसण्यासाठी भलीमोठी जागा होती. तिथेच नाश्ता करून आम्ही फ्लोरेंस पाहण्यासाठी
बाहेर पडलो.
पियात्सा सेनोरिया हा महत्वाचा चौक पाहण्यासारखा आहे.
काल संध्याकाळी आम्ही इथे आलो होतोच. काल दिव्यांनी सजलेला हा चौक आज वेगळाच भासत होता.
या चौकात मायकेल एन्जेलो ने बनवलेला डेव्हिड चा प्रसिद्ध पुतळा आहे. या डेव्हिड
च्या चेहेऱ्यावरचे भाव अतिशय अप्रतिमपणे कोरलेले आहेत. इतरही अनेक सुंदर आणि भव्य पुतळे
इथे याच चौकात आहेत. गर्दी मुळे आणि वेळे अभावी
आम्ही येथील अनेक चर्चेस व संग्रहालये पाहू शकलो नाही. आल्या प्रमाणे एकतरी म्युझियम
बघायचेच असे ठरवून आम्ही बर्गेलो म्युझियम
बघितले. त्यालाही दोन तास लागले. इथे व्हेरोचिओ, डोनातेलो, मायकेल एन्जेलो व इतर अनेक
शिल्पकारांनी बनवलेले अनेक पुतळे बघण्यासारखे आहेत.
खरेतर इटली मधील प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे.
'काय बघायचे आहे’ हे आधीच ठरवून ( इतर स्थळांचा मोह न ठेवता ) तेवढेच बघायचे ' असेच
इथे करावे लागते. आम्हीही नाईलाजाने तसेच केले. संध्याकाळपर्यंत फ्लोरेंस मध्ये मनसोक्त
भटकून आम्ही जड मनाने रोम कडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये शिरलो....
रात्री उशीरा रोम ला पोहोचलो. घरी मुक्काम
केला. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून दक्षिण इटलीमधील नेपल्स, काप्री, पॉम्पे या ठिकाणांना
भेटी द्यायच्या होत्या.
लोकप्रिय पिझ्झ्याचे उगमस्थान - नेपल्स ( नापोली )
दि.
५
: आज आम्ही सकाळी लवकर उठून नेपल्स या इटलीच्या दक्षिणेकडे
असलेल्या शहराकडे निघालो. हर्षवर्धन ने हि त्याच्या रोम च्या वर्षभराच्या वास्तव्यात
नेपल्स, पोम्पे, काप्री ई. भाग बघितलेला नव्हता. कालच त्याने इंटर नेट वरून सर्व माहिती
काढून ठेवली होती. नेपल्स ला राहण्यासाठी एका रशियन बाईच्या घरी शेअरिंग पद्धतींचे
बुक केले होते. हा प्रकार मला नवीन होता. युरोप
मध्ये अशा प्रकारच्या घरात खूप स्वस्तात राहता येते. हॉटेल च्या आगदी निम्म्यापेक्षा
कमी दरात अतिशय सुरेख, सर्व सुखसोईने परिपूर्ण अशी घरे किंवा खोल्या मिळतात.
घरून निघून 'तर्मिनी नावाच्या मेट्रो स्टेशन वर उतरून आम्ही एका भल्यामोठ्या रेल्वे स्टेशन वर आलो. वेळेच्या थोड्या आधीच आल्यामुळे फार गर्दी नव्हती. साधारण अडीच तासाच्या सुखद अशा रेल्वे प्रवासानंतर आम्ही नेपल्स ला पोहोचलो. नेपल्सला येताना रेल्वेतूनच व्हेसुवियास नावाचा ज्वालामुखी सतत दिसत राहतो, त्याचप्रमाणे शहरभर फिरतानाही त्याचे सतत दर्शन होत राहते.

‘पिझ्झा’ या जगात लोकप्रिय झालेल्या पदार्थाचे मूळ नेपल्स मध्ये आहे. साक्षात नेपल्स मध्ये येउन मूळ पिझ्झ्याची चव घेणे हा खरोखरीच आनंददायी प्रकार आहे. भारतीय पिझ्झा आणि इटली मधील पिझ्झ्यात थोडा फरक असतो. इटालियन पिझ्झा अतिशय पातळ असतो, थोडा चवीला वेगळाच असतो. नेपल्स मधील आमच्या राहण्याच्या जागेच्या मालकीण ‘सोफिया बाई’ नेपल्स च्या पिझ्झ्याबद्दल फारच उत्साहाने बोलायच्या. पिझ्झ्या बद्दल त्यांनी खूपच मनोरंजक माहिती सांगितली. पिझ्झा ह्या पदार्थाचे मूळ नेपल्स मध्ये आहे हे सांगताना त्यांचा चेहेरा अभिमानाने भरून आला होता. सोळाव्या शतकात इटली मध्ये चपट्या आकाराच्या ब्रेड वर चीज आणि टोमॅटोचे तुकडे, आणि अन्य काही घटक वापरून पिझ्झा बनवला जात असे. हे रस्त्यावरचं खाणं म्हणूनच ओळखलं जायचं. गरीब कामगार, शेतकरी यांच्यासाठीचं हे पोटभरीचं खाणं म्हणून लोकप्रिय होतं. इटलीचा इतिहास जाणून घेण्यासाठी येणारे देशोदेशीचे प्रवासीप्रवासीय स्ट्रीट फूड च्या प्रेमात पडू लागले. आपआपल्या देशात परत गेल्यावर पिझ्झ्याचे गुणवर्णन ते करू लागले. या लोकप्रियतेमुळे १८व्या शतकात पिझ्झा राजघराण्याच्या मुदपाकखान्यातील शाही मेन्यूत दाखल झाला. त्या काळात राजघराण्यातील मान्यवरांसाठी विविध प्रकारचे पिझ्झाज तयार होऊ लागले. सुरवातीला या पिझ्झ्याचं स्वरूप खूप पारंपरिक होतं. १८व्या शतका अखेर पिझ्झ्याला थोडं आधुनिक स्वरूप आलं. १८८९ मध्ये इटलीचा राजा उंबेर्तो (पहिला) आणि त्याची राणी मार्गारिटा आपली सुट्टी व्यतिथ करण्यासाठी एकदा नेपल्स ला आले होते. नेपल्स च्या उत्कृष्ठ पिझ्झ्याबद्दल त्यांनी बरेच ऐकले होते. त्याकाळी नेपल्स मध्ये 'रॅफेले इस्पोसितो' नावाचा एक शेफ (आचारी) पिझ्झा बनवण्यात फारच वाकबगार होता. या शाही दाम्पत्याला पिझ्झा खिळवण्यासाठी नेपल्स मधील या 'रॅफेले इस्पोसितो' ला पाचारण करण्यात आले. या आचाऱ्याने पिझ्यामधे वेगळेपण आणण्यासाठी काही मजेशीर प्रयोग केले. इटालियन झेंड्यामध्ये असलेल्या लाल,पांढरा आणि हिरवा रंगाचे असलेले टोमॅटो, चीज, आणि बेसिल म्हणजे तुळशीची पाने याचा वापर त्याने फार कल्पकतेने त्याने पिझ्झा केला. तो राजा उंबेर्तो आणि त्याची राणी मार्गारिटा यांना अर्थातच खूप आवडला. इटलीला परत गेल्यावर राजा राणीने या इस्पोसितो चा यथोचित सत्कार देखील केला. या प्रसंगाची आठवण म्हणून इस्पोसितोने या विशिष्ठ पिझ्झ्याला राणी मार्गारिटा च्या स्मरणार्थ 'पिझ्झा मार्गारिटा' असे नाव दिले. त्यामुळे या नावाने तो विशिष्ठ चवीचा पिझ्झा जगप्रसिद्ध झाला. आज हा 'पिझ्झा मार्गारिटा' जगभरातल्या कोणत्याही आउटलेट मध्ये आपल्याला मिळू शकतो.