'अंग्रेजीमें कहते है'...'इफ यु लव्ह समबडी, शो इट'.
'प्रेम
म्हणजे
प्रेम
म्हणजे
प्रेम
असतं,
तुमचं
आमचं
सर्वांचं
सेम
असतं'
हे
जरी
खरं
असलं
तरी
काही
जणांचं
थोडं
वेगळंही
असतं.
आपल्या
आधीच्या
पिढी
मध्ये
प्रेमविवाह,
लग्नाआधी
प्रेम
हि
संकल्पना
फारशी
नव्हती.
आईवडिलांच्या
सांगण्यावरून
मुलामुलींना
दाखवण्याच्या
अर्ध्या
तासाच्या
चहापोह्याच्या
कार्यक्रमातून
मुलं
मुली
पसंत
करून
होणारी
लग्ने
आता
कालबाह्य
होऊ
लागली
आहेत.
बायकोशी
प्रेमाने
बोलणे,
तिच्यावर
एखादी
प्रेमाची
कविता
करणे
वगैरे
भानगड
पूर्वी
नव्हती.
पूर्वी
प्रेम
दाखवणे
किंवा
व्यक्त
करणे
असे
काही
फारसे
नव्हतं.
'आपापल्या
सांसारिक
जबाबदाऱ्या
निभावत
संसारात
टिकून
राहणे
म्हणजेच
प्रेम'
अशा
विचारसरणीचा
काळ
आता
मागे
पडला.
मात्र
आता
काळ
बदलतोय.
प्रेमाच्या
पद्धती
बदलतायत.
प्रेम
आवर्जून
व्यक्त
केलं
जातंय.
प्रेम
विवाह
होऊ
लागलेत.
हे
जरी
खरं
असलं
तरी
मागच्या
पिढीतील
परंपरावादी
विचारांना
घट्ट
धरून
ठेवणारी
माणसं
अजूनही
कधी
कधी
दिसतात.
त्यांना
आपल्या
जोडीदारावर
प्रेम
आहे
ह्याची
जाणीवही
नसते,
आणि
असली
तरी
त्यांना
ते
दाखवता
येत
नसते.
अशाच
एका
सध्या
सरळ,
पण
अतिशय
महत्वाचा
विषय
असलेल्या
कथेवर
'अंग्रेजीमें
कहते
है'.नावाचा
सुंदर
चित्रपट
(पुन्हा
अमेझॉन
प्राईम
व्हिडीओची
कृपा)
बेतलेला
आहे.
मध्यमवर्गीय
परंपरा,
विचार
याचं
अतिशय
सुरेख
आणि
बारकाईनं
केलेलं
निरीक्षण
म्हणजे
लेखक,
दिग्दर्शक
'हरीश
व्यास'
याचा
हा
चित्रपट! एनएफडीसी ची निर्मिती असलेला हा चित्रपट सामान्य माणसाचं रोजचं आणि वास्तव जीवन दाखवतो.
फारशी नाटकीय वळणे नसलेल्या या साध्या कथेतील नायक 'यशवंत बत्रा' (संजय मिश्रा) आणि नायिका किरण बत्रा (एकवली खन्ना) ह्यांच्या लग्नाला आता २५ वर्षे उलटून गेलेली आहेत. यशवंत बत्रा आपली पोस्ट खात्यातली साधारण नोकरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत असतो. सकाळी उठून, नाष्टा करून, जेवणाचा डबा घेऊन
ऑफिस
मध्ये
दिवसभर
काम
करणे,
घरी
येता
येता
रोज
एखादी
व्हिस्कीची
कॉर्टर
आणून,
घेऊन
रात्रीचे
जेवण
करून
झोपणे
हे
त्याचे
सामान्य
आयुष्य
! 'बायकोबरोबर
दोन
शब्द
प्रेमाने
बोलणे
किंवा
प्रेम
व्यक्त
करणे
म्हणजे
मूर्खपणा
आहे'
असं
म्हणत
आयुष्याला
समोर
जाण्याचं
त्याचं
स्वतःचं
असं
एक
तत्वज्ञान
असतं.
या
यशवंतला
एक
प्रीती
(शिवानी
रघुवंशी)
नावाची
गोड
मुलगी
आहे.
