Friday, 22 January 2016

मुक्तो मोन डॉट कॉम

                    मुक्तो मोन डॉट कॉम

'अविजित रॉय ' या बांगला देशीच्या एका लेखकावर त्याच्या पत्नीवर झालेल्या हल्याने मी मनाच्या अस्वस्थ अवस्थेत गेलो. या हल्यामध्ये अविजित रॉय यांचा मृत्यू झाला. रॉय यांच्या पत्नी सुदैवाने बचावल्यापानसरे पती पत्नीच्या वर झालेल्या हल्याशी साम्य असलेली ही घटना! बांगला देशासारख्या मागास इस्लामी मुलतत्व वाद्यांचे आगार असलेल्या देशात अशा घटना अपेक्षितच असतात.
  

     
  बांगला देशात ढाका विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापक 'अजोय रॉय ' यांचा अविजित रॉय हा मुलगा ! अविजित रॉय अमेरिकेत राहत असत.  पण बांगला देशातील फोफावणाऱ्या धर्मवाद्यांच्या कारवायांना जमेल तितका ते प्रयत्न करीत.  त्यांच्या मुक्तो मोन .कॉम या ब्लॉग वर ते लिखाण करून ते व्यक्त होत असतत्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.  पैकी 'बिश्वाशेर व्हायरस ' हे पुस्तक सर्वाधिक गाजलं  आणि खपलं ही ! अंधश्रधेच्या  विरोधात ते लिहीत असत.  त्याही पुढे जाऊन  'श्रद्धा हे अंधश्रद्धेचेच दुसरे नाव आहे ' अशी ही भूमिका ते मांडत ! त्यांचे म्हणणेत्यांची मते ते अतिशय प्रभावीपणे  तर्कशुद्ध पद्धतीने लिहीत . 'मन मुक्त असावं आणि त्यावर धर्म वगैरे चा पगडा नसावा ' अशा विचारांसाठी त्यांचा ब्लॉग चर्चेसाठी आणि ‘ हो’  टीकेसाठी ही नेहमीच खुला होता .
           आपल्या दाभोळकर , पानसरे किंवा बांगला देशातील रॉय यांच्या सारख्या विवेकाने व्यक्त होणाऱ्या निरुपद्रवी व्यक्तींना जीवे मारून नेमके काय मिळत असावे या मारेकऱ्यांना ? मारून विचार नष्ट होतात ? खरे तर श्रद्धा - अंधश्रद्धा , धर्म - अधर्म  या बद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात विचार येतच  असतात . आपल्यासारखी सामान्य माणसे ' कोण काय म्हणेल ?' या भीतीने विचार करीत नसतात . दाभोळकर ,  पानसरेअविजित रॉय यांच्यासारख्या असामान्य व्यक्ती  त्यांचे स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे धाडस करतात. व्यक्त होणे महत्वाचे ! आम्ही सामान्यांनी व्यक्त होणेच सोडले आहे . मळलेल्या त्याच त्याच वाटेने चालत राहून , व्यक्त होता आयुष्य जगायचे आणि धन्यता धन्यता ही मानायची !
      वास्तविक धर्माची संकल्पना मानवाच्या कल्याणासाठी आखली गेली . विश्वाच्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांनी , निरनिराळे धर्म स्थापन केले . प्रत्येक धर्माची शिकवण थोड्या फार फरकाने सारखीच आहे . चांगल्या वर्तणुकीने आपल्याबरोबर सर्वांचेच कल्याण व्हावे असेच सर्व धर्मात सांगितले गेले आहे . कालांतराने ह्या सर्व चांगल्या असलेल्या धर्मात वाईट प्रवृत्ती शिरल्या , राजकारणाने हि त्याचा ताबा घेतलासमाजातील व्यक्त होणाऱ्या मोठ्या वर्गामुळे वाईट प्रवृत्तीना बळ आले .
  'माझा धर्म तो चांगला , इतर धर्म वाईट ' अशा विचारांचा फैलाव राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सामान्य माणसात रुजवला . सामान्य माणूस देखील याला सहज बळी पडला . पुढे  'आपल्या धर्मापेक्षा इतर धर्म वरचढ  होतील की  कायह्या भयगंडाने प्रत्येक धर्मिय पछाडला  गेला . त्यामुळे स्वतःच्या धर्मातही काही वाईट गोष्टी  आहेत याचा मानवाला विसर पडू लागला. मग अशा वाईट गोष्टींची वाच्यता कोणीही मग स्वधर्मियांनी किंवा कुणीही केली तर त्यांचा राग येऊ लागला . आणि आता अशा वाईट वृत्ती किंवा तथाकथित धर्माचे ठेकेदार पूर्णपणे हिंसक बनू पहात आहेत , हे फार अस्वस्थ करणारे आहे .
             खरे तर दाभोळकर , पानसरे काय किंवा अविजित रॉय काय , ही मंडळी तशी निरुपद्रवीचविवेकाने आणि तर्कशुद्ध पद्धतीने आपली वेगळी मते मांडणारी ही मंडळी ! कोणताही आवेश आणता , प्रसिद्धीची अपेक्षा ठेवता , निरपेक्ष पद्धतीने सोप्या सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत आपले मत ठामपणे मांडताना ह्या असामान्य व्यक्तींनी हौतात्म्य पत्करले . बर ही मंडळी काय सांगत होती ? प्रत्येक धर्मातील वाईट चालीरीती बंद करा . धर्मातील वाईट गोष्टी आंधळेपणाने स्वीकारू नका. ह्यात चुकीचे ते काय ? पण धर्ममार्तडांना  हे विचार कसे पटावेत ? तर्कशुद्ध प्रश्नांना या धर्मवेड्या मंडळींच्या कडे उत्तरे नसल्यामुळे त्यांनी या समाजसुधारकांना गोळ्या घालून संपवले . या धर्मवेड्या अतिरेक्यांना विचारांशी लढण्याची अजिबात कुवत हिम्मत नसते ,त्यामुळेच ते हा मार्ग स्वीकारतात .
    पण अशा बंदुकीच्या गोळ्यांनी विचार संपतात का ? ते संपत तर नाहीतच पण अधिक बळकट होतात . दाभोलकरांच्या हत्येनंतर 'अनिस ' ची चळवळ अधिकच बळकट झाली . पानसरेंच्या पुस्तकाच्या पूर्वी लाख प्रती खपल्या होत्या , आता त्यांच्या हत्येनंतर २० लाखावर खपल्या . गांधींची हत्या होऊन त्यांचे विचार कुठे संपले ? मनात सारखे विचार येत राहिले ……. खरच श्रद्धा -अंधश्रद्धा , धर्म-अधर्म , जात-पात विरहित मुक्त मनाने जगणारा समाज निर्माण होऊ शकेल  ? मानवाला मुक्त मनाने व्यक्त होता येईल ? होय ………नक्कीच ! पण  त्यासाठी आवश्यकता आहे ती दाभोळकर , पानसरेअविजित रॉय  यांच्यासारखे निर्भयपणे , मुक्त  मनाने  व्यक्त होण्याची …….  



राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com



No comments:

Post a Comment