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच पिझ्झा लोकप्रिय व्हायला लागला. जागतिक महायुद्धाचा काळ होता तो. त्या काळात सैनिकांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या प्रांतातील पदार्थांची देवाणघेवाण मोठया प्रमाणात झाली. अमेरिकन मंडळींनी या पिझ्झ्याला फारच आपलंसं केलं. भारतीयांनी देखील या पिझ्झ्याला आपलंसं करण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. पोईभाजी संस्कृती कडून आपण पिझ्झा बर्गर संस्कृती कडे जात आहोत अशी कितीही ओरड झाली तरी पिझ्झा मिळणाऱ्या रेस्टोरंट मधील भारतीय लोकांची गर्दी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच करताना दिसते. खरं तर पिझ्झ्यातील चीज चे दुष्परिणाम जगजाहीर असून देखील असं नेमकं या पदार्थात काय दडलंअसावं की जे नव्या पिढीला आकर्षित करत असावं ? विशिष्ठ पिझ्झा ब्रेड वर ओथंबून घातलेलं भरपूर चीज, फारशी प्रक्रिया न करता, नैसर्गिक स्वाद टिकवत वरून घातलेले कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल,कॉर्न, मश्रुम यासारखे घटक न कळत आपल्यावर राज्य करू लागतात. इटालियन रेस्टोरंट मधील वेगळ्या वातावरणात सुशोभित केलेल्या प्लेट मध्ये जेंव्हा गरम गरम पिझ्झा आपल्या समोर येतो, तेंव्हा चीजचे दुष्परिणाम, पोटात जाणाऱ्या कॅलरीज वगैरे तुच्छ गोष्टी विसरायला होतात. संयमाचे बांध तटातट तुटतात आणि मग आपण पिझ्झ्याला शरण जातो. आमचे ही असेच झाले…
नेपल्स हे शहर मला बरेचसे मुंबई सारखेच वाटले. समुद्र किनाऱ्यावरचे महत्वाचे बंदर असल्याने व्यावसाईक घडामोडींचे शहर आहे. हवा मुंबईप्रमाणेच आहे. (येथे अधूनमधून कचरा, भिकारीही दिसले.) एकूणच इटलीमध्ये नवीन सुधारणांच्या बरोबर जुन्या ऐतिहासिक वारसा जिवापलीकडे जपण्याची वृत्ती दिसते. नेपल्स मध्येही भव्य म्युझियम्स, जुनी भव्य चर्चेस, ग्रीक, रोमन कलांचा अक्षरशः महापूर येथे वाहतो. पण आम्ही इथे एकच दिवस असल्यामुळे काही प्रसिद्ध गोष्टी पहिल्या व शहरभर भटकलो. नेपल्स मध्ये अनेक राजवटी होऊन गेल्यामुळे त्या ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन आपल्याला घडोघडी दिसते. इतिहासात नेपल्स अनेकदा राजधानीचे ठिकाण असल्यामुळे इथे अनेक महत्वाच्या इमारती आहेत. नेपल्स मधील हिस्टोरिक सेंटर मध्ये मनमुराद भटकलो. समुद्रकिनाऱ्यावर बंदराचा विहंगम नजारा दिसतो. इथले कलाप्रेम आणि विशिष्ठ निसर्ग यामुळे हे शहर अतिशय प्रेक्षणीय झाले आहे.
नेपल्स शहरात आम्ही चालतच भटकलो. रस्त्याच्या दुतर्फा धनिक वस्तीच्या
खुणा, देखणे प्रशस्त बंगले, इमारती, बागा, फुलझाडे, कारंजी, असल्यामुळे उन्हातील भटकणे
आनंददायी होत होते. मला सगळ्यात गंमत वाटली ती एकावेगळ्या गोष्टीची ती म्हणजे नेपल्सच्या
बहुतेक रस्त्यांना सुप्रसिद्ध कवींची नवे दिलेली आहेत. 'दान्ते' नावाच्या एका कवीच्या
नावाने तर एक भव्य असा चौक देखील आहे. आम्ही हा 'दान्ते' चौक पाहण्यासाठी मुद्दाम गेलो.
ह्या भव्य चौकात छानशी फारशी घातलेले भव्य असे प्रांगण होते. मधोमध पांढऱ्याशुभ्र चबुतऱ्यावर
वृध्द 'दान्ते' या कवीचा हात उंचावलेला सुबक पुतळा ! 'दान्ते' हा आपल्याकडील ज्ञानेश्वरांना समकालीन
असा कवी होता. या चौकात आम्ही बराच वेळ रेंगाळलो. हर्षवर्धनचे फोटोशुट चालूच होते.
संध्याकाळी आम्ही 'Castle नोवो' या ऐतिहासिक किल्ल्याला भेट
दिली. या किल्ल्याच्या जवळच 'Castle वोवो' नावाचा आणखी एक किल्ला दिसतो. वेळेअभावी
आम्ही फक्त ‘नोवो’ हा किल्ला बघायायचे ठरवले. नेपल्सच्या समुद्रकिनारी असलेला हा किल्ला
म्हणजे स्थापत्य शास्त्रातील एक अद्भुत, अचाट, उदाहरण म्हणता येईल. साधारण षटकोनी आकाराचा
हा किल्ला बघताना आम्हाला ४ तास लागले. हा किल्ला १३ व्या शतकाच्या अखेरीस बांधला गेला
आहे. आतमध्ये अनेक मोठी मोठी दालने, पुरातन वस्तूंची केलेली मांडणी, जुन्या तोफा, तोफगोळे
मांडून ठेवलेले आहेत. किल्ल्यामध्ये अनेक चोरवाटा आहेत. युद्धा मध्ये सुरक्षेसाठी केलेल्या
यंत्रणा, क्लुप्त्या आश्चर्यकारक होत्या. मला आपल्या दौलताबाद किल्ल्याची आठवण झाली.
वर जाण्यासाठी अतिशय अंधार असलेले वर्तुळाकार जिने होते. त्यात हवा खेळती राहण्यासाठी
स्वतंत्र यंत्रणा होती. या जिन्याने आम्ही किल्ल्याच्या वरच्या सपाट भागावर आलो. प्रचंड
उन्हाळा असूनही उंचीवर आल्याने हवेत सुखद असा गारवा होता. डावीकडे कुबडा सारखे दोन
उंचावटे असलेला काहीसा गूढ दिसणारा व्हेसुव्हियस पर्वत पसरलेला दिसत होता. त्याच्या
पायथ्या पासून सुरु होणारी नेपल्सच्या खाडीचा चंद्रकोरीप्रमाणे दिसणारा अथांग असा सागर
किनारा दिसत होता. बाजूला रुंद्स पसरलेलं नेपल्स शहर… उजवीकडे पसरलेला अथांग नीळा समुद्र… !
संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आणि किल्ला बघायची वेळ संपल्यामुळे
आम्ही लगबगीने खाली आलो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पुलावरच्या कट्ट्यावर
निवांतपणे गप्पा मारीत बसलो. सूर्य मावळतीला आल्यामुळे आकाशात लालसर छटा उमटू लागल्या
होत्या. एका अविस्मरणीय अशा सूर्यास्ताची विहंगम दृश्ये आम्ही नजरेत साठवून ठेवत होतो.
थरकाप करणारा इतिहास - पॉम्पे (पोम्पाई)
दि. ६ : दक्षिण इटलीमधील नेपल्स (स्थानिक
नाव नापोली) पासून ४० मिनिटात रेल्वेने पोम्पेइ या २००० वर्षापूर्वीच्या आणि अचानक
२५० वर्षापूर्वी शोध लागलेल्या शहरामध्ये आम्ही आज गेलो. पोम्पाई उर्फ
पॉम्पे ला जाण्यासाठी आम्ही नेपल्स च्या रेल्वे स्टेशनवर आलो. पॉम्पे चे तिकीट काढून
आम्ही प्रवासास सुरवात केली. प्रवासात सुरवातीपासून व्हेसुव्हियस हा ज्वालामुखी पर्वत
सतत दिसत होता. हाच तो भयंकर, प्रलयंकारी भयानक पर्वत ज्याने पॉम्पे आणि व्हर्क्युलियम
या शहरांमध्ये २००० वर्षांपूर्वी मृत्यूचे तांडव मांडले होते. काहीश्या गूढ दिसणाऱ्या
या दैत्याकडे बघत बघत आम्ही प्रवास करत होतो. तेव्हढ्यात दोन तरुण मधल्या एका स्टेशन
वर आमच्या डब्यात चढले. त्यापैकी एकाच्या हातात अकॉर्डियन आणि दुसऱ्याच्या हातात आपल्याकडील
डफा सारखे दिसणारे तालवाद्य होते. दोघेही अतिशय सुंदरतेने व सहजतेने वाद्ये वाजवून
प्रवाशांची करमणूक करीत होते. काही प्रवासी खुश होऊन त्यांना पैसे देत होते. आमचाही
वेळ चान जात होता. कुठल्याशा मधल्याच स्टेशन वर हे दोघे गाडीतून उतरले. साधारणपणे दीड
तासाने आम्ही पॉम्पे स्टेशनवर उतरलो.
पॉम्पे स्टेशन वर समोरच एक मोठा लांबलचक रस्ता होता. त्याच्या
दोन्ही बाजूना स्मरणवस्तू , चित्रे, फोटो, पुतळे, कपडे, भेटकार्डे, वगै. वस्तूंनी गच्च
भरलेली दुकाने होती. मोठ्या मोठ्या पिवळ्याधमक
लिंबाच्या (इड्लींबू ) रसाची, सरबताची दुकाने लक्ष वेधून घेत होती. काही ठिकाणी संत्र्याच्या
रसाची दुकानेही होती. जाळीदार पिशव्यातून फळे टांगून ठेवली होती. उन्हाच तडाखा होताच
! पर्यटकांची या दुकानामध्ये झुंबड उडाली होती. आम्हीही लिंबाचा रस घेऊन पॉम्पे च्या
वेशी कडे उत्सुकतेने वळलो.
पॉम्पे च्या वेशी वर आम्ही उभे होतो. माझ्या मनात विचारांचे
काहूर माजले होते. पलीकडच्या बाजूला वरून टवका उडालेला व्हेसुव्हियस पर्वत दिसत होता.
पॉम्पे बघण्या साठी मी अधीर झालो होतो. पॉम्पे मध्ये जाण्यासाठी १० युरो तिकीट होते.
आम्ही एका मोठ्या रांगेत उभे राहिलो. रांगेत उभे असताना एक मध्यमवयीन स्पानिश बाई माझ्याशी
काहीतरी बोलायला लागल्या. मी इंग्रजीतून त्यांना सांगितले कि मला स्पानिश येत नाही,
तुम्ही इंग्रजीत बोला. दुर्दैवाने त्यांना
इंग्रजी येत नव्हते. माझ्या मागे रांगेत उभ्या असलेल्या हर्षवर्धनच्या हा गोंधळ लक्षात
आला. त्याला स्पानिश भाषा उत्तम येत असल्याने त्याने पुढे होवून प्रश्न सोडवला. थोडा
वेळ मला टेन्शन आले होते. हा उडालेला गोंधळ म्हणजे एक मजेशीर अनुभव होता. रांगेतून
पॉम्पे च्या वेशीच्या आतील शहराचे भग्नावशेष थोडे थोडे दिसत होते. इथे पूरातत्व खात्याने गाईड ची चांगली व्यवस्था
केलेली होती. इथे हा ‘फोन गाईड’ नावाचा एक छान प्रकार होता. एक हेड फोन कानाला लावायचा
व हातातल्या रिमोट कंट्रोल वरील दाबायचे कि आगदी तुमच्या कानात ह्यातील गाईड पार्श्व
संगीतासह सर्व माहिती सांगायचा. आपण ज्या ठिकाणी
जाऊ तेथील दर्शनी भागावर एक नंबर दिसायचा, रिमोट कंट्रोल वर हा नंबर दाबला कि त्या
स्थळाची माहिती सुरु… आम्ही काही पैसे भरून 'फोन गाईड' घेतला.
हेडफोन मधील गाईड चे शब्द आणि त्या मागे ऐकू येणाऱ्या भूकंपाच्या
गडागडाच्या पार्श्व संगीताचा आवाज माझ्या कानात तप्त लाव्हारसाप्रमाणे शिरू लागला.
माझ्या हेडफोन मधील गाईड त्याच्या धीरगंभीर आवाजात मला सांगत होता.…
'पॉम्पे' चा पूर्व इतिहास खूपच प्राचीन आहे. इसवी सनापूर्वी
जवळ जवळ आठ शतकं इटलीच्या मूळ रहिवाशांनी पॉम्पे हे शहर वसवलं. या नगराच्या विशिष्ठ
भौगोलिक परिस्थितीमुळे एक सुरक्षित बंदर आणि व्यापारी केंद्र म्हणून त्याची भरभराट
झाली. संपत्तीच्या लालसेने स्वाभाविकच पॉम्पे वर अनेक आक्रमणे झाली. प्रथम ग्रीकांनी
पोम्पे जिंकले. त्यानंतर दोनशे वर्षांनी 'एत्रुस्कन' लोकांनी पॉम्पे वर ताबा मिळवून
सत्ता गाजवली. आणखी शतकभरात सॅमनाईट लोक इथे आले. या काळात मात्र पॉम्पे ची सर्वात
जास्त भरभराट झाली. इसवी सनापूर्वी तीनशे वर्ष रोमन लोकांनी पॉम्पे जिंकले आणि मग पुढील
काळात पुढील तीन चार शतकात इथले रहिवासी हळू हळू रोमन बनून गेले. येथील जमीन अतिशय
सुपीक असल्याने शेतीचे उत्पादन चांगले होत असे. समुद्रही जवळ असल्याने शेतमालाचा व्यापारही
व्यापार जोरात होत असे. त्यामुळे पॉम्पे हे सधन व समृद्ध लोकाचे शहर म्हणून ओळखले जाऊ
लागले होते.