'आपल्या
ह्या
मुलीचं
लग्न
लावून
दिलं
की
आयुष्याचं
सार्थक
झालं'
अशी
त्याची
धारणा
आहे.
प्रीतीचं लग्न
यशवंत
ठरवतो,
मात्र
तिचा
शेजारीच
राहणाऱ्या
एका
मुलावर
प्रेम
आहे.
![]() |
संजय मिश्रा - एकवली खन्ना |
यशवंतची पत्नी किरण मात्र यशवंताच्या अशा रुक्ष आणि विक्षिप्त वागण्याला कंटाळलेली आहे. तब्बल पंचवीस वर्षे असा कोरडेपणा सहन करताना ती बिचारी पिचून गेली आहे. निराश झालेली आहे. पण नवीन पिढीतील प्रीती मात्र बंड करून तिच्या प्रियकराबरोबर लग्न करते. मुलीच्या लग्नानंतर किरण देखील घर सोडून जायचे ठरवते. मग अर्थातच पत्नीच्या घर सोडून जाण्याने यशवंत एकटा पडतो. मग त्याला आपल्या पत्नीचे महत्व लक्षात यायला लागते. तिची सतत आठवण यायला लागते. पुढे एकाकी पडलेल्या यशवंतच्या विचारात बदल घडतो का? प्रेम म्हणजे काय हे यशवंतला समजतं का? माहेरी निघून गेलेली किरण यशवंत च्या आयुष्यात परत येते का? किरण ला आपल्या घरी परत बोलवायला यशवंतला उशीर होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायला खूप हटके असलेला 'अंग्रेजीमें कहते है' हा सुंदर चित्रपट बघायलाच हवा
.
या चित्रपटाचा नायक यशवंतची भूमिका साकारणारा अभिनेता संजय मिश्रा याने हा चित्रपट अक्षरशः व्यापून टाकला आहे. दिसायला नायकासारखे देखणे नसूनही अफाट अभिनयाच्या जोरावर त्याने हा चित्रपट खाऊन टाकला आहे. एकवली खन्ना या किरणची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा मी पाहिलेला पहिलाच चित्रपट ! या गुणी अभिनेत्रीने किरणांची सहनशीलता, घुसमट अतिशय ताकदीने सादर केली आहे. अंशुमन झा, शिवानी रघुवंशी, पंकज त्रिपाठी (हा माझा अतिशय आवडता कलाकार आहे), इप्शीता चक्रवर्ती या सहअभिनेत्यानी त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
![]() |
पंकज त्रिपाठी |
ही कथा वाराणसी शहरात घडते. वाराणसीमधील गंगेचं, तिच्या घाटांचं नयनरम्य छायांकन फारूक मिस्त्री यांनी अतिशय अप्रतिम केलंय. या चित्रपटातील संगीताचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या चित्रपटाचे संगीतकार प्रवीण कुंवर, ओनी-आदिल आणि रंजन शर्मा यांनी कमालीचं सुंदर संगीत दिलं आहे.'पिया मोसे रूठ गए' किंवा गंगाघाटाच्या पार्श्वभूमीवरचं सुरवातीलाच असलेलं 'अब मन जाओ सांवरिया' ही गाणी अतिशय श्रवणीय झाली आहेत.
![]() |
संजय मिश्रा - एकवली खन्ना |
हा चित्रपट कोणत्याही प्रकारचा भडकपणाचा किंवा चकचकीतपणाचा आव आणत नाही. साधेपणा हा या चित्रपटाचा प्राण आहे. चित्रपटाच्या शेवटी आपला सिधासाधा नायक म्हणतो "हर कहानीका नायक शाहरुख खान नाही होता. कभी कभी अपनी तरह, मेरी तरह एक आम इन्सान भी होता है". ह्या सध्या सोप्या वाक्यातून चित्रपटाचे सार समजते. काहीतरी वेगळं बघायचं असलेल्या चित्ररसिकांनी सध्यासोप्या, मिस्कील अंगाने जाणारी 'अंग्रेजीमें कहते है' ही कलाकृती आवर्जून बघावी. कुणीतरी म्हणलंय “If
You Love Somebody… Show it.”
राजीव जतकर.
No comments:
Post a Comment