व्हेसुव्हियस पर्वताच्या छायेत असलेल्या व सर्वात जवळ असलेल्या शहरातील म्हणजे पॉम्पे, हर्क्युलीयम व त्या भागातील इतरही खेड्यापाड्यातून राहत असलेल्या लोकांना तसे छोटे मोठे भूकंप नेहेमीच जाणवायचे. येथील लोकांना भूकंपाची सवयच होती. इसवीसन ६२ मध्ये एक मोठा भूकंप इथल्या लोकांनी अनुभवला होता. त्यावेळी पॉम्पे मध्ये प्रचंड पडझड झाली होती. पण तो नुसताच भूकंप होता. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांनी पुन्हा घरे, इमारती, बाजारपेठा बांधल्या व पुन्हा जनजीवन सुरु झाले होते. पण त्यानंतर १७ वर्षांनी पुन्हा दुसरी आपत्ती पॉम्पे वर कोसळली. या आपत्तीने मात्र पॉम्पे होत्याचे नव्हते झाले. पॉम्पे बरोबरच जवळच असलेले हर्क्युलियम नावाचे शहरही नष्ट झाले. पॉम्पेवासीयांच्या दृष्टीने व्हेसुव्हियस हा पर्वत एखाद्या पोषणकर्त्या पित्यासमान, धीरगंभीर पणे त्यांच्या पाठीशी उभा होता. कारण या व्हेसुव्हियस वरील पर्वतावरील जमीन अतिशय सुपीक होती. त्यामुळे आगदी वर पर्यंत द्राक्षांची लागवड त्यावर व्हायची. त्या द्राक्षांपासून तयार होणारी व्हेसुव्हिनम नावाची वाइन इथली खासियत होती. या वाइन चा मोठा व्यापार येथून चाले. येथील लोक या पोषणकर्त्या व्हेसुव्हियस पर्वताची पूजा करायचे. पण या पोषणकर्त्या देवासमान पित्यानेच घात केला, तो काळा दिवस होता २४ ऑगस्ट ७९.

२४ ऑगस्ट ७९ साली ( म्हणजे १९७९ नव्हे नुसते ७९ साली, म्हणजे अंदाजे २००० वर्षापूर्वी ) 'पोम्पेइ ' या शहरामधील नागरिकांचे नित्याचे नेहेमीप्रमाणे व्यवहार चालू होते. आज त्यांचा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे याची अंधुकशी देखील कल्पना त्यांना नव्हती. व्हेसुव्हियस च्या डोंगरावर या घटनेच्या आधी त्याच्या माथ्यावर उंच टोकदार सुळका होता. दुपारच्या सुमारास या मोठ्या शहराच्या जवळच असलेल्या 'व्हेसुवियस' या ज्वालामुखी पर्वतातून कसलासा मोठा आवाज येऊ लागला. या निद्रिस्त ज्वालामुखीचा रौद्र उद्रेक झाला. मोठ्या आवाजासह या ज्वालामुखीचे मुख आकाशात उंच भिरकावले गेले. या महाभयंकर उद्रेकामुळे नेपल्स खाडी चा उपसागरी भागही थरथर कापायला लागला. आगीचा जवळजवळ १० कि. मि. उंचीचा स्तंभ आकाशात उडू लागला. सतत १८ तास हे आगीचे तांडव सुरु होते. खडकांचा, राखेचा, धुळीचा एक अतिप्रचंड काळाकुट्टं ढग सबंध आसमंतात पसरला. भर दिवस दुपारी रात्रीसारखा अंधार दाटून आला. मोठ्या प्रमाणावर लाव्हारस व काळी राख आकाशात उंच उडून शेजारीच असलेल्या पॉम्पे या शहरावर पडू लागली. तेथील लोकांना काय होतंय ते कळेनासे झाले. ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण पळणार कुठे? जणू आभाळच फाटले होते. आकाशातून आता मोठे मोठे दगडही पडू लागले होते. बघता बघता पॉम्पे शहरावर ५ ते ७ मीटर उंचीचे राखेचे ढीग साठले. अनेक लोक आहे त्या अवस्थेत या ढिगाऱ्याखाली गुदमरून मेले. सर्व होत्याचे नव्हते झाले.
मला असा प्रश्न पडला कि २००० वर्षापूर्वीची
इतक्या तपशीलवार अशी हि माहिती आत्ता कशीकाय उपलब्ध असू शकते? माझ्या फोन गाईडला जणू
ला ह्या प्रश्नाची अपेक्षाच असावी. फोन गाईड पुढे सांगू लागला…
खाडी पलीकडे नेपल्स शहराच्या जवळील 'मिसेनो'
एका गावातील लोक दूरवरून हे भयानक दृश्य पाहत होते. आयुष्यात प्रथमच असली काहीतरी अर्तक्य,
अविश्वसनिय घटना ते बघत असावेत. या मिसानो गावात 'प्लिनी' नावाचा एक वयस्क गृहस्थ राहत
होता. हा नेपल्स राज्याच्या समुद्री आरमाराचा एक जबाबदार अधिकारी होता. त्याच्या लक्षात
आले कि पॉम्पे आणि व्हर्क्युलियम हि शहरे धोक्यात आहेत. तो आपल्या सहकार्यांना बरोबर
घेऊन जहाजातून आवश्यक ते मदतीचे समान घेऊन व्हर्क्युलियम आणि पॉम्पे कडे निघाला. परंतु
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे व भूकंपामुळे समुद्रात त्सुनामी सारख्या मोठ्या लाटा निर्माण
झाल्या होत्या. विजांचा प्रचंड कडकडाट सुरु होताच. समुद्रात भीषण वादळ आले आणि या वादळात
प्लिनी आणि त्याच्या सहकार्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्लिनी चा एक १७ वर्षाचा दत्तक
मुलगा होता. ज्याला 'धाकटा प्लिनी' असे म्हणत. धाकटा प्लिनी आणि त्याची आई देखील हे
निसर्गाचे तांडव विस्फारलेल्या नजरेने बघत होते.
या भयंकर घटनेचे हुबेहूब वर्णन असलेली दोन पत्रे धाकट्या प्लीनीने रोमन इतिहासकार
'टॅसीटस' याला लिहिली. ती आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या घटनेची तपशीलवार
माहिती मिळते. हि पत्रे इतिहासातील लेखी व विश्वासार्ह पुरावा मानली जातात.
जवळ जवळ तीन दिवस आणि तीन रात्री निसर्गाचे
हे तांडव चालल्यानंतर व्हेस्युव्हियस पर्वत शांत झाला. सगळीकडे स्मशान शांतता पसरली.
पॉम्पे आणि हर्क्युलीयम या शहरांसह आजूबाजूचा तीस चाळीस किलोमीटर चा परिसर बेचिराख
झाला. कोणताही जिवंत प्राणी अथवा झाडे या प्रदेशात शिल्लक राहिली नाहीत. या सर्व प्रदेशावर
जणू मृत्यूने राखेचे आणि लाव्हारसाचे जाड पांघरूणच घातले होते. या प्रदेशावर पुढे अनेक
शतके (जवळजवळ सात शतके म्हणजे १७०० वर्ष) मृत्यूची काळझोप टिकली. बाकीच्या प्रदेशात
पुन्हा वस्ती झाली, पण हि जागा शापित समजून लोक पॉम्पे पासून लांबच राहिले, आणि नंतर
हि घटना काळाच्या ओघात विसरूनही गेली.
पोम्पेइ च्या या विनाशा नंतर जवळ जवळ १७०० वर्षे पॉम्पे जमिनीत गाडलेल्या अवस्थेत होते. या विभागातल्या काही सुधारणा करण्यासाठी एक बोगदा करण्याचे काम सुरु असताना येथे काही शिलालेख सापडले. पण खाली एखादे संपूर्ण शहरच असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. १७४८ साली खरे मोठ्या प्रमाणात उत्खादन करताना पॉम्पे हे शहर सापडले. हे खोदकाम करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते. हे उत्खादानाचे काम अजूनही चालू आहे. म्हणजे २५० ते ३०० वर्षे अव्याहतपणे व काळजीपूर्वक काम करणाऱ्या पुराणवस्तू संशोधन खातातल्या लोकांच्या चिकाटीची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

आज माझे बऱ्याच वर्षापासुनचे स्वप्न पूर्ण
झाले. लहानपणापासून मी ह्या पॉम्पे बद्दल ऐकून
होतो. माझा वास्तुशिल्पी भाऊ शरद पॉम्पे बद्दल बऱ्याच वेळा सांगायचा. खूप उत्सुकता
होती पॉम्पे बघायची. माझ्या वास्तुशिल्पी मुलाने हर्षवर्धन ने आम्हाला आज पॉम्पे
सर्व बारीकसारीक माहिती देत दाखवले.
आमच्या दक्षिण इटलीच्या सफरीमध्ये पॉम्पे च्या
२००० वर्षापूर्वीच्या इतिहासातून बाहेर पडणे सोपे नव्हते. ज्या दिवशी व्हेसुवियस ज्वालामुखीचा
विनाशकारी उद्रेक झाला त्या दिवशी नेमके काय काय घडले असेल, इथे लोकांची पळापळ, स्त्रिया,
मुलांचे आक्रोश ऐकू येत असणार. विचार करता करता मन सुन्न होते. २००० वर्षापूर्वी वातावरण
कसे असेल? शरीराबरोबर मनही थकले.... रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही...
- या थरारक इतिहासावरील एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी फिल्म (Pompeii: The Last Day (BBC) - YouTube) यु ट्यूब वर उपलब्ध आहे ती वाचकांनी जरूर बघावी म्हणजे त्य वेळी नक्की काय झाले असावे याचा अंदाज येईल.
काप्री ची निळाई
दि. ७ : सकाळी लवकर उठून 'काप्री
' या नेपल्स पासून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध, प्रेक्षणीय बेटावर आम्ही जायला निघालो.
येथे मोठ्या बोटीने जावे लागते. साधारणपणे दीड तासाचा बोटीचा प्रवास फारच रोमांचकारी
होता. आमची दोन मजली बोट सुरु झाली तेंव्हा मी तडक बोटीचा डेक गाठला. स्वच्छ उन, समोर
अथांग निळा भूमध्य सागर, आणि सुखावणारे थंड वारे अनुभवत आमचा प्रवास सुरु झाला. पांढरेशुभ्र
समुद्रपक्षी (सीगल) पक्षी ‘कलकल’ असा आवाज करीत बराच वेळ आमच्या बोटीची साथ देत बोटीच्या
आगदी जवळून उडत होते. दूरवरचा अथांग भूमध्य सागर न्याहाळताना मनात येत होते कि, या
दूरवर पसरलेल्या सागराची निळाई आल्हाददायक आहे कि क्षितिजापर्यंत पसरलेल्या आकाशाची
निळाई आल्हाददायक? नेपल्स च्या बंदरावरून निघाल्यापासूनच दूरवर दिसणारे काप्री बेट
आता जवळ जवळ येत होतं. चारीही बाजूनी फैलावलेल्या सागराच्या पाणपसाऱ्यात काप्री अतिशय
देखणं दिसत होतं. जसे जसे आम्ही या बेटाच्या
जवळ जात होतो तसे आम्हाला लक्षात येत होते कि आम्ही काप्री बद्दल जेव्हडे ऐकले होते
त्यापेक्षा कितीतरी पटीने हे ठिकाण सुंदर आहे.
काप्री हे बेट आणि त्याच्या अलौकिक गुहा (ब्ल्यू ग्रोटो) ग्रीकांच्या काळापासून म्हणजे जवळ जवळ अडीच हजार वर्षापासूनच लोकांना माहिती आहेत. त्यावेळच्या लोकांनी या बेटाच नाव मात्र काहीसं विचित्र ठेवलं होतं. हे बेट काहीसं रान डुकराच्या आकाराप्रमाणे आहे असे वाटल्यामुळे त्यांनी या बेटाच नाव 'काप्रोस' म्हणजे रानडुक्कर असे ठेवले. या काप्रोस चं कालांतराने काप्री असे नामकरण झाले. एके काळी हे बेट इटलीच्या भूमीला चिकटलेल होतं. फार प्राचीन काळापासून इथे वस्ती आहे. हे छोटेसे बेट अक्षरशः स्वर्गासामान आहे. अवघे ७ ते ८ कि. मी. लांब व ५ ते ६ कि. रुंद एव्हडेच काय ते याचे आकारमान ! एव्हड्या छोट्या जागेत २००० फुट उंचीचे डोंगर आहेत. येथे तायबेतीयास व्हिला, बायझान्तैन चर्च, एक पडका किल्ला इत्यादी पर्यटन स्थळे आहेतच, पण अशी स्थळे रोजच बघून कंटाळा आला होता. मग काप्री गावातच भटकत राहिलो.
पर्यटकांची वर्दळ व गर्दी हा या बेटाचा स्थायी भावच आहे. अतिशय अरुंद पण झाडा फुलांनी सजवलेल्या गल्ल्या, चौकाचौकात रस्तावरच टेबल खुर्च्या टाकून निवांतपणे बियर पीत किंवा आईस्क्रीम खात बसलेले पर्यटक, कडेला दिसणारा अथांग, निळाशार भूमध्य सागर... इथल्या मरीना पिकोला या सागरकिनार्यावर असलेली 'ऑगस्टस गार्डन्स' अतिशय नयनरम्य आहे.

काप्री हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण त्याहीपेक्षा एका वेगळ्या
कारणासाठी इथे पर्यटक गर्दी करतात, ते म्हणजे इथल्या अलौकिक रंगीत समुद्र गुहा किंवा
ब्ल्यू ग्रेटो. १८२२ मध्ये 'ऑगस्ट कोपिश नावाच्या जर्मन चित्रकार लेखकाला या बेटाच्या
सौदर्यात भर टाकणाऱ्या रंगीत समुद्र गुहांचा शोध लागला. हा ऑगस्ट कोपिश पट्टीचा पोहोणारा.
दिवसातला बराच वेळ तो काप्रीच्या निळ्याशार समुद्रात पोहोण्यात आपला वेळ व्यतिथ करायचा.
असेच पोहोताना त्याला ह्या समुद्र गुहांचा शोध लागला. या काप्री बेटावर निसर्गाचा एक अदभूत चमत्कार पाहायला, अनुभवायला मिळतो.
समुद्राच्या काठावर काही गुहा आहेत. अतिशय अरुंद तोंड असलेल्या या गुहेत छोट्या छोट्या होड्यातून आपल्याला आत नेले जाते. या गुहांचे तोंड इतके छोटे असते कि आपल्याला होडीत झोपावेच लागते. आत जाताना थोडी भीतीही वाटते, पण आत गेल्यावर मात्र निसर्गाचा अदभूत चमत्कार दिसतो. या गुहांच्या मध्ये गुहेच्या प्रवेश दारातून जो सूर्यप्रकाश आत येतो पाण्यातून वक्रीभवन होऊन गुहेच्या भिंतीवर पडतो व पुन्हा परावर्तीत होऊन परत जातो. त्यामुळे पाणी खूप चमकदार निळे, पिवळे, गुलाबी दिसते. प्रत्येक गुहा निराळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. एका दिवसात सर्व गुहा पाहणे अशक्य असल्याने आम्ही निळ्या रंगातली गुहा पहायची ठरवली.
या समुद्रगुहांना ग्रेटो असे म्हणतात. ह्या
समुद्रगुहा काप्रीच्या पूर्वेला असून त्य सकाळीच बघाव्या लगतात. मग काप्री ला पोहोचल्यावर
ठरवल्याप्रमाणे ब्लू ग्रेटो म्हणजे निळी समुद्रगुहा बघण्यासाठी निघालो. बसला पर्यटकांची भली मोठी रांग होती. थोड्या वेळाने
बसमध्ये जागा मिळाली. चढ उताराच्या आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून घावत आमची बस
निघाली. तिथे पोहोचताच लगबगीने निळ्या गुहेचे तिकीट काढून पुन्हा रांगेत उभे राहिलो.
उंचावरून खोल समुद्रात उतरत असा असलेल्या पायऱ्यांवरून समुद्रात बुडालेल्या, समुद्राच्या
तळाशी असलेल्या गुहेकडे उतरू लागलो. रांगेतली माणसे निळी गुहा कशी असेल या विषयी आपसात
बोलत होती. आमचीही उत्सुकता ताणली जात होती. जसे जसे आम्ही उतरत होतो तसतसे समुद्राच्या
लाटांचा आवाज ऐकू येऊ लागला होता.
समुद्राच्या काठावर काही गुहा आहेत. अतिशय अरुंद तोंड असलेल्या या गुहेत छोट्या छोट्या होड्यातून आपल्याला आत नेले जाते. या गुहांचे तोंड इतके छोटे असते कि आपल्याला होडीत झोपावेच लागते. आत जाताना थोडी भीतीही वाटते, पण आत गेल्यावर मात्र निसर्गाचा अदभूत चमत्कार दिसतो. या गुहांच्या मध्ये गुहेच्या प्रवेश दारातून जो सूर्यप्रकाश आत येतो पाण्यातून वक्रीभवन होऊन गुहेच्या भिंतीवर पडतो व पुन्हा परावर्तीत होऊन परत जातो. त्यामुळे पाणी खूप चमकदार निळे, पिवळे, गुलाबी दिसते. प्रत्येक गुहा निराळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. एका दिवसात सर्व गुहा पाहणे अशक्य असल्याने आम्ही निळ्या रंगातली गुहा पहायची ठरवली.
आगदी शेवटपर्यंत मला गुहा काही दिसत नव्हती.
समुद्रामध्ये छोट्या छोट्या नावा एका खडकापाशी गर्दी करून उभ्या होत्या. आगदी समुद्रालगत
आल्यावर अचानक मला अर्धगोल कमानीसारख गुहेचं भोक दिसलं. जेमतेम तीन चार फुट उंचीच आणि
पाच सहा फुट रुंद असं गुहेच तोंड बघून मी चक्रावलो. आता एव्हढ्या छोट्या भोकातून गुहेत
जायचं कसं ? आणि एव्हडा आटापिटा करून आत गेल्यावर असे काय आपल्याला दिसणार? पूर्ण खाली
समुद्राजवळ आल्यावर आम्ही एका छोट्या नावेत बसलो आणि गुहेच्या छोट्या तोंडाकडे सरकू
लागलो. समुद्रातील लाटां उसळून कधी कधी हे गुहेचे छोटे भोक बंद झाल्यासारखे पाण्यात
बुडत होते. आमचा नावाडी आमची नाव कुशलतेने वल्हवत इतर नावांच्या पुढे झाला. जेमतेम
उंची असलेल्या गुहेच्या तोंडावर चाटच्या बाजूला एक लोखंडी साखळी आडवी बांधली होती.
गुहा जवळ येताच नावाड्याने नावेत झोपल्या सारखं आडवं व्हायला लावलं आणि डोकं सांभाळा
असं सांगून, गुहेला लावलेली आडवी लोखंडी साखळी पकडून, आणि स्वतः ही नावेत आडवे झोपून
होडी गुहेच्या भोकात ढकलली. यावेळी उंच लाट नसल्याची त्याने काळजी घेतलेली होती. हे
सर्व अक्षरशः क्षणार्धात झाले, आणि आम्ही आत शिरलो. या गोंधळात मला हाताला किंचितसे
खरचटले.
आत आल्यावर आम्ही उठून बसलो. आत अर्थातच अंधार
असल्याने सुरवातीला काही क्षण काहीच दिसेना. आणि काही सेकंदानी मात्र गुहेतले नेत्रदीपक
दृश्य बघून 'ओ हो' असा शब्द माझ्या तोंडून आपसुकच बाहेर पडला. जवळ शंभर फुट उंचीचा
डेरेदार घुमट असावा अशी आतली गुहा होती. आतला अंधार आता निळ्या जांभळ्या मखमली प्रकाशाने
न्हाऊन निघाला होता. गुहेच्या छोट्या प्रवेशद्वारातून तिरप्या सुर्याकिरणांचा एक झोत
पाण्याच्या आरपार आत जात होता. हा सूर्यप्रकाश
गुहेच्या तळाशी असलेल्या चुन्खाडीवर पडून गुहेच्या आतल्या दिशेने परावर्तीत होत होता.
त्यामुळे पूर्ण अंधाऱ्या गुहेतले हे पाणी अक्षरशः निळ्या रंगाने पेटल्या सारखे दिसत
होते. निळ्या रंगाने प्रकाशमान झालेले व चमकणारे ते पाणी बघून आम्ही थक्क झालो. खरोखर
निसर्गाचा हा एक चमत्कार प्रत्येकाने बघायलाच हवा. गुहेतील काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर
हा परावर्तीत होणारा हा प्रकाश पाण्याला चमकदार निळ्या रंगात जणू बुडवून टाकतो. गुहेच्या
आतील ह्या निळ्या पाण्याचा जणू बाहेरच्या उसळणाऱ्या सागराशी कसलाच संबंध नव्हता. आतील
निखळ स्वच्छ निळ पाणी जणू जिवंत होऊन सळसळत होतं. वर अंधार आणि पाणी खालून पोटातून
निळ्या रंगात लखलखत होतं. आमची नाव जणू निळ्या रंगातच डुंबत होती. नावाड्याच्या वल्ह्या
बरोबर उडणारे पाण्याचे थेंबही निळेच.
आम्ही अक्षरशः आ वासून गुहेतील ती निळाई डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कोणी कोणाशी बोलत नव्हतो, फक्त निसर्गाचा हा चमत्कार डोळे फाडून बघत होतो. डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. केव्हडा विलक्षण अनुभव होता तो ! सगळ्या जगाचा विसर पडला होता. दिसत होते ते फक्त प्रकाशमान, व निळ्या रंगत चमकणारे पाणी आणि गुहेत पसरलेली निळसर निळाई ! मनात आले कि आता नावेतूनच या निळाईत सूर मारावा आणि माखून घ्यावे स्वतः ला या निळ्या रंगात ! तेव्हड्यात हर्षवर्धन ने आमच्या नावाड्याला 'आता इथे पोहता येईल का? असे विचारलेच. पण त्यासाठी नावाड्याने मागणी केलेल्या बक्षिसाची (टीप) रक्कम ऐकून हर्षवर्धन हिरमुसला. (त्या निळाईत दोन तीन मिनिटांच्या डुंबण्यासाठी त्याने तब्बल वीस युरोंची मागणी केले होती.) पण तो नावाड्याच्या व्यवसायाचाच एक भाग होता. गुहेतल्या त्या धीरगंभीर शांततेत आमचा नावाडी कुठलेसे इटालियन लोकगीत मुक्त कंठाने गात होता. गुहेतल्या पोकळीत तो आवाज एखाद्या नाट्यगृहात घुमावा तसा घुमत होता, त्यामुळे वातावरण आणखीनच गहिरे होत होते. दहा ते पंधरा मिनिटांनी आम्ही गुहेतून बाहेर आलो. गुहेत अनुभवलेली नेत्रदीपक निळाई नंतर दिवसभर माझ्या डोळ्यातून, मनातून जात नव्हती. हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. निरनिराळ्या रंगांच्या छटा दाखवणाऱ्या पाण्यातल्या गुहा हा निसर्ग चमत्कार जगात फक्त काप्रीलाच बघायला मिळतो. प्रकाशाच्या खेळाचा हा अद्भुत, मनोहर अविष्कार बघून डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटते.
काप्री बेटावर काप्री आणि अनाकाप्री अश्या दोन छोट्या वस्त्या किंवा गावं. काप्री डोंगराच्या उतारावर वसलेले आहे आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला वर अनाकाप्री. आम्ही नंतर दिवसभर काप्रीच्या चढ उतारांच्या रस्त्यावर भटकत राहिलो. येथी बाजारपेठ मोठी आहे. आधुनिक कपड्यांची, दागिन्यांच्या दुकानांची, भेटवस्तूंची अशी बाजारपेठ पाहून मला आपल्या महाबळेश्वर ची आठवण झाली. पण रस्ते अतिशय स्वच्छ आणि दुतर्फा रंगीबेरंगी फुलझाडांनी सजलेले. मधेच आम्ही एका मोठ्या चौकात पोहोचलो. तिथे चर्च टाऊन हॉल, सोविनिअर दुकाने, हे सारे काही होते. डावीकडे बंदराकडे उतरणाऱ्या पायऱ्या, समोरच उताराचा रस्ता. या चौकातील एका उपहारगृहात आम्ही खाउन घेतले. तिथून पुन्हा चालत चालत साम्राट ऑगस्टस असे नाव असलेल्या उद्यानात गेलो. हे उद्यान एका उंच कड्यावर आहे. या बागेतून खाली खोल अशा निळ्याशार समुद्रातील तीन मोठ्या मोठ्या भल्यामोठ्या खडकांचे विलोभनीय दृश्य दिसत होते. खूप उंचावरून पाहून देखील अतिस्वछ असलेल्या निळ्या समुद्राचा तळ आगदी स्पष्ट दिसत होता. अनेक मोठ्या बोटी येथून आगदी छोट्या म्हणजे किडामुंगी समान भासत होत्या.

सुर्य मावळतीकडे झुकू लागला होता. आमच्या परतीच्या बोटीची वेळ
होत चालली होती. त्यामुळे पुन्हा खाली बंदराकडे जाणे गरजेचे होते. परत जाताना वाटेत
बागेच्या कडेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरिल दुकानात संत्रा-लिंबाचे बर्फाच्या चुऱ्यात
बनवलेले थंडगार सरबत घेतलं. उन्हामुळे तापलेल्या घशाला, शरीराला थंडावा मिळाला. मग
लगबगीने बंदरावर येवून आमच्या बोटीत बसलो. बोट नेपल्स च्या दिशेने निघाली. पाठीमागे
दूरवर धुसर होत जाणाऱ्या काप्री कडे बघत आम्ही काप्रीला परत कधीतरी नक्की येण्याचा
निश्चय केला.
रात्रीचे रोम आणि परत पुणे…
दि. ८ : नेपल्स
वरून आम्ही पुन्हा रोम ला आलो. आमची परतीची विमानाची तिकिटे ९ तारखेची म्हणजे उद्याचीच
होती. इटली ट्रीप मध्ये वेळ कसा कळलेच नाही. १५/१६ दिवस आम्ही एका वेगळ्याच स्वप्नवत
दुनियेत होतो. अचानक मनात हुरहूर दाटून आली. आता पुन्हा परत पुणे आणि रोजचे तेच ते
रुटीन. पण इलाज नव्हता. पुण्याला परतायला तर हवेच होते. पुण्याला परत
जातानाचा आमचा प्रवास येताना होता तसाच होता. म्हणजे पुन्हा रोम-इस्तंबूल आणि इस्तंबूल-मुंबई.
फरक एव्हडाच होता तो म्हणजे हर्षवर्धन ही त्याचे इथले शिक्षण संपवून आमच्या बरोबर पुण्याला
परत येणार होता.
हर्षवर्धन ची सामानाची आवराआवरी चालू होती. तो दोन वर्षे तो घराबाहेर होता. अनेक देशात तो फिरला होता. जर्मनी, इटली, तुर्कस्तान, इजिप्त आणि इतरही काही युरोपमधील देशातून त्याने त्या त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये असलेल्या अनेक वस्तू आणल्या होत्या. त्या वस्तू पुण्याला घेऊन जायच्या होत्या. अर्थात आम्हाला याची कल्पना असल्याने आम्ही येताना खूपच कमी सामान आणले होते. आमच्या एका मोठ्या सुटकेस मध्ये त्याचेच बरेच सामान खचाखच भरले होते. दिवसभर सामानाच्या पसाऱ्यात तो बसला होता.आम्हीही मदत करत होतोच. फ्रीज मधल्या खाण्याच्या गोष्टी संपवायच्या होत्या. किंवा किमान त्याची योग्य विल्हेवाट लावायची होती. हि जागा भाड्याची असल्याने स्वच्छ करून द्यायची होती. आवराआवरी मुळे कचराही बराच साठला होता. कोपऱ्यावरच्या कचराकुंडीत कचर्याची विल्हेवाट लावली. घर आवरून खूप कंटाळा आला होता. हर्षवर्धन म्हणाला "आपण शेवटचे एकदा रोम मध्ये फिरून यायचे का? आज आपण रात्री रोमचे सौंदर्य बघू. रात्रीचे रोम तुम्हाला वेगळेच भासेल. रोम मध्ये एकदा शेवटचा फेरफटका मारून येऊ." आम्ही क्षणार्धात हो म्हणालो. रोम मध्ये वर्षभर राहिल्याने हर्षवर्धन 'आपण रोम मध्ये परत कधी येणार?' अशा विचारांनी काहीसा हळवा झाला होता. मग संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो.

संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणाने आणि थंड हवेने आमचा थकवा
पळून गेला. भटकत भटकत आम्ही पुन्हा एकदा पिआत्सा व्हेनित्झिया चौकात आलो. दुपारच्या
उन्हात बघितलेले व्हिक्टर इमन्युएल स्मारक आता वेगळेच भासत होते. रात्रीच्या अंधारात
दिव्यांची कलात्मक रोषणाई केलेले हे भव्य स्मारक अप्रतिम दिसत होते. चौकातील वाहनांची
गर्दी तशीच होती. आम्ही तिथेच बराच वेळ रेंगाळलो.
तेव्हड्यात अनुजाचा हर्षवर्धन ला फोन आला. एम्सस्टरडॅम वरुन
लंडनला जाताना तिची फ्लाइट चुकली होती. तिकडे ती एकटीच असल्याने आम्ही काळजीत पडलो.
मग बराच वेळ हर्षवर्धन आणि अनुजा फोनवर बोलत होते. तोपर्यंत मी आणि अलका व्हिक्टर इमन्युएल
स्मारकाचे सौंदर्य व त्यावर केलेली दिव्यांची रोषणाई न्याहाळत गप्पा मारत होतो. अर्थात
एक कान हर्षवर्धन च्या फोन कडे होता. आता हि अनुजा अनोळखी शहरात एकटी कुठे राहील? तिला
कुणीतरी फसवेल काय? अशा अनेक शंका आम्हाला येत होत्या. अर्ध्या पाऊण तासाने त्या अनोळखी शहरात तिची पुन्हा
राहण्याची व्यवस्था झाली. आणि आम्ही 'हुश्श' केले. ही आजकालची मुले खूप धाडसी असतात
असे जाणवले.
मग २९ तारखेला ज्यामार्गाने आम्ही या परिसरात दिवसा भटकलो होतो
त्याच मार्गाने निघालो, म्हणजे व्हिक्टर इमन्युएल स्मारक बघून आम्ही पलीकडेच असलेल्या
त्रेजन कॉलम कडे गेलो. या स्तंभावर अतिशय सुंदर दिव्यांची रोषणाई केलेली होती. रात्रीच्या
काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाच्या दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघालेला त्रेजन
कॉलम अतिशय उठून दिसत होता. त्याच्या शेजारीच असलेला त्रेजन फोरम काहीसा वेगळाच भासत
होता. यातील भग्नावस्थेतील इमारती पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने सुशोभित केल्या होत्या.
इम्पिरिअल रोड वरून रमत गमत आम्ही चाललो होतो. उजव्या हाताला रोमन फोरम मधील भग्नावस्थेतले स्तंभ, इमारती, रस्ते रात्रीच्या काळोखात पिवळ्या
रंगात प्रकाशमान झाल्यामुळे सुरेख दिसत होते. मला आपला शनिवार वाडा आठवला. शनिवारवाड्याची
दिव्यांची रोषणाई बंद अवस्थेतच जास्त असते. शनिवारवाड्याच्या आतील लाईट एँड शैडो शो
देखील खूप वेळा बंदच असतो. इथे मात्र लाईट एँड शैडो शो बघून अवाक व्हायला झाले. २०००
वर्षापूर्वीचा काळ अक्षरशः जिवंत होऊन बघायला मिळतो. लेझर किरणांचा वापर करून ह्या
भग्नावस्थेत असलेल्या इमारती अक्षरशः मूळ स्वरुपात आपल्याला अनुभवता येतात.
हे लाईट एँड शैडो शो बघताना इअर फोन दिले जातात व त्यातूनही इतिहासाची सविस्तर माहिती मिळत असल्याने आपण इतिहासात जातो, तिथे अक्षरशः वावरतो. चढत्या रात्रीबरोबर हवेतला गारवा वाढत होता. दुसरे दिवशी सकाळी ९ वाजताची परतीची फ्लाईट होती. आता घरी परतायला हवे होते. मन भरत नव्हते. घरी परत जाउच नये असे वाटत होते. पण इलाज नव्हता. कोलोझीयम बाहेरून बघून आम्ही घरी परतलो. अलकाला रोम मधील शेवटचे आईस्क्रीम खायचे होते. आईस्क्रीम खात खात आम्ही घरी आलो. सामानाच्या आवराआवरी वर शेवटचा हात मारून आम्ही झोपलो. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठायचे होते.

दि. ९ : आज पहाटेच
जाग आली. फ्युमिसिनो विमानतळावर जाण्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच टॅक्सी सांगून ठेवली
होती. सकाळी आम्ही आवराआवरी करून बरोब्बर ६:३० ला आमच्या घराच्या इमारतीखाली टॅक्सी
ची वाट बघत थांबलो होतो,
तेव्हड्यात आमचे नेहेमीचे इटालियन आजोबा काठी टेकत टेकत जाताना दिसले. आमच्या इमारतीमधेच रस्त्यावर एक कॉफीशॉप होते. तिथेही लोकांची वर्दळ असे, मध्यमवयीन व वयस्क लोक छान छान पाळीव कुत्र्यांना घेऊन फिरायला जाताना दिसत. बाल्कनीतून रस्ता न्याहाळताना आम्हाला हे वयस्क आजोबा काठी टेकत टेकत हळू हळू वाकून चालत फिरायला जाताना दिसत. आम्हाला ते फार आवडायचे. ते किती वर्षाचे असतील? त्यांच्या घरी कोण कोण असतील? त्यांची बायको हयात असेल का? अशा मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्हाला चाळाच लागला होता. कोण कुठले हे इटालियन आजोबा, पण का कोणास ठाऊक आमच्यात व त्यांच्यात एक नातेच निर्माण झाले होते. सकाळचे ६ :३० वाजले होते. आणि आमचे हे अनोळखी पण जवळचे नाते निर्माण झालेले आजोबा नेहमीप्रमाणे जाताना दिसले. मला अलकाने विचारले "आपल्याला हे आजोबा परत कधी दिसतील?" मी निरुत्तर …। विषय बदलला. किती वेळ आजोबा दुर जाइपर्यत, आम्ही न बोलता त्यांच्याकडे बघत राहीलो. मनात काहीशी हुरहूर दाटून आली.

बरोब्बर ७ वाजता Taxi आली, आणि आम्ही फुमिसिनो विमानतळाकडे निघालो.
रोम च्या विमानतळावर मला पुण्याहून माझ्या सहकाऱ्याचा फोन आला. तो मला विचारात होता
कि मी पुण्यात कधी पोहोचणार आहे ते, कारण आमचे कामगार न आल्यामुळे काहीतरी गोंधळ झाला
होता. मी खाड करून वास्तवात आलो. जाणवले कि 'रोमन हॉलिडे' संपला आहे. गेले १५/१६ दिवसातील
स्वप्नवत दुनियेतून वास्तवातील कठोर दुनियेत मला येणं भाग होतं…
राजीव जतकर.
मोबाईल
: ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com
संदर्भ ग्रंथ:
1.
“Let’s
go ITALY” – Inna Livitz.
2.
रोमराज्य
१ व २
3.
जावे
त्याच्या देशा…
4.
युरोप
सहलीचा सोबती.
I felt as if I visited Rome.. Nice and perfect drafting.. Minute details.. Would like to visit Rome soon
ReplyDeleteजतकर साहेब नमस्कार
ReplyDeleteआपण रोम च्या सफरीचा फार सुंदर वर्णन केलं आहे.माझा मुलातच हिस्टरी हा आवडता विषय असल्याने आणि हल्ली नेत वर सगळी माहिती मिळत असल्याने रोम विषयी भरपूर माहिती मिळाली होती. आपण इतके सुरेख वर्णन केले आहे कि मी कधी एकदा रोम ला जाते असं मला झालंय . फारच उपयुक्त माहिती आणि सुरेख लिखाण फोटोग्राफ हि सुरेख. इतका छान लेख वाचायला मिळाला खूप छान वाटले, अभिनंदन ...
सरोज आंबर्डेकर